scorecardresearch

WhatsApp घेऊन येत आहे जबरदस्त फीचर्स; फोटो आणि व्हिडीओ एडिट करणं होणार सोपं

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरमध्ये कॅमेरा सेटिंग्जमध्ये सुधारणा आणि व्हॉइस नोट बॅकग्राऊंडमध्ये प्ले करणे यासारख्या इतर अनेक सेवांचा समावेश आहे.

whatsapp-reuters
हे फीचर वापरून वापरकर्ते एकाच वेळी चार डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप सुरु करून चॅट करू शकतात. (Photo : reuters)

आपल्या वापरकर्त्यांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप अनेक नव्या फीचर्सवर काम करत आहे. यात कॅमेरा सेटिंग्जमध्ये सुधारणा आणि व्हॉइसनोट बॅकग्राऊंडमध्ये प्ले करणे यासारख्या सेवांचा समावेश आहे. नव्या अपडेटेड व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कंपनी ड्रॉईंग टूल देणार असून यात नवे पेन्सिल आयकॉन असेल. याच्या मदतीने फोटो आणि व्हिडीओ फॉरवर्ड करण्याआधी त्यावर आपल्याला एडिटिंग करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आधीपासूनच पेन्सिल फीचर उपलब्ध आहे परंतु नवीन अपडेटनंतर वापरकर्त्यांना बारीक आणि जाड अशी पेन्सिल मिळेल ज्यामुळे ड्रॉईंगचा अनुभव बदलणार आहे.

येणाऱ्या काळात ब्लर इमेज टूलसुद्धा मिळणार आहे. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप बीटा अँड्रॉइड २.२२.३.५ अपडेटमध्ये पाहिले गेले आहे, परंतु ते बाय डिफॉल्ट डिसेबल करण्यात आले आहे. हे फीचर अद्याप विकसित होत असून लवकरच बीटा परीक्षकांसमोर सादर केले जाईल.

इंस्टाग्रामचा कंटाळा आलाय? आता मोबाईल अ‍ॅपमधूनच डिलीट करता येणार अकाउंट; नव्या फीचरच्या टेस्टिंगला सुरुवात

याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप वापरकर्त्यांना नवीन चॅट बबल कलर मिळेल ज्यामुळे डार्क मोड वापरताना वापरकर्त्यांना नवीन गडद निळा रंग मिळेल. हे अपडेट विंडोज आणि मॅक ओएस अ‍ॅपसाठी येईल जे व्हॉट्सअ‍ॅप बीटा डेस्कटॉप २.२२०१.२.० मध्ये चॅट बबल हिरवे करेल. यामुळे चॅट बार आणि बॅकग्राऊंडचा रंग देखील बदलेल.

नोटिफिकेशन मॅनेज करण्याचा पर्याय मिळणार

दुसऱ्या अपडेटमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या आयओएस वापरकर्त्यांना नोटिफिकेशन सेटिंग्ज मॅनेज करण्याचा पर्याय देखील मिळेल, ज्यामुळे कोणत्या चॅट किंवा ग्रुप चॅटचे नोटिफिकेशन प्राप्त करायचे आहेत हे सेट करता येणार आहे. तसेच नोटिफिकेशन साऊंडदेखील मॅनेज करता येणार आहे.

‘हे’ अ‍ॅप वापरून दुसऱ्या ठिकाणाहूनही नियंत्रित करू शकता आपला फोन आणि लॅपटॉप

सोबतच व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज रिअ‍ॅक्शन टॅब देखील असेल, ज्यात वापरकर्ते कोणत्या मेसेजवर कोणी रिअ‍ॅक्ट केलं हे पाहू शकतील. रिपोर्टनुसार, कंपनी या मेसेज रिअ‍ॅक्शन फीचरवर बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे. फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्रामवर ज्याप्रकारे वापरकर्ते ज्याप्रकारे हे फीचर वापरात आहेत तशाच पद्धतीने हे फीचर काम करेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Whatsapp new feature will give users a new experience editing photos and videos will be easy pvp

ताज्या बातम्या