News Flash

‘आयफोन-५ एस’च्या दरात घसघशीत सूट, ४५ हजारांचा फोन निम्म्या किंमतीत उपलब्ध

भारतीय बाजारपेठेत 'आयफोन ५ एस'ची किंमत २२ हजारांपर्यंत खाली आली आहे.

Apple i Phone 5s, आयफोन ५ एस
आयफोन ५ एस.

आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. ‘आयफोन ५ एस’च्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत ‘आयफोन ५ एस’ची किंमत २२ हजारांपर्यंत खाली आली आहे. सप्टेंबर महिन्यात हीच किंमत ४५ हजारांच्या घरात होती. मात्र, आयफोनचा लेटेस्ट मॉडेल ‘आयफोन ६ एस’ आणि ‘६ एस प्लस’च्या मागणीत दिवाळीनंतर घट झाल्याने कंपनीने आपली विक्री वाढविण्यासाठी ‘आयफोन ५ एस’च्या दरात घट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत ‘आयफोन ५ एस’ची किंमत निम्म्यावर आली आहे. तर, इतर देशांत ती याहूनही कमी आहे. ‘आयफोन ५ एस’ (१६ जीबी) हा फोन भारतात इन्फीबीम या संकेतस्थळावर २१, ८९९ रुपयांत मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 2:46 pm

Web Title: apple iphone 5s is starting at rs 21899 online
Next Stories
1 गेमिंगच्या आभासी जगात..
2 संगणक खेळांडूंचे आकर्षण
3 ऑनलाइन व्यवस्थापन
Just Now!
X