आपल्या पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’ चा संदेश सर्व देशाला दिला आहे. या घोषणेचा उद्देश भारतीयांनी विविध वस्तूंचे देशांतर्गत उत्पादन वाढवून स्वयंपूर्णता मिळवणे तसेच निर्यात वाढून आíथक भरभराट करणे यासाठी प्रयत्न करायचे आहेत. परंतु वस्तूंचे उत्पादन करायचे म्हणजे नक्की काय?
आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाजारातून सतत काही ना काही खरेदी करतच असतो. यापकी बहुतेक गोष्टी आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनून जातात. कशा बनवल्या जातात या गोष्टी? एखादा खाद्यपदार्थ घरी बनवला जातो तेव्हा त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण कमी असल्याने त्याची तयारी मर्यादित असते, ती बनवण्याची पद्धत फार गुंतागुंतीची नसते. तसेच तो पॅक करून कुठे पाठवण्याची गरज असतेच असे नाही. परंतु हाच पदार्थ पंचतारांकित हॉटेल किंवा औद्योगिक स्तरावर बनवायचा असतो तेव्हा त्या पदार्थाचे साहित्य कशाप्रकारे एकत्रित केले जाते?, तो पदार्थ कशाप्रकारे तळला किंवा बेक केला जातो? उदाहरणार्थ केक, बिस्कीटस, वेफर्स इत्यादी. तसेच जगभरच्या हजारोंच्या संख्येने असलेल्या मॅकडोनाल्ड, केएफसी, यांसारख्या उपाहारगृहांच्या मालिकांमध्ये पदार्थाची चव आणि गुणवत्ता कशी राखली जाते हे जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असते.
केवळ खाद्यपदार्थच नव्हे तर रोजच्या वापरातील विविध गोष्टी जसे की, प्रवासी बॅग्ज, टिश्यू पेपर्स, काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बाटल्या, तवे, कढया कशा बनतात, त्या नॉनस्टिक कशा बनवल्या जातात याची माहिती आपल्याला समजून घ्यायची इच्छा असते.
विविध रंगाचे फुगे, पत्ते, फटाके, रंगीत पेन्सिल, तेलीखडू हे कसे तयार केले जातात असा प्रश्न तुमच्या मुलांनी कधीतरी विचारला असेलच किंवा असा प्रश्न कुठल्याना कुठल्या वस्तूच्या बाबतीत तुमच्या मनातही आला असेल. जसेकी, अशा प्रकारच्या वस्तू बनवणाऱ्या फॅक्टरीजचे काम कसे चालते. किती टप्प्यांवर ते होते इत्यादी बरेच काही. परंतु प्रत्येक फॅक्टरीमध्ये जाऊन या उत्पादनांच्या निर्मितीची प्रक्रिया बघणे शक्य नसते. बरेचदा गुप्ततेच्या, गुणवत्तेच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अशी परवानगी मिळत नाही.
परंतु आता इंटरनेटमुळे हे सर्व काही घरबसल्या बघण्याची सोय झाली आहे. ऌ६ क३’२ टंीि नावाची डॉक्युमेंट्रीची मालिका डिस्कव्हरी चॅनेलवर २००१ पासून दाखवली जाते. या कार्यक्रमात, ब्रेड, मफिन्ससारखे खाद्यपदार्थ, गिटार, व्हायोलीन, पियानोसारखी वाद्य्ो, बेसबॉल, क्रिकेट, फुटबॉलसारखी क्रीडासाधने, तसेच अनेक औद्योगिक उत्पादने कशी बनवली जातात हे येथे दाखवले गेले आहेत. या मालिकेमध्ये दाखवले गेलेले भाग आता <http://www.sciencechannel.com/tv-shows/how-its-made/videos/&gt; या िलकवर छोटय़ाछोटय़ा व्हिडीओजच्या रूपात आहे.
तसेच यूटय़ूबवर (How Itls Made)  असे सर्च केल्यास दोनशेहून अधिक व्हिडीओज <https://www.youtube.com/channel/UCjHsPBHX1NNbIqTy4eXVTig>  आणि (worldnews33 ) असे सर्च केल्यास पाचशेहून अधिक व्हिडीओज <https://www.youtube.com/user/worldnews33>  तुम्हाला बघायला मिळू शकतात.
हे थक्क  करणारे व्हिडीओ पाहून तुम्हाला आनंद होईल आणि तुमच्या ज्ञानातही भर पडेल अशी आम्हाला खात्री आहे!
– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com

Raj Thackeray
महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेची पुढची भूमिका काय? राज ठाकरेंनी दिली सविस्तर माहिती, म्हणाले…
Important decision of the supreme court
उमेदवारांनी संपत्ती म्हणून घड्याळही जाहीर करावं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; मालमत्ता प्रकरणी दिला महत्त्वपूर्ण निकाल
pm narendra modi rally in meerut
भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा थांबणार नाही! मेरठच्या सभेत पंतप्रधानांचा इंडिया आघाडीला इशारा
Who received Lottery king Santiago Martins donations to political parties in electoral bond
कोणी, कोणाला, किती आणि का दिले?