व्हॉट्सअ‍ॅप जगातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्संना विविध फिचर ऑफर करते. या माध्यमातून बरीच कामं सोपी होत असतात. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींचा वाढदिवस किंवा एखाद्या चांगल्या प्रसंगी शुभेच्छा देण्यास अनेकदा विसरता. अचानक काही कामामुळे ही बाब लक्षात येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅप अधिकृतपणे तुम्हाला कोणतेही फीचर देत नाही. पण तुम्ही थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीने हे करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरची मदत घ्यावी लागेल. कसे ते जाणून घेऊया.

  • सर्व प्रथम, तुम्हाला Google Play Store वरून SKEDit प डाउनलोड आणि स्थापित करावे लागेल.
  • आता तुम्हाला येथे साइन इन करण्यास सांगितले जाईल, तुम्ही Create account वर क्लिक देखील करू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही Facebook च्या मदतीने खाते देखील तयार करू शकता. असे करण्यापूर्वी तुम्ही अटी मान्य कराव्यात
  • तुम्ही साइन इन करताच तुम्हाला या अ‍ॅपमध्ये चार पर्याय दिसतील, त्यापैकी एक व्हॉट्सअ‍ॅप असेल.
  • आता WhatsApp वर क्लिक करा आणि खाली दिलेल्या DONE वर टॅप करा.
  • यानंतर तुम्हाला स्क्रीनवर पाच पर्याय दिसतील, येथे तुम्हाला शेड्यूल मेसेजची माहिती मिळेल.
  • आता व्हॉट्सअ‍ॅप निवडल्यानंतर, तुम्हाला ऍनेबल ऍक्सेसिबिलिटी पॉप अप वर टॅप करावे लागेल.
  • आता तुमच्या फोनची सेटिंग्ज ओपन होईल. येथे इंस्टॉल्ड सर्व्हिसेसवर टॅप करा आणि SKEDit वर टॅप करा आणि ते चालू करा. तुम्हाला एक पॉप-अप दिसेल त्याला परवानगी द्या.
  • आता तुमच्या समोर एक स्क्रीन उघडेल जिथून तुम्ही मेसेज शेड्यूल करू शकता.
  • येथे TO विभागात, तुम्ही ज्या व्यक्तीसाठी संदेश शेड्यूल करत आहात त्याचे नाव प्रविष्ट करा. पॉप-अप स्वीकारा. तुम्ही ओके केल्यावर लगेच व्हॉट्सअ‍ॅप उघडेल, तुम्हाला ज्याला इथे मेसेज करायचा आहे त्यावर टॅप करा, त्याचे नाव SKEDit अ‍ॅपवरील TO विभागात दिसेल.
  • आता वेळ, तारीख यासारखे तपशील निवडल्यानंतर वर दिलेल्या उजव्या चिन्हावर टॅप करा.

UPSC third topper Donuru Ananya Reddy told Virat Kohli is her inspiration
VIDEO : UPSC परिक्षेत तिसरा क्रमांक पटकावणारी अनन्या मानते कोहलीला आदर्श; म्हणाली, “विराटचा अ‍ॅटिट्यूड…”
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर