scorecardresearch

Premium

YouTube कंटेंट क्रिएटर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ अ‍ॅपच्या मदतीने अनेक भाषांमध्ये डब करता येणार व्हिडीओ

You Tube हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ, शॉर्ट्स अपलोड करू शकतो.

creators dub video help ai tool
YouTube क्रिएटर्सना आता आपले व्हिडीओ अनेक भाषांमध्ये डब करता येणार आहेत. (Image Credit- Financial Expres)

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. प्रत्येक जण सोशल मीडियाचा वाप[आर करत असतो. तसेच काही प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पैसे देखील कमवता येतात. यामध्ये You Tube हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ , शॉर्ट्स अपलोड करू शकतो. तिथे अनेक चॅनेल्स आपल्याला पाहायला मिळतात. युट्युब सध्या एका नवीन टूल ची चाचणी करत आहे. जे क्रिएटर्सना AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करून आपले व्हिडीओ ऑटोमॅटिक डब करण्यास मदत करेल. कंपनीने गुरूवारी VidCon येथे याबद्दलची घोषणा केली. युट्युबने AI संचालित डबिंग सेवा Aloud बरोबर एकत्रितपणे काम केले जे Google च्या इन-हाऊस इनक्यूबेटर एरिया १२० चा भाग आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला युट्युबने अनेक भाषांमध्ये ऑडिओ ट्रॅकला समर्थन केले होते. जे क्रिएटर्सना त्यांच्या नवीन आणि आधीपासून असलेल्या व्हिडिओमध्ये डबिंग जोडण्याची परवानगी देते. ज्यमुळे क्रिएटर्सना आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. जून २०२३ पर्यंत क्रिएटर्सनी ७० पेक्षा जास्त भाषांमध्ये १० हजारांपेक्षा जास्त व्हिडीओ डब केले आहेत. याबाबतचे वृत्त techcrunch ने दिले आहे.

Honor 90 to be available discounted price on amazon great indian festival sale
Amazon Great Indian Festival Sale 2023: २०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या Honor च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार ११ हजारांचा डिस्काउंट, ऑफर्स पाहाच
Buy google pixel 7a rupees 4,700 rs flipkart big billion days sale
४,७०० रुपयांमध्ये खरेदी करा Google Pixel 7a; ‘या’ प्लॅटफॉर्मवर मिळतेय आकर्षक ऑफर, एकदा पाहाच
flipkart big billion days sale 2023
Flipkart Big Billion Days 2023: इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सवर मिळणार ८० टक्के डिस्काउंट; कधीपासून सुरू होणार सेल?
iphone 15 series india price comparsion to usa dubai and china
अमेरिका, दुबई, जपानपेक्षा iPhone 15 Series भारतात स्वस्त आहे की महाग? जाणून घ्या किंमत

हेही वाचा : Youtube Video Monetization: ५०० सबस्क्रायबर्स असणाऱ्या चॅनेल्सला देखील कमवता येणार पैसे, YouTube ने नियमांमध्ये केले बदल

पूर्वी क्रिएटर्सना त्यांचे ऑडिओ ट्रॅक तयार करण्यासाठी थर्ड पार्टी डबिंग प्रोव्हायडर्सेसशी थेट पार्टनरशिप करावी लागत होती. जी वेळखाऊ आणि महाग अशी प्रक्रिया होती. Aloud त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय व्हिडीओ डब करू देते. गुगलने २०२२ मध्ये सर्वात प्रथम Aloud सादर केले. AI आधारित डबिंग प्रॉडक्ट किएटर्ससाठी व्हिडीओला ट्रांसस्क्रिप्ट करते. त्यानंतर भाषांतर करते आणि डब केलेले व्हर्जन तयार करते. Aloud द्वारे डब तयार करण्याआधी क्रिएटर्स ट्रान्सक्रिप्शनचे पुनरावलोकन आणि एडिट करू शकतात.

युट्युबचे क्रिएटर प्रॉडक्टचे उपाध्यक्ष अमजद हनिफ यांनी सांगितले, ”युट्युब शेकडो क्रिएटर्ससह टूल चे टेस्टिंग करत आहे. कंपनी लवकरच या टूलला सर्व क्रिएटर्ससाठी सुरू करेल. Aloud सध्या इंग्रजी, स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषेमध्ये उपलब्ध आहे. तथापि भविष्यात त्यामध्ये हिंदी आणि बहासा इंडोनेशियन यांसारख्या भाषांचा समावेश केला जाईल.”

हेही वाचा : गुगल पे, पेटीएमसह अन्य यूपीआय पेमेंट्स करणाऱ्या अ‍ॅप्सचे टेन्शन वाढणार; Apple भारतात ‘हे’ अ‍ॅप लॉन्च करण्याची शक्यता

अमजद हनिफ पुढे म्हणाले, ”भाषांतरित ऑडिओ ट्रॅक क्रिएटर्सच्या आवाजाप्रमाणे अधिक हावभाव असणारे आणि lip sync करण्यासाठी काम करत आहे.” युट्युबने TechCrunch सांगितले की, भविष्यात AI जनरेटिव्ह Aloud ला आवाज, चांगली भावना आणि लीप रिअ‍ॅनिमेशन यांसारखी काही फीचर्स लॉन्च करण्याची परवानगी देईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Youtube content creators able dub video help ai aloud google check details tmb 01

First published on: 27-06-2023 at 10:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×