Apple चा या वर्षातील सर्वात मोठे WWDC इव्हेंट पार पडला. या इव्हेंटची सुरूवात सीईओ टीम कूक यांच्या भाषणाने झाली. कंपनीने Os १७ , मॅकबुक एअरसह अनेक प्रॉडक्ट्स लॉन्च केली आहेत. तसेच यामध्ये Apple Air Pods पण लॉन्च करण्यात आले आहे. जे वापरकर्त्यांना चांगला ऑडिओ अनुभव प्राप्त करून देईल व गाणी ऐकण्याचा आनंद देखील मिळेल. या नवीन Air Pods बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Air Pods चे फीचर्स

वापरकर्त्यांना चांगला ऑडिओ ऐकायला मिळावा यासाठी या फीचरला तयार करण्यात आले आहे. Air ड्रॉप्स हे Transparency आणि अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फीचरचा एकत्रितपणे वापर करते. यामुळे वापरकर्ते बाहेरील कोणत्याही आवाजाशिवाय गाणी ऐकण्याचा अनुभव घेता येणार आहे.

Personalized Volume या फीचरमध्ये लर्निंग टेक्नॉलॉजीचा सपोर्ट देण्यात आला आहे. हे फिचर वापरकर्त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाचा अभ्यास करून त्यांना ऑडिओला फाईन ट्यून करते. ज्यामुळे वापरकर्त्यांना चांगला आणि स्पष्ट आवाज ऐकायला मिळतो. याबाबतचे वृत्त techlusive ने दिले आहे.

हेही वाचा : तब्बल २० लाखांपेक्षा अधिक कुटुंबांना मिळणार मोफत इंटरनेट सेवा; भारतातील ‘या’ राज्याने केली मोठी घोषणा

तसेच Conversation Awareness हे फिचर आवाज कमी करून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज वाढवते ज्यामुळे वापरकर्ते बाहेरील आवाजाच्या त्रासाशिवाय फोनवर बोलू शकतात. हे फिचर वापरकर्त्यांना फार उपयोगी पडेल असे कंपनीचे म्हणणे आहे. एअर ड्रॉप्समधील Automatic Switching या फीचरमुळे वापरकर्ते Apple डिव्हाइसमधून AirPods वर सहजपणे स्विच करू शकतात.

हेही वाचा : जुलै महिन्यात होणार सॅमसंगचा ‘Unpacked’ इव्हेंट, ‘हे’ दोन भन्नाट फोल्डेबल फोन लॉन्च होण्याची शक्यता

Mute or Unmute फीचर

या फीचरच्या मदतीने आता एअरपॉड्स प्रो (पहिली आणि दुसरी जनरेशन), एअरपॉड्स (तिसरी जनरेशन) आणि एअरपॉड्स मॅक्सचे वापरकर्ते स्टीम किंवा डिजिटल क्राऊन प्रेस करून ऑडिओ म्यूट किंवा अनम्यूट करू शकणार आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wwdc apple announced new features in airpods adaptive audio and conversation awareness check details tmb 01
First published on: 07-06-2023 at 14:41 IST