सप्टेंबर २०२३ मध्ये आलेला iPhone 15 घेण्यासाठी अनेक जण आतुर आहेत. मात्र, त्या फोनच्या किमती जास्त असल्याने काही ग्राहक कुठे डिस्काउंट किंवा ऑफर सुरू होत आहे का याची वाट पाहत असतात. आता ती संधी ग्राहकांना मिळणार आहे. कारण फ्लिपकार्टवर याच आयफोन १५ वर प्रचंड मोठी ऑफर सुरू आहे. या ऍपल उत्पादनाची मूळ किंमत ही ७९,९९० रुपये इतकी आहे. मात्र, त्यावर किती हजारांची सूट मिळू शकते ते पाहा. त्याआधी आयफोन १५ फोनबद्दल थोडी माहिती घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

iPhone 15 स्पेसिफिकेशन :

या फोनमध्ये ६.१ इंच स्क्रीन असणारा OLED डिस्प्ले बसवण्यात आला आहे. यामध्ये ४८ मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा सेन्सर आणि १२ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड प्रायमरी कॅमेरा बसवलेला आहे. याच्या कॅमेरामधून रात्रीच्या अंधारातदेखील उत्तम फोटो काढता येऊ शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार एका चार्जिंगमध्ये हा फोन दिवसभर सहज काम करू शकतो.
आयफोन १५ मध्ये A16 Bionic chip असा शक्तिशाली प्रोसेसर बसवलेला आहे.
इतर स्मार्टफोनमध्ये चार्जिंगसाठी सी पोर्ट दिलेला असतो, त्याचप्रमाणे या आयफोन १५ मध्ये सी टाईप यूएसबी पोर्ट देण्यात आलेला आहे.

हेही वाचा : अरेच्चा, Smartwatch आहे का स्मार्टफोन? ‘या’ डिव्हाईसमध्ये सोशल मीडिया ते गेमिंग सर्वांचा वापर करता येईल, पाहा…

आता या स्मार्टफोनची मूळ किंमत आणि त्यावर किती रुपयांची सूट मिळणार आहे ते पाहू.

ॲपलच्या आयफोन १५ ची मूळ किंमत ७९,९९० रुपये इतकी आहे. मात्र, फ्लिपकार्टच्या ऑफरमुळे आता ग्राहकांना हाच फोन ६९,९९९ रुपयांना मिळणार आहे.
इतकेच नव्हे, तर बँक ऑफरचा उपयोग केल्याने तुम्हाला हा फोन अजून स्वस्त दरात मिळवता येऊ शकतो.

फ्लिपकार्ट ऑफर

आयफोन १५ – १२८ जीबी हा ६६ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. म्हणजे जवळपास १३ हजारांचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो.
आयफोन १५ – २५६GB या मॉडेलची किंमत ७६ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे.
आयफोन १५ – ५१२GB हे मॉडेल ९६ हजार ९९९ रुपयांना ग्राहक विकत घेऊ शकतात.

हेही वाचा : केवळ ‘आवाजावर’ लिहिले जाणार E-mail? Draft with voice फीचर नेमके कसे काम करू शकते, जाणून घ्या….

याव्यतिरिक्त, बँक ऑफर्स आणि जुने फोन एक्स्चेंज करून अजून काही रुपयांचा फायदा करून घेऊ शकता.
ग्राहकांनी जर बँकेच्या कार्डचा वापर केला तर त्यावर अतिरिक्त दोन हजार रुपयांची सवलत मिळवता येऊ शकते.
तसेच जुना फोन एक्स्चेंज केल्यास तब्ब्ल ५४,९९० रुपयांची सूट घेऊ शकतात.
ग्राहक नो कॉस्ट इएमआय आणि UPI वरदेखील डिस्काउंट मिळवता येऊ शकते, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

आयफोन १५ हा गुलाबी, पिवळा, हिरवा, निळा आणि काळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Willing to buy apple iphone then check out the offer flipkart is big discount on iphone 15 amazing deal dha
First published on: 28-01-2024 at 21:33 IST