News Flash

Tech नॉलेज : ऑनलाइन व्यवहारामध्ये कोड का टाकावा लागतो?

ई-बँकिंग व्यवहार करताना किंवा अनेक संकेतस्थळावर माहिती भरताना तळात आपल्याला एक कोड लिहायला सांगतात. त्याला कॅपचे असे म्हणतात.

| January 2, 2015 12:52 pm

प्रश्न : आयआरसीटीसी  किंवा ई-बँकिंग व्यवहार करताना एक विशिष्ठ प्रकारचा कोड दिसतो. तो कोड आपल्याला खाली दिलेल्या बॉक्समध्ये तसाच लिहावा लागतो. असे का करायला सांगितले जाते हे समजले नाही. या कोडचे गमज समावून सांगावे.
* महेश सांगडे
उत्तर : ई-बँकिंग व्यवहार करताना किंवा अनेक संकेतस्थळावर माहिती भरताना तळात आपल्याला एक कोड लिहायला सांगतात. त्याला कॅपचे असे म्हणतात. या माध्यमातून संगणकावरून व्यवहार करणारा हा माणूसच आहे, हे ओळखले जाते. अनेकदा यंत्राच्या माध्यमातून असे व्यवहार होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे व्यवहार करणारी ही व्यक्तीच आहे याची खात्री या कॅपचेमधून केली जाते. जर आपण हा कॅपचे योग्यरीत्या भरला तरच आपण पुढची प्रक्रिया करू शकतो. अन्यथा यंत्राच्या माध्यमातून ई-व्यवहार होऊ शकले असते. यामध्ये सायबर सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाला असता. हा धोका निर्माण होऊ नये म्हणून संगणक वैज्ञानिकांनी हा पर्याय शोधून काढला आहे.
प्रश्न : मोबाइलमध्ये गाण्याचे मिक्सिंग करता येणे शक्य आहे का? असेल तर त्यासाठी कोणते अ‍ॅप्स आहे काय?
* ज्ञानेश पाटील
उत्तर : मोबाइलमध्ये गाण्यांचे मिक्सिंग करता येणारे किमान दहा अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. प्ले स्टोअरवर तुम्ही सर्च केले तर यातील अनेक पर्याय तुमच्या समोर येतील. यामध्ये म्युझिक मिक्सर, मिक्स, म्युझिक मिक्सर एचडी, डी जे म्युझिक मिक्सर अशा अ‍ॅप्सचा समावेश आहे. अ‍ॅपल आयटय़ून्सवरही काही अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यात एडजिंग, डीजे मिक्सर ३ अशा अ‍ॅप्सचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 12:52 pm

Web Title: code may keep your online transactions secure
टॅग : Tech It
Next Stories
1 बाजार थंड पण चुरस कायम
2 संगणकीय गेम्स
3 व्हॉट्सअ‍ॅप पीसी
Just Now!
X