स्मार्टफोन निर्माता सॅमसंगने अलीकडेच गॅलेक्सी A53 स्मार्टफोन मिड-रेंजमध्ये सादर केला आहे. हा फोन मार्च २०२१ मध्ये लॉन्च झालेल्या Samsung Galaxy A52 डिव्हाइसचा अपग्रेड वर्जन आहे. या विभागातील नव्याने लॉन्च केलेला हा स्मार्टफोन इतर अनेक स्मार्टफोनशी स्पर्धा करतो. हा फोन OnePlus Nord 2 5G शी देखील स्पर्धा करतो, जो जुलै २०२१ मध्ये आणला गेला होता. येथे या दोन फोनबद्दल माहिती आहे, ज्याच्या आधारे तुम्ही ठरवू शकता की तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन अधिक चांगला असेल.

डिस्‍प्‍ले
Samsung Galaxy A53 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले आहे. जे 120Hz रिफ्रेश रेटसह O Infinity डिस्प्लेसह येते. दुसरीकडे, OnePlus Nord 2 5G स्मार्टफोनमध्ये 6.43 चा AMOLED डिस्प्ले आहे. हे 90Hz रिफ्रेश रेट देतं.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Former Shiv Sena MLA Mahadev Babar announced support for independent candidate Gangadhar Badhe
हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांचा मोठा निर्णय ! महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांंच्या अडचणी वाढल्या
campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर

प्रोसेसर आणि स्टोरेज
Galaxy A53 स्मार्टफोन ऑक्टा-कोर चिपसेटद्वारे समर्थित आहे, 6GB RAM सह जोडलेला आहे. डिव्हाइस 128GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज पॅक करते जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. OnePlus Nord 2 5G मध्ये 8GB पर्यंत RAM आणि 128GB UFS 3.1 स्टोरेजसह octa-core MediaTek Dimensity 1200 AI प्रोसेसर आहे.

आणखी वाचा : Redmi 10, Realme Narzo 50A आणि Samsung Galaxy M21 मध्ये कोणता बजेट फोन चांगला असेल, जाणून घ्या

कॅमेरा
Samsung Galaxy A53 5G क्वाड-रिअर कॅमेरा देते. ज्यामध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड सूटर, 5MP डेप्थ सेन्सर आणि 5MP मायक्रो सूटर देण्यात आला आहे. तर समोर 32Mp चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरीकडे, OnePlus Nord 2 ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP देण्यात आला आहे. याशिवाय, 8MP अल्ट्रा वाइड आणि 2MP मोनोक्रोम लेन्स आहे.

ऑपरेटिंग सिस्टम आणि बॅटरी
Samsung Galaxy A53 5G Android 12 सह One UI 4.1 वर चालतो. 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OnePlus Nord 2 5G Android 11 सह OxygenOS 11.3 वर चालतो. डिव्हाइस 4500mAh बॅटरी युनिटसह 65W जलद चार्जिंगला सपोर्ट करते.

आणखी वाचा : १० हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतोय Oppo A16e, जाणून घ्या डिटेल्स

किंमत
Samsung Galaxy A53 5G फोन 6GB + 128GB व्हेरिएंटसाठी ३६,९९० रुपयांना उपलब्ध आहे. OnePlus Nord 2 5G ची किंमत 8GB + 128GB व्हेरिएंटसाठी २९,९९९ रुपये देण्यात आली आहे.

कोणता फोन खरेदी करायचा?
चांगल्या कॅमेर्‍यांच्या बाबतीत Galaxy A53 5G फोन अधिक चांगला असू शकतो. हा मोबाईल क्वाड कॅमेरे ऑफर करतो. दुसरीकडे, OnePlus Nord 2 5G फोन उत्तम CPU परफॉर्मन्स आणि रॅम स्टोरेज देत आहे. पण, Galaxy A53 चे इंटर्नल स्टोरेज वाढवले ​​जाऊ शकते. जे Nord 2 5G मध्ये दिलेले नाही.