25 February 2021

News Flash

फाइल कशा मॅनेज करू?

मी मोबाइलवर कार्यालयाचे बहुतांश काम करीत असतो. त्यामध्ये अनेक कामांच्या सॉफ्ट कॉपीज असातात.

| March 17, 2015 06:24 am

प्रश्न –    मी मोबाइलवर कार्यालयाचे बहुतांश काम करीत असतो. त्यामध्ये अनेक कामांच्या सॉफ्ट कॉपीज असातात. या कॉपीज सापडणे कधी कधी कठीण पडते. यामुळे फाइल्सचे व्यवस्थापन करण्यासाठी एखादे अ‍ॅप सुचवा.     
    -सूरज सोनावणे
उत्तर –    आपल्या मोबाइलमध्ये मोठय़ा प्रमाणावर माहिती असते. या माहितीचे व्यवस्थापन करणे म्हणजे आपल्यासाठी अनेकदा डोकेदुखी ठरते. तरीही मोबाइलमध्ये आपण फोल्डर करून त्यामध्ये माहिती वेगवेगळय़ा प्रकारे साठवण्याचा प्रयत्न करीत असतो. पण जर विविध माहितीसाठी वेगवेगळय़ा रंगांचे लोगो मिळाले आणि त्यानुसार आपण माहिती साठवली तर ती माहिती शोधणेही सोपे जाते. यासाठी अँड्रॉइडवर सध्या उपलब्ध असलेले सुपर फाइल मॅनेजर हे अ‍ॅप खूप लोकप्रिय होत आहे. या अ‍ॅपमध्ये आपल्याला व्हिडीओ, गाणी, छायाचित्रे आदी वेगवेगळय़ा विभागांसाठी वेगवेगळय़ा गोष्टी देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर हे अ‍ॅप आपली मोबाइल डिरेक्टरीही खूप चांगल्या प्रकारे हाताळते. यामुळेही आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती व्यवस्थापन करता येणे शक्य होते. तसेच यामध्ये कुरिअरची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजे आपण एखादी फाइल नेटवर्क नसतानाही हे अ‍ॅप असलेल्या व्यक्तीशी शेअर करू शकतो. या अ‍ॅपमध्ये माहिती कॉम्प्रेस करून साठवली जाते, यामुळे फोनमध्ये अधिक जागा उपलब्ध होणेही शक्य होते.

प्रश्न –    गुगल ड्राइव्हविषयी माहिती सांगावी.           -अमित कणसे
उत्तर –    गुगल ड्राइव्ह ही गुगलची क्लाऊड सेवा असून ती आपल्या ई-मेल आयडीच्या माध्यमातून सहज उपलब्ध होऊ शकते. जर आपण मोबाइलवर याचे स्वतंत्र अ‍ॅप डाऊनलोड केले तर मोबाइलवरही ही सेवा उपलब्ध होऊन मोबाइलमधील फोटो, व्हिडीओज, पीडीएफ फाइल्स आदी गोष्टी आपण सहजपणे ड्राइव्हवर सेव्ह करून ठेवू शकतो. या ड्राइव्हच्या माध्यमातून आपण आपला डेटा संगणकावर सहज शेअर करू शकतो. तसेच जीमेलवरच्या अ‍ॅटॅचमेंट्स आपण थेट गुगल ड्राइव्हवरच डाऊनलोड करू शकतो. जेणेकरून आपल्या संगणकात किंवा अन्य कुठे वेगळी स्टोअरेज जागा खर्च करण्याची गरज भासणार नाही. सुरुवातीला गुगल आपल्याला पंधरा जीबीचे क्लाऊड स्टोअरेज मोफत उपलब्ध करून देते. याशिवाय गुगलच्या विविध सुविधा तुम्ही वापरल्या तर त्यावरही तुम्हाला ड्राइव्हची स्टोअरेज स्पेस मोफत दिली जाते. उदाहणार्थ, तुम्ही क्विक ऑफिस डाऊनलोड केले तर तुम्हाला दहा जीबीचे अतिरिक्त क्लाऊड स्टोअरेज उपलब्ध होऊ शकते. तसेच विविध मोबाइल कंपन्यांच्या असलेल्या टायअपमुळे आणखी स्टोअरेज क्षमता मिळणे शक्य होते. यामध्ये एका कंपनीशी असलेल्या सहकार्य करारानुसार गुगल शंभर जीबीची स्टोअरेज जागा मोफत देते, तर वीस हजार गाण्यांचा साठा असलेले गुगल म्युझिकची सुविधा क्लाऊड स्टोअरेजच्या स्पेसव्यतिरिक्त दिली जाते. म्हणजे ही गाणी साठवण्यासाठीची क्षमता आपल्याला मोफत मिळते.
तंत्रस्वामी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 6:24 am

Web Title: how to manage files
टॅग : Technology
Next Stories
1 मैफिल मराठी गाण्यांची
2 तुमच्या मोबाईलवर कसा सुरू होईल व्हॉट्सअ‍ॅप कॉल?
3 मनात धरलेली व्यक्ती स्क्रिनवर दाखवणारा अदभुत ‘वेब जीनी’
Just Now!
X