सोशल मीडिया अ‍ॅप्समध्ये फेसबुकचे नाव सर्वात आधी येते. फेसबुक हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे की, जे लहान-मोठ्या सर्व वयोगटातील लोकांना माहिती आहे. तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल, तर तुमचेही फेसबुक अकाउंट नक्कीच असेल. आज आपण फेसबुकच्या नवीन अपडेटबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये एक जबरदस्त फीचर रिलीज होणार आहे. या फीचरमध्ये विशेष काय आहे आणि ते कसे वापरले जाऊ शकते ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेसबुकची मूळ कंपनी, मेटाने अलीकडेच एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांनी आपल्या युजर्सची प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे, जी पूर्वी डेटा पॉलिसी म्हणून ओळखले जात होती. यासंबंधी ते त्यांच्या युजर्सना नोटिफिकेशन्स पाठवत आहेत. ही प्रायव्हसी पॉलिसी युजर्सच्या फीडबॅकवर आधारित अपडेट केली गेली आहे आणि त्यात नवीन फिचर समाविष्ट आहेत. या फिचरमुळे, युजर्स त्यांच्या फेसबुक पोस्ट अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतील, म्हणजेच ते मित्रांमध्ये देखील पोस्ट कोण पाहू शकतात आणि कोण पाहू शकत नाहीत हे निवडू शकतील. या फिचरबद्दल अजून माहिती घेऊयात.

आता अ‍ॅप न उघडताच होणार पेमेंट; जाणून घ्या Google Pay चे नवे फीचर

मेटाच्या ब्लॉग पोस्टमध्येही या नवीन फिचरचा उल्लेख करण्यात आला आहे. हे फीचर रिलीज होत असून युजर्स खूप खुश आहेत. या नवीन फीचर अंतर्गत तुम्ही तुमच्या कोणत्याही पोस्टचे सेटिंग बदलू शकता. युजर्स आपल्या मित्रांपैकी कोण ते पोस्ट पाहू शकेल हे निवडू शकतात. हे नवीन वैशिष्ट्य विशेष आहे कारण ते वेगवेगळ्या पोस्टसाठी वापरता येऊ शकते आणि यात कॉमन सेटिंग ऑप्शन नसेल.

हे फीचर वापरण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर फेसबुक अ‍ॅप उघडा, त्यानंतर स्क्रीनच्या उजव्या बाजूला, वर दिलेला पर्याय निवडा. यानंतर, ‘सेटिंग्ज’ वर क्लिक करा, नंतर ‘प्रायव्हसी’ पर्यायावर जा आणि नंतर ‘अ‍ॅक्टिव्हिटी फीड’ वर जा. येथे ‘Who can see your future posts’ या प्रश्नावर क्लिक करून, ‘एडिट’ हा पर्याय निवडा. येथून तुम्ही तुमच्या पोस्टचे प्रेक्षक तुमच्या स्वतःच्या आवडीनुसार निवडू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Your post can also be hidden from your friends on facebook users are happy to see the new feature pvp
First published on: 27-05-2022 at 19:57 IST