Twitter हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून तुम्ही तुमचे विचार किंवा मत ट्विट करू शकता. मात्र काही दिवसांपूर्वीच ट्विटरने व्हेरीफाईड अकाउंटसाठी ब्लू टिक साठी पेड सर्व्हिस सुरु केली आहे. मात्र ट्विटरचा वापर करणारे अनेक वापरकर्त्यानी अजूनही प्रीमियम सर्व्हिस घेतली नाही ते वापरकर्ते त्याच्या अकाउंटच्या सुरक्षेबद्दल चिंतेत आहेत. ज्यांनी प्रीमियम सर्व्हिस घेतलेली नाही त्यांना कंपनीकडून एक पॉप अप मेसेज पाठवला जात आहे.

या वापरकर्त्यांना पाठवण्यात येणाऱ्या मेसेजमध्ये Two Factor Authentication द्वारे ट्विटर ब्लू टीकेचे सब्स्क्रिप्शन घेण्याचा इशारा देण्यात येत आहे. म्हणजेच पेड सब्स्क्रिप्शनशिवाय वापरकर्त्यांच्या अकाउंटला सिक्युरिटी फिचर दिले जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे. इतकेच नाही तर, वापरकर्त्यांची अकाउंट १९ मार्चनंतर लॉक केले जाणार आहे. तुम्हीसुद्धा ट्विटर वापरत असाल आणि अशा मेसेजेसमुळे तुम्हाला त्रास होत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. तुम्ही पैसे न भरताही तुमचे अकाउंट पूर्णपणे सुरक्षित ठेवता येणार आहे.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
BOI Officer Recruitment 2024
BOI Officer Recruitment 2024: बँक ऑफ इंडियाद्वारे १४३ पदांसाठी होणार भरती, १० एप्रिलपूर्वी करा अर्ज
MS Dhoni removed his helmet when fans asking for it
चाहत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धोनीने केले असे काही… एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच

हेही वाचा : Tech Layoff मध्ये TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नोकरी तर जाणार नाहीच पण…

ट्विटर अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही Authentication अ‍ॅपवर अवलंबून राहू शकता. अ‍ॅपच्या मदतीने पासवर्डशिवाय अकाउंट सुरक्षित केले जाऊ शकते. तुमचे ट्विटर अकाउंट सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर Authentication अ‍ॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. हे प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवरून डाउनलोड करता येणार नाही. याशिवाय Google आणि microsoft चे वापरकर्ते नसतानाही तुमच्याकडे Authy, Duo Mobile आणि 1 Password हे पर्याय उपलब्ध आहेत.

१. डिव्हाइसवर अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर ट्विटर ओपन करावे.

२. यानंतर Settings and privacy या पर्यायावर क्लीक करा.

३. तसेच यानंतर Security and account access वर क्लिक करावे.

४. तिथे क्लिक केल्यावर Authentication app सिलेक्ट केल्यावर तेथील सूचना फॉलो कराव्यात.

५. पूर्ण सेटअप केल्यानंतर वापरकर्ता ऑटो जनरेट झालेल्या कोडचा वापर करू शकतो. अकाउंट लॉग इन करताना कोडचा उपयोग केला जाऊ शकतो.