जगभरात सर्वात लोकप्रिय अ‍ॅप म्हणून व्हॉट्सअ‍ॅपची ओळख आहे. मेटा कंपनीचे हे सर्वांत जास्त वापरले जाणारे अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी अतिशय सोपं आणि झटपट चॅटिंगमुळे लोकप्रिय आहे. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यात वेळोवेळी बदल केले जातात. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांना आनंदी ठेवण्यासाठी, दररोज नवनवीन अपडेट आणत असते. या अपडेट्समध्ये वापरकर्त्यांना अनेक उपयुक्त फीचर्स मिळतात. आता आपल्या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप लवकरच नवीन ‘डू नॉट डिस्टर्ब’ API (अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) आणणार आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर वापरकर्त्यांला व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या कॉलची माहिती मिळू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Wabetainfo च्या ताज्या रिपोर्ट मध्ये या नवीन मिस्ड कॉल अलर्ट फीचरबद्दल माहिती मिळाली आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप लवकरच एक नवीन ‘डू नॉट डिस्टर्ब’ मिस्ड कॉल अलर्ट फीचर आणणार आहे. या नवीन अपडेटनंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वर मिस्ड कॉलची माहिती चॅटमध्ये मिळेल. व्हॉट्सअ‍ॅप कॉल किंवा मिस्ड कॉलची माहिती व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये अजूनही उपलब्ध आहे, परंतु या नवीन अपडेटनंतर, ‘डू नॉट डिस्टर्ब’चा नवीन अलर्ट प्राप्त होईल. ज्यानंतर व्हॉट्सॲप तुम्हाला ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोड चालू केल्यानंतर हा मिस्ड कॉल मिळाल्याचेही सांगेल.

आणखी वाचा :तुम्हालाही फेसबूकवर सतत अनावश्यक पोस्ट दिसतात का? ही ट्रिक वापरून मिळवा सुटका

या नवीन अलर्टचा स्क्रीनशॉटही रिपोर्टमध्ये शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत iOS बीटा वापरकर्त्यांना हे अपडेट मिळत होते, पण आता अँड्रॉईड व्हॉट्सॲप बीटा वापरकर्त्यांनाही हे फीचर मिळाले आहे. तसे, यावर आणखी काम सुरू आहे, जे काही काळानंतर वापरकर्त्यांसाठी आणले जाऊ शकते.

व्हॉट्सॲपवर अनेक नवीन फीचर्स येणार

व्हॉट्सॲप वर येत्या काळात उपलब्ध होणाऱ्या नवीन फीचर्समध्ये पोल, एडिट, व्हॉइस स्टेटस अपडेट, व्हॉट्सॲप अवतार फीचर या फीचर्सचाही समावेश आहे. अवतार फीचरमध्ये वापरकर्ते स्वतःचा अवतार तयार करू शकतात, मित्रांना स्टिकर्स पाठवू शकतात आणि प्रोफाइल फोटोवर त्यांचा अवतार टाकू शकतात. यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप लवकरच इन-ॲप सर्व्हे फीचर आणणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp to support do not disturb api for missed calls pdb
First published on: 26-09-2022 at 14:18 IST