तंत्रज्ञानाचे जग खूप वेगाने बदलत आहे. यासोबतच स्मार्टफोनही चांगले मिळत आहेत. अवघ्या काही वर्षांतच स्मार्टफोनमध्ये बदल झालेला पाहायला मिळत आहे. स्मार्टफोन कंपन्या लागोपाठ याला आणखी चांगले करण्यावर काम करीत आहे. आगामी काळात स्मार्टफोन इतके हायटेक होतील की ते खिशात नसणार. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण नुकतचं मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी स्मार्टफोन २०३० पर्यंत नामशेष होणार असल्याचा असा दावा केला आहे. जाणून घेवूया नेमकं काय आहे प्रकरण…

बिल गेट्स यांनी स्मार्टफोनबद्दल एक गोष्ट सांगितली आहे. बिल गेट्स म्हणाले की, भविष्यात स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदललेला असेल. हा फोन इलेक्ट्रॉनिक टॅटूसारखा असेल. इलेक्ट्रॉनिक टॅटू अगदी लहान चिपसारखे बनतील आणि हे इलेक्ट्रॉनिक टॅटू शरीराच्या आत बसवले जातील.

(आणखी वाचा : भारतात येणाऱ्या चित्त्यांच्या गळ्यातील कॉलर आयडी कसं काम करते? जाणून घ्या ‘हे’ तंत्रज्ञान )

असा असेल भविष्यातील स्मार्टफोन

बिल गेट्सच्या म्हणण्यानुसार, भविष्यात स्मार्टफोनला खिशात घेऊन जाण्याची गरज भासणार नाही, तर स्मार्टफोन शरीरात इंटिग्रेट केला जाईल. म्हणजेच, स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक टॅटूमध्ये बदलेल. इलेक्ट्रॉनिक टॅटू ही एक प्रकारची चिप आहे. ही चिप मानवी शरीरात सहजपणे बसवता येईल. ही चीप दिसायला टॅटूसारखी असणार आहे. स्मार्टफोनची सर्व कामे हा इलेक्ट्रॉनिक टॅटू करणार आहे. इलेक्ट्रॉनिक टॅटू अर्थात चिप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला हातात स्मार्टफोन घेण्याची गरजच पडणार नाही, असे बिल गेट्स यांचे म्हणणे आहे.

नोकियाचे सीईओ काय म्हणाले?

यापूर्वी नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांनीही स्मार्टफोन हद्दपार होणार असल्याचा दावा केला होता. २०३० पर्यंत स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात अमूलाग्र बदल होणार आहेत. स्मार्टफोनचा यूजर इंटरफेस, स्मार्ट चष्मा आणि इतर उपकरणे येणार आहेत. यामुळे मोबाईलचा वापर कमी होणार आहे. सध्या स्मार्टवॉचमुळे मोबाईलचा वापर कमी झाला आहे. मसेज अलर्ट, कॉल अलर्ट यासह अनेक स्मार्टवॉच कॉलिंगची देखील सुविधा आहेत.