व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटा भारतात व्हॉट्सॲपची सेवा बंद करणार असल्याच्या चर्चा किंवा त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मेटाने भारतातील त्यांची व्हॉट्सॲपची सेवा बंद करण्याच्या कोणत्याही योजनेसंदर्भातील माहिती सरकारला दिलेली नाही, अशी माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी राज्यसभेत बोलताना दिली.

माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६९ ए नुसार सरकारच्या निर्देशांनुसार वापरकर्त्यांचे तपशील सामायिक करण्याच्या सरकारच्या निर्देशांमुळे व्हॉट्सॲप भारतात आपली सेवा बंद करण्याचा विचार करत आहे का? असा सवाल काँग्रेस खासदार विवेक तन्खा यांनी विचारला होता. त्यानंतर मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार विवेक तन्खा यांच्या व्हॉट्सॲपच्या सेंवाबद्दलच्या प्रश्नांवर उत्तर दिलं. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, “व्हॉट्सॲप आणि त्याची मूळ कंपनी मेटा यांनी भारतातील व्हॉट्सॲपच्या त्यांच्या सेवा बंद करण्याच्या योजनेबाबत कोणतीही माहिती सरकारला दिलेली नाही”, असं त्यांनी केलं. दरम्यान, याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

Asaduddin-Owaisi-1
ताजमहलच्या गळतीवरून असदुद्दीन ओवेसींचे भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धीवर ताशेरे; म्हणाले, “हे म्हणजे १० वीत नापास विद्यार्थ्याने…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Wardha, Narendra Modi, Nitesh Karale master,
वर्धा : सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन् संतप्त मात्र कराळे गुरुजी! काय आहे कारण?
agricultural schemes
कृषिक्षेत्रासाठी १४ हजार कोटींच्या खर्चास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
PhD on the work of Union Minister Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकर्तृत्वावर पीएचडी…
champai soren will join bjp
ठरलं! चंपई सोरेन ‘या’ तारखेला भाजपात प्रवेश करणार; आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; म्हणाले…
rohit pawar on raj thackreray vidarbha visit
Rohit Pawar : “तुम्ही महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते, फक्त…”; राज ठाकरेंबाबत नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
Ramsar sites india
भारतात तीन नवीन ‘रामसर’ स्थळांची घोषणा; ‘रामसर’ स्थळ म्हणजे काय? पर्यावरणासाठी ही स्थळे महत्त्वाची का आहेत?

हेही वाचा : Meta Removes Instagram Accounts: मेटाकडून ६३ हजार इन्स्टाग्राम खात्यांना टाळे; सेक्स्टॉर्शनसाठी तरुणांना केलं जातंय टार्गेट? नेमकं घडलंय काय?

दरम्यान, वापरकर्त्याचे तपशील शेअर करण्याच्या निर्देशांमुळे व्हॉट्सॲप भारतात आपली सेवा बंद करण्याचा विचार करत आहे का? यापूर्वी व्हॉट्सॲपने नवीन सुधारित आयटीच्या नियमांना आव्हान दिलं होतं. यासंदर्भात व्हॉट्सॲपने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सांगितलं होतं की जर सरकारने संदेशांचे एन्क्रिप्शन तोडण्यास भाग पाडले तर ते भारतात काम करणे थांबवेल. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील निर्बंधांबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, केंद्र सरकारने भारताचे सार्वभौमत्व किंवा अखंडता, भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा, परकीय राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेच्या हितासाठी निर्देश जारी केले आहेत.