Valentine 2023: व्हॅलेंटाइन डे अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. फेब्रुवारी महिना म्हटलं की अनेक तरुण-तरुणींना एकच गोष्ट खुणावत असते ती म्हणजे व्हॅलेंटाइन डे आणि तो दिवस कसा साजरा करायचा याचं प्लॅनिंग अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे करत करतात. शिवाय आपल्या आवडत्या व्यक्तीला या दिवशी छान गिफ्ट देऊन सरप्राइज देण्याचा विचार अनेकजण करतात. पण जसा जमाना बदलला तशी मुला-मुलींची आवडदेखील बदलली आहे. मात्र अनेक जण हे अजूनही जोडीदाराच्या शोधात आहेत. जर तुम्ही जोडीदाराच्या शोधात असाल तर भारतात काही डेटिंग अ‍ॅप्स आहेत जिथे तुम्ही तुमच्या जोडीदाराचा शोध घेऊ शकता.

Bumble

तुम्ही जर का फेक प्रोफाइल आणि अनावश्यक स्वाईप्समुळे कंटाळले असाल तर तुम्ही Bumble App तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. हे एक फ्री डेटिंग अ‍ॅप आहे. त्यावरून तुम्ही व्हिडीओ कॉल देखील करू शकता. यात तुम्हाला डेट , बीएफएफ, बिझ असे तीन मोड मिळतात. खास गोष्ट म्हजे यामध्ये महिला प्रथम बोलणे सुरु करतात.

Bathed with alcohol took off shirt and danced on roof of the car video
VIDEO: कारच्या बोनेटवर बसून गुंडांचा हैदोस; भररस्त्यात कपडे काढून दारुनं अंघोळ घातली, तेवढ्यात पोलिसांची एन्ट्री अन्…
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर

Tinder

डेटिंगचे ऑनलाइन जग हे टिंडर अ‍ॅप अपूर्ण आहे. हे अ‍ॅप भारताबाहेर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. वापरकर्त्यांसाठी हे अनुकूल असे इंटरफेस ऑफर करतो. यामध्ये जाहिराती दिसण्याचे प्रमाण देखील कमी आहे. याच्या प्रीमियम प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड स्वाईप, फिल्टर , ट्रॅव्हल मोड , जाहिराती हाईड करणे आणि तुमचे प्रोफाइल कंट्रोल करणे असे अनेक फायदे मिळतात.

हेही वाचा : Valentine’s Day: iPhone खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ मॉडेलवर मिळतेय तब्बल ३० हजारांची सूट

Hinge

Hinge हे डेटिंग अ‍ॅप युजर इंटरफेससह येते. त्यामध्ये हे अ‍ॅप bio सारखे फिचर देखील वापरकर्त्यांना वापरण्यास देते. वापरकर्ते फोटोज आणि बोलणे तोडणाऱ्यांवर कमेंट देखील करू शकतात. याद्वारे तुम्ही तुमच्या आवडीचे लोक शोधू शकता.

Happn

तुम्ही Happn या अ‍ॅपबद्दल नक्कीच ऐकले असेल. ज्यांनी याबद्दल ऐकले नसेल त्यांना हे सांगा की हे अ‍ॅप रस्त्यात चालणाऱ्या माणसांशी तुमचे नाते जोडते. मात्र लॉकडाऊननंतर हॅपनने ददेखील टिंडरप्रमाणे काम करण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही या अ‍ॅपच्या माध्यमातून तुमच्या जोडीदारासोबत व्हिडीओ कॉल आणि टेक्स्ट चॅट करू शकतात.

Aisle

तुम्हाला जर खरोखरच एखादे खरे नाते हवे असेल तर आणि तुम्ही डेट करण्याच्या बाबतीत गंभीर असाल तर, तुम्ही हे अ‍ॅपचा वापर करून पाहू शकता. मात्र सत्य आणि गांभीर्य याचा दावा अन्य कोणी केला नसून केवळ Aisle अ‍ॅपनेच केला आहे. या द्वारे तुम्ही दुसऱ्या शहरातील प्रोफाइलही लाईक करू शकता. तर काही अ‍ॅप्समध्ये ही सुविधा केवळ प्रीमियम घेतलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

टीप – वरील पाच डेटिंग अ‍ॅपचा वापर हा वापरकर्त्यांनी आपल्या जबाबदारीवर करावा.