प्रश्न – मला माझे फेसबुक अकाऊंट बंद करावयाचे आहे. ते कसे करता येईल याची माहिती द्यावी.  – धनाजी माने
उत्तर- फेसबुक अकाऊंट बंद करण्यासाठी सर्वप्रथम फेसबुकमध्ये लॉगइन करा. यानंतर तुम्ही फेसबुकवर जी काही माहिती शेअर केली आहे ती माहिती हवी असेल तर तुम्ही ती माहिती शेअर करून ठेवू शकता. यासाठी तुम्ही सेटिंगमध्ये ‘डाऊनलोड अ फेसबुक डेटा’ या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये तुमची ओळख विचारली जाईल. ती ओळख सांगितल्यानंतर तुम्ही ती सर्व माहिती डाऊनलोड करून घेऊ शकतात. यानंतर तुमच्या फेसबुक अकाऊंटची हिस्ट्रीपण डिलिट करा. यानंतर ‘डिलिट माय अकाऊंट’ या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक सुरक्षा शब्द दिला जाईल, तो शब्द रिकाम्या चौकटीत लिहिल्यानंतर ओकेवर क्लिक केल्यावर तुमचे अकाऊंट डिलिट होईल. हे अकाऊंट पुढील १४ दिवस सुरू राहते. या कालावधीत जर आपण लॉगइन करून रिस्टोअर अकाऊंट केले, तर ते अकाऊंट पुन्हा सुरू होते. अन्यथा १४ दिवसांनी ते आपोआप डिअ‍ॅक्टिवेट केले जाते.

प्रश्न -माझ्याकडे टेक्स्ट मेसेजेससाठी ‘गो एसएमएस प्रो’ हे अ‍ॅप्लिकेशन आहे. हे अ‍ॅप सुरक्षित आहे का? यातील माझे एसएमएस हॅक होऊ शकतात का?   – श्रवण कुलकर्णी
उत्तर-  हे अ‍ॅप्स सुरक्षित आहे की नाही याची माहिती तुम्हाला अ‍ॅपच्या सुरक्षा सेटिंगमध्ये जाऊन मिळू शकेल. तसेच जर तुमच्या मोबाइलमध्ये अधिकृत अँटिव्हायरसचा वापर केला असेल, तर तुम्हाला त्या अँटिव्हायरसच्या माध्यमातूनही अ‍ॅपच्या सुरक्षेविषयी माहिती मिळू शकते. जर हे अ‍ॅप सुरक्षित नसेल तर तुमची माहिती तुमच्या नकळत कुणीही घेऊ शकते.

या सदरासाठी प्रश्न lstechit@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.