scorecardresearch

WhatsApp Tips: तुमचं अकाउंट हॅक होण्यापासून कसं रोखायचं? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप हे भारतासह अनेक देशांमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. म्हणून यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स आणल्या आहेत. एकदा नक्की वापरून पाहा.

WhatsApp Tips: तुमचं अकाउंट हॅक होण्यापासून कसं रोखायचं? जाणून घ्या
(फाइल फोटो)

व्हॉट्सअ‍ॅप हे भारतासह अनेक देशांमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप आहे. या माध्यमातून लोक आवश्यक माहितीची देवाणघेवाण करतात. यासोबतच अनेक खासगी गोष्टीही या माध्यमातून केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत, आपले व्हॉट्सअ‍ॅप खाते सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. अलीकडे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक झाल्याचे सांगण्यात आले आहे. तुम्हालाही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते सुरक्षित ठेवायचे असेल आणि ते हॅकिंगपासून वाचवायचे असेल, तर तुम्ही या टिप्सचा वापर करू शकता.

End-to-end encryption
व्हॉट्सअ‍ॅप End-to-end encryption हे सुनिश्चित करतं की केवळ तुम्हीच तुमचे मेसेज वाचू शकता आणि त्यादरम्यान इतर दुसरं कुणीही म्हणे अगदी WhatsApp देखील मेसेज वाचू शकणार नाही. युजर्स ते वापरू शकतात. तुमच्या चॅटमध्ये WhatsApp End-to-end encryption आहे का ते तपासण्यासाठी, चॅट उघडा, ‘कॉन्टॅक्ट डिटेल्स’ स्क्रीन उघडण्यासाठी कॉन्ट२क्टच्या नावावर टॅप करा. त्यानंतर QR कोड आणि ६० अंकी क्रमांक पाहण्यासाठी एन्क्रिप्शन वर टॅप करा.

कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका
तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटवर पाठवली जात असलेली अशी कोणतीही लिंक उघडू नका, जी संशयास्पद असेल. नाहीतर तुम्ही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासली पाहिजे. याशिवाय, तुम्ही एकदा क्लिक करून याबद्दल जाणून घेऊ शकता. आपण कोणत्याही मोहक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. त्याची सत्यता तपासण्यासाठी, तुम्ही Google वर वेगवेगळे अहवाल पाहू शकता.

2-Step Verification
व्हॉट्सअ‍ॅपने ‘2-Step Verification’ फीचर आणले आहे. या फीचरमुळे तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटला अधिक सुरक्षितता मिळते. 2-Step Verification सक्षम करण्यासाठी, WhatsApp उघडा, सेटिंग्ज, अकाउंट वर जा, 2-Step Verification क्लिक करा आणि ते Active करा. व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला तुमचा योग्य ईमेल अ‍ॅड्रेस टाकण्यासही सांगतो. हे Active केल्यामुळे, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचे WhatsApp खाते उघडू शकणार नाही.

गोपनीय पर्याय निवडा
व्हॉट्सअ‍ॅप यना अनेक गोपनीयता पर्याय प्रदान करते. मेसेजिंग प्लॅटफॉर्म युजर्सना त्यांचे प्रोफाईल फोटो, स्थिती आणि इतर डिटेल्स कोणासोबत शेअर करायचे आहे ते निवडण्याचे पर्याय उपलब्ध करून देते. तुम्हाला फक्त चॅट करायचं आहे की नाही ते तुम्ही निवडू शकता. हे सेट केल्यानंतर, तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह केलेले फोन नंबरच तुमचा प्रोफाईल फोटो, स्टेटस, फोन नंबर आणि ऑटो-डिलीट स्टेटस पाहू शकतील.

आणखी वाचा : ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला UMIDIGI BISON GT2 स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

तुमचा फोन हरवल्यास तुमचे खाते बंद करा
तुमचा फोन हरवल्यास, तुम्ही WhatsApp खाते निष्क्रिय करू शकता. कारण दुसऱ्याने हात लावला तर तो तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवरून आवश्यक डेटा घेऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅप खाते निष्क्रिय करण्यासाठी, सेटिंग्जवर जा, अकाउंट डिलीट या ऑप्शनवर क्लिक करा, फोन नंबर प्रविष्ट करा आणि नंतर “डिलीट माय अकाउंट” वर क्लिक करा.

व्हॉट्सअ‍ॅप वेबमधून लॉग आउट करा
तुम्ही सायबर कॅफे किंवा ऑफिसमध्ये असाल, एखाद्या दुकानात डेस्कटॉपवर तुमचे WhatsApp खाते वापरत असाल, तर तिथून निघताना लॉग आउट करा. नाहीतर तुमच्या चॅट नंतर कोणीतरी वाचू शकेल. यासोबतच अनेक महत्त्वाची माहितीही घेता येईल.

व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन लॉक करा
Android वर उपलब्ध WhatsApp लॉक स्क्रीन पर्याय वापरून पहा. हे सुनिश्चित करेल की इतर कोणीही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते वापरू शकत नाही परंतु तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते उघडू शकता. फक्त सेटिंग्ज मेनू, गोपनीयता वर जा आणि नंतर स्क्रीन लॉक पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला तुमच्या फिंगरप्रिंटची नोंदणी करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक वेळी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप उघडाल तेव्हा तुम्हाला तुमचे फिंगरप्रिंट स्कॅन करावे लागेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2022 at 20:57 IST

संबंधित बातम्या