स्नॅपचॅट (Snapchat) हे तरुण मंडळींचे आवडते ॲप आहे. कंपनी लेन्सच्या स्वरूपात विविध स्नॅपचॅट फिल्टर्स  (Snapchat Filters) ऑफर करत असते. हे युजर्सना ओपन-सोर्स सॉफ्टवेअर वापरून रिअल टाइममध्ये त्यांचा लूक सुधारण्याची परवानगी देते. म्हणजेच हे फिल्टर वापरून तुम्ही छान छान फोटो काढू शकता आणि फोटो सेव्ह केल्यानंतर ते इतर प्लॅटफॉर्मवरसुद्धा सहज शेअर करू शकता. तर आता स्नॅपचॅटनंतर व्हॉट्सॲपसुद्धा तुमच्यासाठी फिल्टर्स घेऊन येत आहे.

व्हॉट्सॲपने व्हिडीओ कॉलसाठी ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) (augmented reality) इफेक्टस आणण्याची योजना आखत आहे. म्हणजेच व्हॉट्सॲप एका फीचरवर काम करीत आहे; जिथे तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलदरम्यान (WhatsApp Video Call) व्हीआर इफेक्टस आणि फिल्टर जोडू शकणार आहात. स्नॅपचॅट व ॲपलने ‘लेन्स’ आणि ‘फेस-टाइम’मध्ये एआर इफेक्ट आणल्यानंतर आता व्हॉट्सॲपसुद्धा त्यात सहभागी होणार आहे. नवीन फीचर भविष्यात ॲण्ड्रॉइड युजर्ससाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp new feature you can add vr effects and filters during your whatsapp video calls available for android users in the future asp