देशातील सर्वात लोकप्रिय ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲपपैकी एक म्हणून ‘झोमॅटो’ला ओळखले जाते. आता झोमॅटोने आपल्या ग्राहकांसाठी आता खास सेवा सुरु केली आहे. आतापर्यंत जवळपासच्या हॉटेलमधून आपल्याला आवडीचे पदार्थ मागवता यायचे परंतु आता खाद्यप्रेमींसाठी कंपनीने एक विशेष सेवा सुरु केली आहे. झोमॅटोने ‘लिजेंड्स’ नावाने इंटरसिटी फूड डिलिव्हरीचा पायलट प्रोजेक्ट लॉंच केला आहे. या ‘लिजेंड्स’ सेवेअंतर्गत वापरकर्त्यांना ‘झोमॅटो’द्वारे दुसऱ्या शहरांमधून खाद्यपदार्थ ऑर्डर करता येतील. दिल्लीत बसून जयपूरचे काही प्रसिद्ध खाद्यपदार्थ खावेसे वाटतात तर आता एका क्लिकवर ‘झोमॅटो’वरून अशी ऑर्डर देता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपनीने सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणजेच प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरु केली आहे. दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, लखनौ यांसारख्या भागात सुरुवात करण्यात आली असून नंतर ती देशभरात उपलब्ध होईल. झोमॅटोने सांगितले की, १०० हून अधिक विमानतळं आणि अनेक मोठे फूड पॉइंट्स या प्रोजेक्टअंर्गत जोडले जाणार आहेत. कंपनी या प्रोजेक्टद्वारे दिल्ली-एनसीआरच्या काही भागात आणि हैदराबाद, लखनौ या शहरांमधील हॉटेल्समधून जेवण पुरवणार आहे. या खाद्यपदार्थांचे योग्य ते पॅकिंग करून हे पार्सल विमानाने इतर शहरांमध्ये पोहोचवले जाईल. प्रवासादरम्यान अन्न खराब होऊ नये म्हणून मोबाईल फ्रिजचा वापर केला जाईल. १०० हून अधिक विमानतळं आणि अनेक मोठे फूड पॉईंट्स या प्रकल्पाशी जोडलेले आहेत. या प्रकल्पाला ‘इंटरसिटी लिजेंड्स’ असे नाव देण्यात आले आहे.

BSNL चा हा पॉवरफुल प्लॅन ३०० दिवसांच्या वैधतेसह देतो डेटा आणि अनलिमिटेड बेनिफीट्स…

झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. नवीन सेवेमुळे ग्राहकांना ‘कोलकात्यातील बेक्ड रसगुल्ला, हैदराबादची बिर्याणी, बेंगळुरूचा म्हैसूर पाक, लखनऊचे कबाब, जुन्या दिल्लीतील बटर चिकन, जयपूरची कचोरी यांसारख्या अस्सल पदार्थांची चव घरबसल्या चाखता येणार आहे, असं गोयल यांनी म्हटलं आहे.

असा असेल प्रकल्प
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून अन्न तयार केल्यावर ते रियुजेबल आणि टॅम्पर-प्रूफ कंटेनरमध्ये पॅक केले जाईल. हवाई वाहतूक दरम्यान हे पदार्थ सुरक्षित राहतील, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरीसोबतच किराणा सामान डिलिव्हर करण्याचे काम झोमॅटो करत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomato launches intercity lengends pdb
First published on: 06-09-2022 at 18:27 IST