ब्रदर इंडिया प्रिंटर्सच्या ब्रॅंडने घरगुती आणि मध्यम उद्योगांना उपयुक्त अशा प्रिंटर्सची रेंज भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. यातील चार प्रिंटर्स हे मोनो लेझर तर सहा प्रिंटर्स हे मल्टी फंक्शन प्रकारचे आहेत. या उत्पादनांची किंमत ५२०० पासून ते १९९९० या दरम्यान आहे. यातील चार प्रिंटर्स हे वायफायद्वारे जोडता येणे शक्य आहे. मोबाइल, संगणकावरून वायरच्या जोडणीशिवाय एखादे कागदपत्र,फोटो स्कॅन किंवा प्रिंटही घेऊ शकतो. मल्टी फंक्शन प्रिंटरच्या प्रकारामध्ये आयडी कार्डची झेरॉक्स काढण्यासाठी सुविधा आहे. यामध्ये आयडी कार्डचा पर्याय स्वीकारल्यावर एकाच कागदावर कार्डच्या दोन्ही बाजू प्रिंट होणे शक्य आहे.