new features for small business using WhatsApp Business : ७ सप्टेंबर रोजी २०२४ गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर नवरात्री, दिवाळी हे सणसुद्धा साजरे केले जातील. या सणांदरम्यान छोटे व्यापारी ग्राहकांसाठी आवश्यक अशा गोष्टी बाजारात घेऊन येतात. याच पार्श्वभूमीवर व्‍हॉट्सअ‍ॅप बिझनेस समिटमध्‍ये विविध फीचर्स आणि अपडेट्सची घोषणा करण्यात आली आहे. हे देशभरातील व्‍यवसायांना उत्तम इन-चॅट अनुभवांची निर्मिती करण्‍यासाठी येत्या सणासुदीच्‍या काळापूर्वी लघु व्यवसायांनादेखील मदत करणार आहे.

व्‍हॉट्सअ‍ॅपवर सर्व लघु व्‍यवसायांसाठी मेटा व्‍हेरिफाइड सादर :

भारतातील लाखो लघु व्‍यवसाय व्‍हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) बिझनेस अ‍ॅपचा वापर करतात. तर आता, मेटा व्‍हेरिफाइड व्‍हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅपचा वापर करणाऱ्या भारतातील सर्व पात्र लघु व्‍यवसायांसाठी उपलब्‍ध आहे. मेटा व्‍हेरिफाइडसह सबस्‍क्राईब करण्‍याबरोबर व्‍यवसायांना सत्‍यापित बॅज, फसवणुकीपासून संरक्षणित अकाऊंट सपोर्ट आणि प्रीमियम फीचर्स मिळतील; ज्‍यामुळे ते ब्रँड ऑनलाइन सादर करता येईल आणि ग्राहकांबरोबर चॅट करतील. हाच बॅज त्‍यांचे व्‍हॉट्सअ‍ॅप चॅनेल्‍स आणि बिझनेस पेजेसवर दिसेल, ज्‍यामुळे सोशल मीडिया आणि वेबसाइट्सवर ते सहजपणे शेअर करता येईल.

Amazon Great Indian Festival 2024
Amazon Great Indian Festival 2024: लॅपटॉपवर ४० टक्के, तर ‘या’ स्मार्टफोन्सवर भरघोस सूट; वाचा ‘ही’ यादी; पाच दिवसात सुरु होणार सेल
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
Why Atishi was AAP choice to Delhi CM
Atishi Marlena Delhi New CM: केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी

व्‍हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅपवर कस्‍टमाइज्‍ड मेसेजेस् :

आजपासून भारतातील व्‍हॉट्सअ‍ॅप ( WhatsApp) बिझनेस अ‍ॅपचा वापर करणाऱ्या लघु व्‍यवसायांसाठी कस्‍टमाइज्‍ड मेसेजेस् सादर करण्यात आले आहेत, ज्‍यामुळे ते त्‍यांच्‍या ग्राहकांना अपॉइंटमेंट रिमाइंडर्स, वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा किंवा हॉलिडे सेलबाबत अपडेट्स जलदपणे पाठवू शकतात. मोफत उपलब्‍ध असलेले हे नवीन फीचर व्‍यवसायांना ग्राहकांच्‍या नावासह वैयक्तिक मेसेजेस् व कॉल-टू-अ‍ॅक्‍शन बटण्स पाठवण्‍याची क्षमतासुद्धा देतो आहे. तसेच हे नवीन फीचर त्‍यांना पाठवल्‍या जाणाऱ्या मेसेजेसचा दिवस व वेळ ठरवण्यासही परवानगी देतो.

हेही वाचा…Apple iPhone 16 Launch Event 2024 : नवीन लूक, डिझाइनसह आयफोन १६, ॲपल एअरपॉडस् लाँच; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

व्‍हॉट्सअ‍ॅप भारत यात्रा ( WhatsApp Bharat Yatra) :

व्हॉट्सॲप भारत यात्रा भारतातील १० प्रमुख शहरांमध्ये सहा हजारांपेक्षा अधिक किलोमीटर अंतर कापून २० हजारांपेक्षा जास्त लघु व्यवसायांपर्यंत पोहोचणार आहे. व्‍हॉट्सअ‍ॅप बिझनेस समिटमध्ये मत व्‍यक्‍त करताना भारतातील मेटाच्‍या उपाध्‍यक्ष संध्‍या देवनाथन म्‍हणाल्‍या की, आम्‍ही लवकरच भारतात व्‍हॉट्सअ‍ॅप बिझनेस यात्रा लाँच करणार आहोत; जेथे आम्‍ही भारतातील विविध द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये जाऊन लघु व्‍यवसायांचे प्रत्‍यक्ष व वैयक्तिक प्रशिक्षण देऊ. आमचा विश्‍वास आहे की, योग्‍य डिजिटल कौशल्‍ये असलेले लघु व्‍यवसाय भारताच्‍या डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेला चालना देऊ शकतात. या उपक्रमाचा भाग म्‍हणून आम्‍ही लघु व्‍यवसायांना त्‍यांचे व्‍हॉट्सअ‍ॅप बिझनेस अकाऊंट्स स्‍थापित करण्‍याचे, कॅटलॉग्‍ज निर्माण करण्‍याचे, व्‍हॉट्सअ‍ॅपवर क्लिक केल्‍या जाणाऱ्या जाहिराती सेट अप करण्‍याचे प्रशिक्षण देऊ. आम्‍ही आमच्‍या वेबसाइटवर रिसोर्स सेंटरदेखील निर्माण करू, जे या व्‍यवसायांसाठी क्विक-अ‍ॅक्‍सेस ट्यूटोरिअल सेंटर म्‍हणून सेवा देईल.

लघु व्यवसाय करणाऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा :

१. डिलिव्हरीसंदर्भात वेळेवर अपडेट देणं असो किंवा हॉलिडे सेलसाठी कूपन असो; ग्राहकांना हवे असलेले मेसेजेस् पाठवा आणि तुम्ही पाठवलेल्या प्रत्येक मेसेजसाठी ग्राहकांकडून परवानगी घ्या.

२. ग्राहकांना कधी, कोणत्या वेळी मेसेजेस् पाठवले पाहिजेत याचा विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या.

३. ग्राहकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर ग्राहक व्‍यावसायिकांकडून सेल किंवा प्रमोशनबाबत ऐकण्‍यास उत्‍सुक असले तर त्यासाठी अ‍ॅपमध्‍ये योग्‍य टूल्‍स उपलब्ध करून देणार आहोत; ज्‍यामुळे व्‍यक्‍ती त्‍यांना हवे असलेले विशिष्‍ट प्रकारचे मेसेजेस् आणि ते कितीवेळा मिळाले पाहिजे याबाबत ते माहिती देऊ शकतात.

तर व्‍यवसाय वाढवण्यासाठी व्‍हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) बिझनेस अकाउंट्सचा चांगला उपयोग करू शकतात. या नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍सचा फायदा घेत व्यवसाय करणारे सणासुदीच्‍या काळाचा फायदा घेऊ शकतात आणि यशस्‍वी होण्‍यासाठी नवीन संधी अनलॉक करू शकतात.