WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. याची मूळ कंपनी meta आहे. Whatsapp आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणि अपडेट आणतच असते. आतासुद्धा कंपनीने एक नवीन अपडेट आणले आहे. हे नवीन अपडेट काय आहे, सध्या कोणाला वापरता येणार आहे आणि याचा उपयोग काय होणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
या फीचरच्या माध्यमातून एका वापरकर्त्याला आपली स्क्रीन दुसऱ्या वापरकर्त्याशी शेअर करता येणार आहे. कंपनी वापरकर्त्यांसाठी स्क्रीन शेअरिंग आणि टॅबच्या प्लेसमेंटसंदर्भात नेव्हिगेशन बारमध्ये फीचर लॉन्च करणार आहे. स्क्रीन शेअरिंग हे एक असे फीचर आहे जे झूम, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि स्काईप सारख्या अॅप्सवर देखील दिले जाते. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.




हेही वाचा : ChatGPT अॅप आयफोनवर कसे वापरायचे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स
अँड्रॉइडसाठी whatsapp बीटाच्या सिरीज २.२३.११.१९ वर whatsapp फिचरवर ठेवणाऱ्या WABetaInfo द्वारे स्पॉट केलेले , स्क्रीन शेअरिंग फिचर आयताकृती स्क्रीनवर एका बाणाच्या चिन्हाद्वारे दर्शवण्यात आले आहे. सध्या हे फिचर केवळ बीटा व्हर्जनसाठी लॉन्च केले जाणार आहे. नवीन अपडेट्स सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहेत. सध्या WhatsApp मध्ये आणलेले फीचर फक्त बीटा टेस्टर्ससाठी आणले आहेत.
हे फीचर कसे काम करणार ?
व्हॉट्सअॅपच्या नवीन स्क्रीन शेअरिंग फीचरबद्दल बोलायचे झाल्यास वापरकर्ते व्हिडीओ कॉलच्या दरम्यान त्यांची स्क्रीन शेअर करू शकणार आहेत. हे फिचर व्हिडीओ कॉल सुरु असतानाच वापरता येणार आहे. व्हिडीओ कॉल केला की खालील स्क्रीनवर हा पर्याय दिसणार आहे. दरम्यान, या नवीन फीचरचा वापर करण्यासाठी अँन्ड्रॉईडचे नवीन व्हर्जन असणे आवश्यक आहे. तसेच व्हिडिओ कॉल करणाऱ्या सर्वांकडे देखील अँन्ड्रॉईडचे नवीन व्हर्जन असणे आवश्यक आहे.