News Flash

हातातला खेळ

स्मार्टफोनचा बोलबाला सुरू असतानाच आता स्मार्ट घडाळ्यांची संकल्पना रुजू लागली आहे. यासाठी आजपर्यंत घड्याळ्यांच्या मार्केटमध्ये नसलेल्या

| January 11, 2014 04:13 am

स्मार्टफोनचा बोलबाला सुरू असतानाच आता स्मार्ट घडाळ्यांची संकल्पना रुजू लागली आहे. यासाठी आजपर्यंत घड्याळ्यांच्या मार्केटमध्ये नसलेल्या पण इलेक्ट्रॉनिक्समधील अग्रणी कंपनी सोनीने हे नवे इनोव्हेशन केले. यामुळे वेअरेबल डीवायसेसची लाट पसरू लागली. नवीन सुरू झालेले हे वर्ष आशाच काही वेअरेबल डीवायसेसमुळे गाजणार आहे. सध्या बाजारात कोणते वेअरेबल डीवायसेस उपलब्ध आहेत यावर एक झलक..
रन अँड रीड
ट्रेडव्हीलवर धावायचे की पेपर वाचायचा असा प्रश्न अनेकांना सकाळी पडत असतो. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन न्यूयॉर्कमधील संशोधकांनी रन अँड रीड नावाचे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाच्या मदतीने आपण ट्रेडव्हीलवर धावू शकतो इतकेच नव्हे तर आपल्या फोनमध्ये किंवा ई-रीडरमध्ये वाचनही करू शकतो. आपण किती धावतो आहोत त्याची माहितीही आपल्याला आपल्या फोनवर उपलब्ध होणार आहे. रन अँड  रीड हे उपकरण आपण आपल्या उपकरणाशी ब्ल्यूटूथ ने जोडू शकतो. ते जोडले की आपले काम झालेच म्हणून समजा. रन अँड रीड आपण आपल्या हाताला, डोक्याला अगदी शर्टाच्या बटणालाही जोडू शकतो.             
किमंत : अंदाजे ४५०० रुपये.

हृदयाचे ठोके मोजणारे इअर बड
आपण गाणी ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी अनेकदा इअर बड अर्थात इअरफोन्सचा वापर करत असतो. पण हेच इअर बड आता आपले हृदयाचे ठोके, आपल्या कॅलरीज अशा गोष्टी मोजून त्याची माहिती आपल्याला देणार आहेत. चिप्स बनवणारी कंपनी इंटेल या कंपनीने वेअरेबल वस्तू बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असून इअर बड हे त्यातीलच एक उत्पादन आहे. या खास इअर बडमध्ये बायोमेट्रिक्सचा वापर करण्यात आला आहे. म्हणजे हे इअर बर्डस आपण आपल्या कानाला लावले आणि गाणी ऐकत आपण मॉìनगवॉकला गेल्यावर त्यावेळेस जळणाऱ्या आपल्या कॅलेरीज किती आहेत, हृदयाचे ठोके हे सर्व मोजून ते आपल्या फोनमध्ये दाखविले जाणार आहे.
किमंत : अंदाजे ५००० रुपये.

‘गॅलेक्सी गिअर’
एखाद्याला फोन करणं किंवा आलेले कॉल उचलणं, फोटो काढणं, व्हिडिओ रेकॉर्ड करणं, एसएमएसला रिप्लाय करणं, अशी सोपी कामं या स्मार्टवॉचवरून झटपट करता येणार आहेत. ’गॅलेक्सी गिअर’ हे स्मार्टवॉच ब्लू-टुथप्रमाणेच सपोìटग डिव्हाइस आहे. अर्थात, ब्लू-टुथ वापरून आपण फक्त बोलू शकतो. परंतु, १.६३ इंचाची स्क्रीन असलेल्या स्मार्टवॉचच्या माध्यमातून, मोबाइल खिशात असतानाही आपण बरीच कामं करू शकतो. आपला स्मार्टफोन स्मार्टवॉचला ब्लू-टुथ तंत्रज्ञानानं जोडला की, आपल्याला येणारे कॉल स्मार्टवॉचवर दिसू शकतात, आपण ते उचलू शकतो, कुणालाही फोन करू शकतो, एसएमएस पाहू शकतो, फोटो काढू शकतो, व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. त्यामुळे हे स्मार्टवॉच मनगटावर बांधलं की भलेमोठे स्मार्टफोन हातात घेऊन फिरायची किंवा ते कानाला लावून बोलण्याची कसरत करायची गरज भासणार नाही.
किंमत – २२९९० रुपये

सोनी स्मार्टवॉच २
स्मार्टवॉचची सुरुवात सोनीने केली होती. आता तर त्यांनी एनएफसी देऊन हे स्मार्टवॉच अपडेट केले आहे. डस्ट आणि वॉटरप्रूफ अशी स्मार्टवॉचपण अँड्रॉइडसाठी तयार करण्यात आली आहेत. यात १.६ इंच स्क्रीन असून काँल्स, टेक्स्ट, फेसबूक, ईमेल नोटिफिकेशन्स बघण्यासाठी या स्मार्टवाँचचा उपयोग करता येईल. चाìजग पूर्ण असेल, तर तीन दिवस हे स्मार्टवॉच वापरता येईल, असा दावा सोनीने केला आहे. हे स्मार्ट घड्याळ वॉटरप्रूफ असून यात अॅप्सचा खजानाही आहे. पण यातील टेक्स्टचा आकार मात्र खूपच लहान असल्याने डोळ्यांना त्रास होऊ शकतो, वाय-फाय तसेच थ्रीजी कनेक्टिविटीचा अभाव यात असून याचा सेटअपही काहीसा किचकट आहे.
किंमत : १४९९० रुपये

आय एम वॉच
अँड्रॉइड आणि ब्लाकबेरी या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे हे स्मार्ट घड्याळ असून यामध्ये आपल्याला १.५ इंचांचा स्क्रीन देण्यात आला आहे. याचे रिझोल्युशन २४० गुणिले २४० पिक्सेल इतके आहे. या फोनमध्ये आपल्याला विविध प्रकारचे अॅप्लिकेशन डाउनलोड करता येतात इतकेच नव्हे तर यामध्ये ई-मेल, फेसबुक, मेसेजेस या सुविधाही वापरता येतात. हे घड्याळ ब्लूटूथनेही दुसऱ्या गॅजेटशी जोडता येते.
किंमत १३९९९ रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 4:13 am

Web Title: game in the hands
टॅग : Tech It
Next Stories
1 tech संवाद: स्मार्टफोन ग्राहकांची गरज भागवणारे असावेत
2 tech नॉलेज: व्हॉट्स अॅप हवे आहे
3 टेक्नॉलॉजीचा कुंभमेळा
Just Now!
X