scorecardresearch

मोबाईल डेटा संपल्यावरही Whatsapp करणार काम; जाणून घ्या इंटरनेटशिवाय कसा करता येणार वापर

तुमचा मोबाईल डेटा संपला असेल तरीही तुम्ही तुमच्या सेकंडरी डिव्हाइसवर म्हणजेच लॅपटॉप किंवा कंप्युटरवर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकता.

मोबाईल डेटा संपल्यावरही Whatsapp करणार काम; जाणून घ्या इंटरनेटशिवाय कसा करता येणार वापर
हे फीचर वापरून वापरकर्ते एकाच वेळी चार डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप सुरु करून चॅट करू शकतात. (Photo : reuters)

जगातील सर्वांत लोकप्रिय चॅटिंग अ‍ॅप्सपैकी एक असलेले व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर्स बाजारात आणत असते. त्यामधील एक फीचर म्हणजे तुमचा मोबाईल डेटा संपला असेल तरीही तुम्ही तुमच्या सेकंडरी डिव्हाइसवर म्हणजेच लॅपटॉप किंवा कंप्युटरवर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकता. जाणून घेऊया या फीचरबद्दल आणखी काही गोष्टी.

व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर मल्टी-डिव्हाइस सपोर्ट हे एक फीचर आहे. या फीचरचा वापर करून अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्ते मोबाईल डेटा नसतानाही आपल्या लॅपटॉप आणि इतर डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकतात. हे फीचर वापरून वापरकर्ते एकाच वेळी चार डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप सुरु करून चॅट करू शकतात. विशेष म्हणजे यासाठी आपल्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असण्याची आवश्यकता नाही.

रेल्वे रुळांमध्ये दगड का टाकले जातात माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक कारणे

या फीचरच्या मदतीने आपण लॅपटॉप, कंप्यूटर, मॅक किंवा फेसबुक पोर्टल यासारख्या प्लॅटफॉर्म्स किंवा डिव्हाइसवर लॉगिन करून मेसेज पाठवू किंवा मिळवू शकता. सेकंडरी डिव्हाइसवरही, व्हॉट्सअ‍ॅपने त्याचे एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचर लागू केले आहे, जेणेकरून व्हॉट्सअ‍ॅप किंवा कोणताही तृतीय पक्ष तुमचे संदेश वाचू किंवा पाहू शकत नाही.

सुरुवातीला या फीचरचा वापर करताना तुम्हाला तुमचा स्मार्टफोन सेकंडरी डिव्हाइसच्या आजूबाजूला ठेवणे आणि फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे होते. परंतु नव्या अपडेटमुळे सेकंडरी डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असताना आपला स्मार्टफोन आजूबाजूला नसेल आणि त्यात इंटरनेट कनेक्शन नसेल तरीही काही हरकत नाही. याचा फायदा असा की आपला फोन बंद असेल तरीही आपण इतर डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकतो.

आपल्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटला इतर डिव्हाइससोबत लिंक करण्यासाठी सर्वातआधी आपले व्हॉट्सअ‍ॅप नवीन व्हर्जनसोबत अपडेट करावे. यानंतर आपल्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप उघडावे आणि स्क्रीनच्या उजव्या बाजूला सर्वात वर तीन बिंदू असतील, त्यावर क्लिक करून समोर आलेल्या मेन्यूमधील ‘लिंक्ड डिव्हाइस’ हा पर्याय दिसेल.

Viral Video : कुत्र्याला वाचवण्यासाठी अंगावरचे कपडे काढून तो उतरला बर्फाळ नदीमध्ये; नंतर झाले असे काही…

‘लिंक्ड डिव्हाइस’ या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर ‘लिंक डिव्हाइस’ खाली तुम्हाला ‘मल्टी-डिव्हाइस बीटा’ पर्याय दिसेल. तुम्ही हा पर्याय निवडताच तुम्हाला ‘जॉइन बीटा’चा पर्याय दिसेल. हा पर्याय तुम्ही कधीही बंद करू शकता. यानंतर आपल्याला पुन्हा एकदा फोनवरून आपले डिव्हाइस स्कॅन करावे लागेल. अशाप्रकारे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर सक्रिय करू शकता. सध्या हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनसाठी सुरु करण्यात आले आहे. जर तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवरून एखादा मेसेज डिलीट केला तर दुसऱ्या कोणत्याही डिव्हाइसवर आपल्याला तो मेसेज पाहता येणार नाही. अद्याप हे फीचर आयफोनसाठी सुरु करण्यात आले नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या