Xplore Lifestyle ने भारतातील ग्राहकांसाठी मेडिकल ग्रेड देणारी स्मार्टवॉच लॉंच केली आहे, या घड्याळाचे सर्वात मोठे फीचर म्हणजे ते युजर्सच्या हृदयाच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवते. या स्मार्टवॉचबद्दल असा दावा करण्यात आला आहे की हे घड्याळाच्या स्वरूपात जगातील पहिलं मेडिकल ग्रेड मॉनिटरिंग डिव्हाईस आहे, जे इस्रायली कंपनी कार्डियाकसेन्सच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे. ही लेटेस्ट स्मार्टवॉच इतकी सक्षम आहे की ती सामान्य हृदयाची गती (धडधडणे) आणि असामान्य हृदयाचे ठोके (अॅरिथमिया) विशेषत: अॅट्रियल फायब्रिलेशनमध्ये तफावत दाखवू शकते.

या घड्याळात दिलेला ऑप्टोमेकॅनिकल सेन्सर PPG, ECG आणि आर्टिफिशियल सेंसिंग टेक्नोलॉजी आणि अॅडवान्स्ड अल्गोरिदमच्या कॉम्बिनेशनने काम करत असताना, हे घड्याळ हृदयाचे बीट-बाय-बीट शोधते आणि वाचते. यामुळेच हे घड्याळ Arrhythmia सारख्या AFib ला डिटेक्ट करते आणि रुग्णाच्या कुटुंबीयांना आणि डॉक्टरांना त्वरित सूचित करते. हे घड्याळ ज्या रुग्णांना बीपी म्हणजेच उच्च रक्तदाब, क्रॉनिक हार्ट फेल्युअर आणि हृदयाशी संबंधित इतर समस्या आहेत त्यांच्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.

आणखी वाचा : आता स्मार्टफोनऐवजी साबण मिळणार नाही! Flipkart ने आणले हे खास फिचर

केवळ घड्याळ इतकं प्रगत आहे की केवळ हृदयच नव्हे तर श्वासोच्छवासाची गती मोजण्यात आणि स्लीप एपनिया सारख्या समस्यांचा मागोवा घेण्यासही सक्षम आहे. आजपर्यंत जगात असे एकही घड्याळ तयार झालेले नाही ज्यामध्ये श्वासोच्छवासाचा दर वाचण्याचे फीचर असेल.

आणखी वाचा : ड्युअल कॅमेराचा Infinix Smart 6 Plus ८ हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉंच!

किंमत आणि उपलब्धता
या घड्याळाची निर्मिती इस्रायलमध्ये करण्यात आली असून या घड्याळाची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल सांगायचे झाले तर, या घड्याळाच्या पहिल्या टप्प्याची विक्री सप्टेंबरपासून सुरू होईल.