WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. तसेच मेटा याची मूळ कंपनी आहे. WhatsApp आपल्या युजर्ससाठी नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स लॉन्च करत असते. मध्यंतरी कंपनीने वापरकर्त्यांसाठी companion मोड लॉन्च केला होता. याच्या मदतीने युजर्स एका अकाउंटला एकाच वेळी ४ वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये लॉग इन करू शकतात. आता याबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे.

तेव्हा व्हॉट्सअ‍ॅपने हे फिचर केवळ अँड्रॉइड युजर्ससाठी रोलआऊट केले होते. मात्र आता हे फिचर लेटेस्ट iOS अपडेटच्या मदतीने iPhone युजर्ससाठी देखील लाईव्ह करण्यात आले आहे.

Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
a pineapple seller hairstyle look like a pineapple
तरुणाची मार्केटिंग स्ट्रॅटेजी! केली चक्क अननसाची हेअरस्टाईल, अननस विक्रेत्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब
only 5 rupees lemon will clean the kettle
५ रुपयाचे लिंबू करेल केटलची चकचकीत सफाई! पाहा व्हायरल जुगाड व्हिडीओ

हेही वाचा : एकाचवेळी WhatsApp Account चार डिव्हाइसवर कसे लिंक करायचे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

अनेक डिव्हाईसमध्ये वापरता येणार

iOS 23.10.76 साठी व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये आयफोन युजर्ससाठी मल्टिपल फोन ‘Companion mode’ जारी केला आहे. या नवीन अपडेटच्या मदतीने युजर्स आपले एक अकाउंट दुसऱ्या आयफोनमध्ये चालू शकणार आहेत. दुसऱ्या आयफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप लिंक कसे करावे ? ते जाणून घेऊयात.

१. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला link this device वर क्लिक करावे लागेल.
२. त्यानंतर क्युआर कोड फोनमध्ये स्कॅन करावा.
३. क्यूआर कोड स्कॅन झाल्यानंतर तुमचे प्रायमरी whatsapp अकाउंट दुसऱ्या आयफोनमध्ये लिंक होईल.

हेही वाचा : WhatsApp ने ‘या’ युजर्ससाठी रोलआऊट केले Status Archive फिचर, जाणून घ्या काय होणार फायदा

तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन App स्टोअरवरून डाउनलोड करायला जाल, तेव्हा तुम्हाला या लेटेस्ट अपडेटसह मिळणारे नवीन फीचर्सचे डिटेल्स देखील दिसणार आहेत. या नवीन अपडेटसह यूजर्सना Disappearing Message मध्ये मेसेज ठेवण्याच्या फीचर्सपासून ते GIF ऑटो प्ले सारखे फीचर्स देखील मिळणार आहेत. या शिवाय नवीन अपडेटमध्ये मल्टी-डिव्हाईस Companion mode चा देखील समावेश आहे.