एखादी महत्त्वाची फाईल, कॅमेरात काढलेले फोटो; तर जास्त एमबीचे व्हिडीओ कसे शेअर करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. एका स्मार्टफोनमधून दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये फाईल्स शेअर करण्यासाठी ब्ल्यूटूथ, क्विक शेअर हा पर्याय असतो. पण, सोशल मीडिया ॲप व्हॉट्सॲपवरूनसुद्धा फोटो, व्हिडीओ क्लिअर आणि ओरिजिनल स्थितीत पाठवण्यासाठी एचडी, डॉक्युमेंट असे पर्यायसुद्धा आहेत. पण, यासाठी अधिक मोबाइल डेटा वापरला जातो.

त्यामुळे व्हॉट्सॲप एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये वापरकर्ते इंटरनेट कनेक्शनशिवाय फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट इत्यादी शेअर करू शकतील. WABetaInfo नुसार, व्हॉट्सॲप सध्या या फीचरवर काम करीत आहे, जेणेकरून युजर्स इंटरनेटशिवाय डेटा सहज इतरांबरोबर शेअर करू शकतील आणि त्यांचा मोबाइल डेटासुद्धा सहज सेव्ह करू शकतील.

हेही वाचा…थंडगार हवा अन् वीज बचत दोन्ही हवंय? मग AC खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष; पैशांची होणार मोठी बचत

हे फीचर ब्लूटूथ enabled असणार आहे. ShareIt सारख्या ॲप्सप्रमाणेच ऑफलाइन फाइल्स – शेअरिंग प्रक्रिया सक्षम करण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या फोनचे ब्लूटूथ चालू ठेवावे लागेल. ॲण्ड्रॉइड स्मार्टफोन्सवर डिव्हाइस शोधण्यासाठी आणि स्थानिक फाइल्स शेअर करण्यासाठी ब्लूटूथ ऑन करावे लागेल. तसेच विना इंटरनेट फोटो एकमेकांना पाठवणे अत्यंत सुरक्षित असेल. डेटा शेअरिंग प्रक्रियेत सहभागी असलेल्या दोन्ही युजर्सचा डेटा सुरक्षित राहील आणि त्यात कोणतीही छेडछाड केली जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी शेअर केलेल्या फायली एन्क्रिप्ट केल्या जातील.

व्हॉट्सॲपच्या या फीचरची अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. पण, हे फीचर लवकरच रोल आउट केले जाईल. पण, सध्या ते त्याच्या बीटा चाचणी टप्प्यात आहे आणि वापरकर्त्यांसाठी लवकरच उपलब्ध होईल. व्हॉट्सॲपचे वापरकर्ते वारंवार विविध मीडिया फाइल्स आणि डॉक्युमेंट शेअर करत असतात, हे लक्षात घेता हे नवीन फीचर व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीस्कर ठरेल.