WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. whatsapp ची मूळ कंपनी ही मेटा आहे. whatsapp आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणत असते. आतासुद्धा कंपनीने एक नवीन फिचर आणले आहे. हे फिचर नक्की कोणते आहे आणि हे कोणासाठी सुरू करण्यात आले आहे याबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेटा व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसवर वापरकर्त्यांना एक नवीन फिचर देणार आहे. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी हे फिचर वेळ वाचवणारे व खूप कामाचे ठरणार आहे. असे फिचर मेटा इंस्टाग्रामवर आधीपासून देत आहे. दरम्यान कंपनी व्हॉट्सअ‍ॅप बिझनेसवर Status Archive हे फिचर देणार आहे. ज्याच्या मदतीने वापरकर्ते आपल्या स्टेटसला ३० दिवसांसाठी Archive करू शकणार आहेत. हे फीचर इंस्टाग्राम स्टोरी सारखे आहे जिथे यूजर्सना स्टोरी आर्काइव्ह करण्याचा पर्याय मिळतो.

हेही वाचा : एका महिन्यापेक्षा जास्तीची वैधता देणारा BSNL चा ‘हा’ रिचार्ज प्लॅन पाहिलात का? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपच्या डेव्हलपमेंटवर लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने याबद्दल माहिती दिली आहे. हे फिचर सध्या काही अँड्रॉइडच्या बीटा टेस्टर्ससाठी लॉन्च करण्यात आले आहे. या नवीन अपडेटमुळे व्यवसायाला फायदा होऊ शकतो. म्हणजेच एकाच जाहिरातीच्या फोटोला सारखे सारखे ग्राहकांचा शोध घेऊन पुन्हा पोस्ट करावा लागणार नाही. तुम्ही Archive फोल्डरमधून कधीही ते सहजपणे पोस्ट करू शकतात.

Status Archive चा वापर कसा करावा ?

Status Archive या नवीन फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करणे आवश्यक आहे. वापरकर्ते Status Archive फिचरसाठी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून अपडेट करू शकतात.

 कंपनीने एक नवीन अपडेट आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून एका वापरकर्त्याला आपली स्क्रीन दुसऱ्या वापरकर्त्याशी शेअर करता येणार आहे. कंपनी वापरकर्त्यांसाठी स्क्रीन शेअरिंग आणि टॅबच्या प्लेसमेंटसंदर्भात नेव्हिगेशन बारमध्ये फीचर लॉन्च करणार आहे. स्क्रीन शेअरिंग हे एक असे फीचर आहे जे झूम, गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि स्काईप सारख्या अ‍ॅप्सवर देखील दिले जाते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp rollout status archive feature for business and android beta users instagram check details tmb 01
First published on: 30-05-2023 at 13:07 IST