अ‍ॅप्पलने आपल्या आयफोनवर लाइटनिंग पोर्ट राखून ठेवला आहे. त्यात अनेक अभियंत्यांनी यूएसबी टाइप सी पोर्ट करून स्वतःचे बदल केले आहेत. यापैकी एका आयफोनचा आता आणखी एका महत्त्वाच्या वैशिष्ट्यासह लिलाव होणार आहे. हा जगातील पहिला पूर्णपणे वॉटरप्रूफ आयफोन असल्याचा दावा केला जात आहे. हा आयफोन Gernot Jöbstl यांनी विकसित केला आहे. यूट्यूबवरील व्हिडिओत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या फोनची निर्मिती अभियांत्रिकी विद्यार्थी केन पिलोनेल यांच्याकडून प्रेरणा घेऊन केली आहे. अलिकडेच त्याने आयफोन एक्सवर यूएसबी टाइप सी पोर्ट स्थापित केला होता. यात Jöbstl यांनी एक पाऊल पुढे जात वॉटरप्रुफ फोन तयार केला आहे. यासाठी त्याने स्वत:च्या आयफोन एक्सवर यशस्वी प्रयोग केला.

Jöbstl यांनी यासाठी आयफोनमध्ये वॉटरप्रूफ यूएसबी टाइफ सी पोर्ट वापरला. त्याचबरोबर काही सुपर ग्लू डिव्हाइसच्या आत बाजूस वापरले. त्यानंतर प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याने वाहत्या पाण्याखाली फोन ठेवून वॉटरप्रूफ असल्याचं सिद्ध करून दाखवलं. इतकं पाणी टाकूनही फोन व्यवस्थितरित्या सुरु असल्याचं दिसत आहे. Jöbstl ने Type-C केबल वापरून फोनला लॅपटॉपशी कनेक्टही केलं आणि पोर्टचे कार्य देखील दाखवलं. iPhone X लॅपटॉपद्वारे चार्ज होताना व्हिडिओत दिसत आहे. तसेच त्याची माहिती लॅपटॉपवर देखील प्रदर्शित होत आहे. या फोनचा १९ जानेवारीला लिलाव होणार असून यामागच्या संकल्पेनाचा पुरावा देखील दिला जाणार आहे. Jöbstl ने त्याच्या युट्यूब व्हिडिओमध्ये नमूद केले आहे की, तो नमूद केलेल्या तारखेला “जगातील पहिल्या वॉटरप्रूफ Usb-C iPhone” चा लिलाव करणार आहे. या लिलावाची माहिती त्याच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये दिली जाईल.

pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
India is the third most polluted country in the world What are the potential dangers of this
विश्लेषण : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश! यातून कोणते धोके संभवतात?
Yukta Biyani nanded girl youngest pilot
नांदेडच्या युक्ताची गरुडझेप; देशातील सर्वात तरूण वैमानिकाचा मिळवला मान

वॉटरप्रुफ आयफोनच्या किंमतीबद्दल तुम्हाला उत्सुकता असेल. तर Jöbstl याने पिलोनेलच्या यूएसबी टाइप सीकडून प्रेरणा घेत हा फोन तयार केला. पिलोनेलचा यूएसबी टाइफ सी फोन जवळपास ६४ लाखांना लिलावात विकला गेला. यावरून या फोनचा लिलाव किती लागेल याचा अंदाज बांधता येईल. वॉटरप्रूफ फोन असल्याने लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. मात्र हा फोन जरी विकला गेला तरी त्याला वॉरंटी नसेल हे लक्षात घेणंही गरजेचं आहे. कारण या फोनचं संपूर्ण हार्डवेअर निर्मात्याने बदललं आहे.