Xiaomi 13 Pro launched in India:: Xiaomi ही एक मोबाईल उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन स्मार्टफोन्स बाजारपेठेमध्ये लॉन्च करत असते. बार्सिलोनो येथे होणाऱ्या या वर्षातील सर्वात मोठ्या मोबाईल शो मध्ये कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. शाओमीने त्यांचा Xiaomi 13 Pro हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केला आहे. शाओमीचा हा दुसरा फ्लॅगशिप स्मार्टफोन असून या फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स काय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.

शाओमी ने MWC २०२३ मध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला असून, हा फोन तयार करण्यासाठी कंपनीने जर्मनीमधील कॅमेरा मेकर कंपनी Leica सोबत पार्टनरशिप केली आहे. हा कंपनीचा दुसरा स्मार्टफोन आहे ज्यात ‘Leica’ लेन्स वापरण्यात आली आहे. पण गेल्या वर्षी लॉन्च झालेला Xiaomi 12S चीनच्या बाहेर इतर मार्केटमध्ये लॉन्च झाला नव्हता. मात्र २०२३ मध्ये कंपनीने या ट्रेंडमध्ये बदल केला आहे आणि Xiaomi 13 Pro जागतिक बाजारपेठेमध्ये लॉन्च केला आहे.

Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

हेही वाचा : MWC 2023: ‘या’ ठिकाणी होणार सर्वात मोठा मोबाईल शो, लॉन्च होणार अनेक कंपन्यांचे SmartPhones

Xiaomi 13 Pro चे फिचर्स

Xiaomi 13 Pro या स्मार्टफोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांसाठी ५० मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा सेन्सर दिला आहे. फोनमध्ये सोनी IMX989 चा एक इंच सेन्सर मिळतो. हा सेन्सर आधी Xiaomi 12S Ultra स्मार्टफोन मध्ये देखील देण्यात आला आहे. कंपनीने प्रायमरी कॅमेऱ्यावर अधिक स्टेबल फोटोंसाठी Leica Vario-Summicron Lens (23mm) हा सेन्सर दिला आहे. रिअर कॅमेरे हे नाईट मोडमध्ये पोर्ट्रेट कॅमेऱ्याने सपोर्ट करतात. प्रायमरी कॅमेऱ्याने ८K क्वालिटीमध्ये इतके व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील करता येणार आहे.

याशिवाय या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स देखील देण्यात आला आहे. जो 5mm Leica फ्लोटिंग टेलीफोटो लेन्स आणि OIS सह येतो. याशिवाय, फोनमध्ये 14 मिमी लीका लेन्स सिस्टमसह 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी वापरकर्त्यांना ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

हेही वाचा : MWC 2023: केवळ १० मिनिटांमध्ये १०० टक्के चार्ज होणार Realme चा ‘हा’ जबरदस्त फोन, जाणून घ्या फीचर्स

Xiaomi 13 Pro मध्ये ६.७३ इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला असून त्यात २K रिझोल्युशन ऑफर करण्यात आले आहे. कंपनीने या फोनमध्ये LTPO 3.0 स्क्रीन वापरली आहे आणि फोनमध्ये १ Hz ते १२० Hz पर्यंत रीफ्रेश रेट देणारी स्क्रीन आहे. तसेच हा फोन डिस्प्ले डॉल्बी व्हिजनसह येतो. यामध्ये 3D बायो-सिरेमिक रिअर पॅनल आहे. फ्रंट पॅनलच्या सेफ्टीसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देण्यात आली आहे. या फोनचे वजन हे २२९ ग्रॅम इतके आहे.

Xiaomi 13 Pro ची किंमत

या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला ४८२० mAh ची बॅटरी आणि त्याला १०W चा रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो. स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्पीकर्स आहेत जे डॉल्बी अ‍ॅटमॉस सर्टिफिकेशनसह येतात. Xiaomi 13 Proहा फोन Ceramic White and Ceramic Black या रुग्णामध्ये खरेदी करता येणार आहे. या फोनची किंमत कंपनीने १,२९९ युरो म्हणजे भारतात त्याची किंमत १,१४,००० रुपये इतकी आहे.