वायरलेस पद्धतीने तो संगणक डेस्कटॉप किंवा लॅपटॉपशी जोडला जाऊ शकतो. याशिवाय त्यामध्ये त्यात एप्सनच्या प्रगत होम थिएटर प्रोजेक्षन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यात एप्सन सिनेमा फिल्टर, फारौदजा डीसीडीआय व्हिडिओ प्रोसेसिंग चिप, सुपर रिझोल्युशन तंत्रज्ञान, फ्रेम इंटरपोलेशन आदींचा समावेश आहे. त्यामुळे तुम्हाला अतिशय उत्तम दर्जाचे व्हिडिओ चित्रण पाहात असल्याचा आनंद मिळतो. म्हणूनच अनेक प्रतिष्ठित घरांमध्येही एप्सनचा हा प्रोजेक्टर पाहायला मिळतो.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : ६,६९,१९९/-