प्रश्न – माझ्या संगणकावरील इंटरनेट मला माझ्या अँड्रॉइड फोनवर वाय-फायद्वारे वापरायचे आहे; परंतु मोबाइलवर जोडत असताना पासवर्ड विचारला जातो. तो मी माझ्या संगणकात कसा शोधावा. -विजय गवांदे
उत्तर – तुम्हाला तुमच्या संगणकावरून इंटरनेट जोडणी केल्यावर पासवर्ड आठवत नसेल तर खालील प्रकारे तुम्ही पासवर्ड शोधू शकता.
* सर्वप्रथम स्टार्ट मेन्यूमध्ये जाऊन सेटिंग्जमध्ये नेटवर्क आणि इंटरनेटचा पर्याय निवडा.
* तुम्हाला जे नेटवर्क हवे आहे ते नेटवर्क निवडा.
* सर्च बॉक्समध्ये व्ह्यू नेटवर्क कनेक्शन्स असे सर्च करा. यानंतर आलेल्या पर्यायामधनू व्ह्यू नेटवर्क कनेक्शनचा पर्याय निवडा.
* नेटवर्क कनेक्शन्समध्ये राइट क्लिक दाबून ठेवा. मग तुम्हाला नेटवर्कचे नाव आणि स्टेटस निवडा. त्यात वायरलेस प्रॉपर्टीमध्ये जा.
* त्यात सिक्युरिटी टॅब निवडा आणि तेथे असलेला ‘शो कॅरॅक्टर्स’ हा पर्याय निवडा. मग तुम्हाला वायरलेस नेटवर्कचा पासवर्ड दिसेल. तो पासवर्ड तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये देऊन मोबाइवर इंटरनेट जोडू शकता.

प्रश्न – माझ्याकडे हुवाई १९ हा मोबाइल आहे. त्यात मेलमध्ये इंटर्नल एरर असा सारखा मेसेज येतो. मेल जातात, पण हा मेसेज का येतो. -प्रदीप राऊत
उत्तर – यासाठी एक सोप्पा उपाय आहे. तो म्हणजे तुम्ही तुमच्या अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन जीमेलचा सर्व डेटा सर्वप्रथम क्लीअर करा. तो डेटा क्लीअर केल्यानंतर तुमचं जीमेल नव्याने सिंक होईल. यानंतर तुम्हाला हा एरर येणार नाही. अशाच प्रकारे तुम्ही गुगलच्या सर्व अ‍ॅप्सचा डेटा क्लीअर करून ते पुन्हा वापरायला घ्या. जेणेकरून तुम्हाला कोणताही एरर येणार नाही.
– तंत्रस्वामी

Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
How To Use Quick Share feature on Android to quickly send files without an active internet connection
दोन फोनमध्ये करा Quick Share; ॲप अन् इंटरनेटचीही गरज नाही, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
Microsoft announced the removal of WordPad from Windows Here is What apps can you use instead Must Read
आता मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये दिसणार नाही वर्डपॅड! तुम्ही कोणत्या ॲप्सचा करू शकता उपयोग? पाहा यादी…