व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सना नवनव्या फिचर्सच्या माध्यमातून सुविधा मिळत असतात. आतापर्यंत नोटिफिकेशनमध्ये मॅसेज पाठवण्याऱ्याचा प्रोफाईल फोटो दिसत नव्हता. ही सुविधा आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही सिस्टमवर नव्हती. मात्र आता नोटिफिकेशन पाठवण्याऱ्याचा मॅसेजसह प्रोफाईल फोटो दिसणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने या वर्षी २०२२ मध्ये पहिला बदल केला आहे. हा फिचर सुरुवातीला फक्त आयओएस बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे.

आयओएस १५ चे युजर्स व्हॉट्सअ‍ॅप २.२२.१.१ बीटा वर्जन वापरत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप फिचर ट्रॅकर WABeta Info ने या संबंधित स्क्रीनशॉट आपल्या ब्लॉगवर शेअर केला आहे. यात लिहिलं आहे की, व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशन पाठवण्याऱ्याचा मॅसेजसह प्रोफाइल फोटोही दिसेल. याचा अर्थ आता चॅट आणि ग्रुप चॅटमध्ये मॅसेज आल्यास पाठवण्याऱ्याचा प्रोफाईल फोटोही दिसेल. WABetaInfo ने पुढे म्हटले आहे की. ज्या युजर्सचे व्हॉट्सअ‍ॅप खात्यावर अद्याप हे फीचर उपलब्ध नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. सध्या, व्हॉट्सअ‍ॅप अधिक खात्यांमध्ये हे फिचर सक्रिय करण्याचा विचार करत आहे. WABetaInfo ने सांगितले की, “सध्या काही लोकांना त्यांच्या WhatsApp खात्यावरील विशिष्ट नोटिफिकेशनमध्ये प्रोफाइल फोटो दिसत नाही. हे एक बीटा फिचर असल्याने, आम्ही लवकरच या सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

आयफोन स्वस्तात घ्यायचा आहे का?, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

दुसरीकडे, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहेत. युजर्संना त्यांच्या जवळील व्यवसाय सहजपणे शोधण्यात मदत होणार आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या फिचर्सचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo या प्लॅटफॉर्मच्या अहवालात म्हटले आहे की, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये “Businesses Nearby” नावाचा नवीन सेक्शन मिळू शकते. युजर्स या सेक्शनमध्ये रेस्टॉरंट्स, स्टोअर्स, किराणा दुकाने आणि इतर ठिकाणे पाहू शकतील. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवरून थेट ऑर्डर करू शकतील का? याबाबत स्पष्टता नाही. सध्यातरी संपर्क, स्थान अशी माहिती पाहू शकतील. हे फीचर अँड्रॉइडसाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटामध्ये दिसले आहे, लवकरच आयफोनमध्येही येण्याची शक्यता आहे. या फिचरवर सध्या काम सुरू आहे. रोलआउटसाठी कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.