05 March 2021

News Flash

अकाउंटिंगचे धडे!

आपल्यापकी बऱ्याच जणांना दररोज जमाखर्च लिहिण्याची सवय असते.

आपल्यापकी बऱ्याच जणांना दररोज जमाखर्च लिहिण्याची सवय असते. केलेल्या छोटय़ा-मोठय़ा खर्चाची नोंद एखाद्या वहीत तारखेनुसार केली जाते. त्यामुळे महिनाअखेरी खर्चासाठी काढलेल्या पशातून किती शिल्लक उरली किंवा किती अधिक खर्च झाला याचा अंदाज येतो. मागील महिन्याच्या नोंदीशी चालू महिन्याच्या खर्चाशी तुलना करता येते.
व्यापार आणि उद्योगधंद्यात मोठय़ा प्रकारची आíथक उलाढाल होत असते. व्यवसायाच्या आíथक स्थितीवर याचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे त्याची शास्त्रीय पद्धतीने नोंद, योग्य पद्धतीने वर्गीकरण तसेच विस्तृत विश्लेषण होणे आवश्यक असते.
या नोंदी कशा प्रकारे केल्या जातात, त्यांचे वर्गीकरण कसे करायचे, इत्यादीचे प्राथमिक ज्ञान कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या पहिल्या वर्षांपासूनच दिले जाते. इतर शाखांचे शिक्षण घेतलेल्यांना अकाउंट्स या विषयाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. उदाहरणार्थ, अनेक लोक शेअरबाजारात गुंतवणूक करीत असतात. ती गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची आíथक स्थिती कशी आहे, हे जाणून घेणे उपयुक्त असते. केवळ ऐकीव माहितीवर अवलंबून राहण्यापेक्षा त्या कंपनीच्या बॅलन्सशिटवरून ही माहिती जास्त अचूकपणे कळू शकते. कंपन्या वार्षकि अहवालाद्वारे आपल्या भागधारकांना ही माहिती पाठवत असतात. तसेच ही माहिती इंटरनेटवरसुद्धा उपलब्ध असते. अशा बॅलन्सशिट समजून घेण्यासाठी अकाउंट्स या विषयाची प्राथमिक माहिती असावी लागते.
अशा सर्वासाठी तसेच या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी <http://www.accountingcoach.com>या साइटने अकाउंटिंग आणि बुककीपिंगचे धडे खुले करून दिले आहेत. फायनान्शियल आणि मॅनेजरियल अकाउंटिंग अशा तीसहून अधिक संकल्पना समजावून सांगितल्या आहेत.
प्रत्येक संकल्पनेचे सोप्या शब्दांत उदाहरणांसहित स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यासाठी संकल्पनेचे छोटे छोटे भाग केले आहेत. उदाहरणार्थ, डेबिट आणि क्रेडिट या विषयाचे स्पष्टीकरण चार भागांत समजावले आहे. प्रत्येक संकल्पनेखाली स्पष्टीकरणावर आधारित बहुपर्यायी प्रश्न, गाळलेल्या जागा भरा असे प्रश्न, शब्दकोडे, वर्ड स्क्रँबल अशी कोडीदेखील ऑनलाइन सोडवण्यासाठी दिलेली आहेत. अशा प्रकारच्या चाचण्यांमुळे संबंधित संकल्पनांचे किती आकलन झाले आहे हे समजण्यास मदत होईल.
प्रत्येक विषयावर विद्यार्थ्यांला सामान्यपणे पडणाऱ्या प्रश्नांचा व त्यांच्या उत्तरांचा संच बनवलेला आहे. प्रत्येक प्रश्नाचे मुद्देसूद उत्तर दिलेले आहे आणि तो प्रश्न ज्या संकल्पनांशी संबंधित आहे त्यांची िलक खाली दाखवली जाते. अकाउंटन्सीशी संबंधित सर्व शब्दांचा समावेश असलेला शब्दकोशदेखील येथे उपलब्ध आहे. या साइटवरील परीक्षेसंदर्भातील साहित्य, व्हिज्युअल टय़ुटोरियल्स आणि काही कोडी मिळवण्यासाठी तुम्हाला पसे भरून मेंबरशिप घ्यावी लागते.
अ‍ॅडव्हान्स लेव्हलचा अभ्यास करणाऱ्यांसाठी येथे एका महत्त्वाच्या मुद्दय़ाची नोंद घेणे आवश्यक आहे. अकाउंटन्सीची मूलभूत तत्त्वे सगळीकडे सारखीच असली तरी देशोदेशीच्या आíथक नियमांनुसार त्यांचे संदर्भ थोडे बदलू शकतात. त्यामुळे अ‍ॅडव्हान्स लेव्हलचा अभ्यास करताना अमेरिकन साइट्स अमेरिकन अकाउंटिंग स्टँडर्ड्सची माहिती देतील. भारतीय स्टँडर्ड्स थोडी वेगळी असू शकतात. त्याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
अकाउंटिंगवरील अनेक ऑनलाइन सर्टििफकेट कोस्रेस <https://alison.com/learn/accounting>
https://www.edx.org/school/acca?gclid=CNj4nZewyMcCFRYTjgodJAENQg <https://www.google.com/url?q=https%3A%2F%2Fwww.edx.org%2Fschool%2Facca%3Fgclid%3DCNj4nZewyMcCFRYTjgodJAENQg&sa=D&sntz=1&usg=AFQjCNEveHDiEHWi4kEuVCWWJivS5lFvTA>
या िलक्सवर उपलब्ध आहेत. अकाउंटिंग या क्षेत्रात यशस्वीरीत्या पाऊल टाकण्यासाठी या साइट्सची तुम्हाला नक्कीच मदत होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 6:58 am

Web Title: acconting knowledge from website
Next Stories
1 व्हॉट्सअ‍ॅपच्या आयकॉनवरील संदेशाचा आकडा कसा जाणार?
2 यू ज्युइस ‘पॉवरबँक’
3 आता ‘फोल्डेबल स्मार्टफोन’ येतोय..
Just Now!
X