Xiaomi Pad 6S Pro चे लवकरच चीनमध्ये अनावरण /लाँच होणार आहे. या नव्या टॅबचे काही फीचर्स आई स्पेसिफिकेशनबद्दल कंपनीने स्वतःहून माहिती उघड केली आहे. Xiaomi Pad 6 या मॉडेलचे डिझाइन हे या सीरिजमधील आधीच्या मॉडेल्ससारखेच आहे. Xiaomi Pad चा केवळ बेस व्हेरिएंट भारतामध्ये सादर करण्यात आला आहे. मात्र, Xiaomi Pad 6S Pro आपल्या भारतात कधी लाँच होईल याबद्दलची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही. शाओमोचा हा टॅबलेट किती वाजता लाँच होणार आहे आणि याचे फीचर्स, स्पेसिफिकेशन काय आहे ते पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाओमी कंपनीने Xiaomi Pad 6S Pro २२ फेब्रुवारी रोजी, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता [भारतीय वेळेनुसार ४:३० वाजता] लाँच करणार असल्याची माहिती Weibo पोस्टमध्ये दिली आहे.

हेही वाचा : Smartphone ते टीव्ही कोणतेही उपकरण मिनिटांमध्ये चार्ज करेल ‘ही’ पॉवर बँक! किंमत पाहा

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

हा टॅब पॉवर्डबाय Qualcomm’s Snapdragon 8 Gen 2 SoC असून, शाओमीच्या नव्या HyperOS out-of-the-box वर काम करेल. कंपनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये या टॅबचा कीबोर्ड मॅग्नेटिक सपोर्ट कीबोर्ड असणार असल्याचे दिसते.

Xiaomi Pad 6S Pro मध्ये १२.४ इंचाचा LCD पॅनेल असेल, ज्याचे रेझोल्यूशन 3K, १४४Hz रिफ्रेश रेट आणि ३:२ हा अस्पेक्ट रेशो असणार आहे. हा टॅबलेट १२०W एवढ्या जलद गतीच्या वायर चार्जिंगला सपोर्ट करेल, अशी आत्तापर्यंत माहिती कंपनीने दिली असल्याचे gadgets360 च्या एका लेखावरून समजते.

याआधी लीक झालेल्या माहितीनुसार, Xiaomi Pad 6S Proमध्ये २४GB रॅम आणि १ TB ऑनबोर्ड स्टोरेज असण्याची शक्यता आहे. तसेच कदाचित यामध्ये १०,०००mAh एवढ्या शक्तीची बॅटरी आणि ५० मेगापिक्सेल प्रायमरी रिअर कॅमेरादेखील असू शकतो.

हेही वाचा : Nothing Phone 2a किंमत, फीचर्स अन् स्पेसिफिकेशन लाँचआधीच आले समोर? जाणून घ्या…

Xiaomi Pad 6S Pro हा टॅब, आधीच्या Xiaomi Pad 6 Pro पेक्षा थोडा महाग असेल असे म्हटले जात आहे.
चीनमध्ये Pad 6 Pro ची ८GB + १२८GB या मॉडेलची किंमत अंदाजे २८,५००/- रुपये अशी आहे.
तर, ८GB + २५६GB या मॉडेलची अंदाजे किंमत ३२,०००/- रुपये इतकी आहे.
१२GB + २५६GB या मॉडेलची अंदाजे किंमत ३५,७००/- रुपये इतकी आहे.
आणि १२GB +५१२GB या मॉडेलची अंदाजे किंमत ३९,०००/- रुपये इतकी आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xiaomi pad 6s pro launch date is confirmed where and when this launch will happen what are the features check out dha
First published on: 19-02-2024 at 17:50 IST