News Flash

फिनलंडच्या ‘जोला’ कंपनीचा नवा स्मार्टफोन भारतात उपलब्ध

फिनलंडमधील 'नोकिया' कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या 'जोला लिमिटेड' कंपनीद्वारे निर्माण करण्यात आलेला 'जोला' हा स्मार्टफोन

| September 23, 2014 07:18 am

फिनलंडच्या ‘जोला’ कंपनीचा नवा स्मार्टफोन भारतात उपलब्ध


फिनलंडमधील ‘नोकिया’ कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ‘जोला लिमिटेड’ कंपनीद्वारे निर्माण करण्यात आलेला ‘जोला’ हा स्मार्टफोन ऑनलाईन वस्तुंची विक्री करणाऱ्या ‘स्नॅपडील डॉट कॉम’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपल्या संकेतस्थळावर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे स्नॅपडीलकडून मंगळवारी जाहीर करण्यात आले. ‘जोला’ हा नवा स्मार्टफोन ‘सेल्फीश’ नावाच्या ‘ओपन मोबाईल ऑपरेटींग सिस्टिम’वर काम करतो. ‘नोकिया’ आणि ‘मिगो’ची परंपरा सांभाळणारा ‘जोला’ स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य स्मार्टफोनच्या तोडीचा अनुभव प्रदान करतो. टचस्क्रिन असलेल्या या स्मार्टफोनमध्ये युजर फ्रेण्डली इंटरफेस देण्यात आला असून, मल्टिटास्किंग करताना या फोनचा वेग कमी होत नाही. याशिवाय, हा स्मार्ट फोन ‘अॅण्ड्रोईड’ अॅप्लिकेशन्ससाठी पूरक असा आहे. स्मार्टफोनचे डिझाईन साधे, परंतु बोल्ड लुक असलेले आहे. याच्या पातळ डिझाईनमुळे तो सहजपणे हातात धरता येतो. यात असलेल्या ‘लाईव्ह मल्टिटास्किंग’ सुविधेमुळे तुम्ही वापरत असलेली सर्व ‘रनिंग अॅप्स’ न उघडता अथवा बंद करता एकाच स्क्रिनवर पाहण्याची सोय यात आहे. यातील ‘सेल्फीश’ ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या अॅप्सबरोबर तुम्ही ‘अॅण्ड्रोईड’ अॅप्सचासुध्दा आनंद घेऊ शकता. फोनसाठी खास तयार करण्यात आलेले स्मार्ट कव्हर चढवताच यात देण्यात आलेल्या ‘दी अदर हाफ’ सुविधेमुळे हा फोन अधिक वैशिष्ट्यपूर्ण होतो. तुम्हाला वैयक्तीक आणि खास असा अनुभव देणारी ‘दी अदर हाफ’ सुविधा ही या फोनचा आत्मा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘सेल्फीश’ प्रणालीवर चालणारा ‘जोला’ स्मार्टफोन ‘स्नॅपडील’वर १६,४९९ इतक्या किंमतीला उपलब्ध आहे.
‘जोला लिमिटेड’ कंपनीने मोबाईल उपकरणे तयार करण्याबरोबरच ‘सेल्फीश’ नावाची ‘ओपन ऑपरेटिंग सिस्टम’ची निर्मितीदेखील केली आहे. ‘सेल्फीश’ प्रणालीवर कार्यरत असलेला ‘जोला’ स्मार्टफोन सध्या युरोप, हँग काँग आणि भारतात उपलब्ध आहे. २०११ साली निर्माण झालेल्या या कंपनीने ‘नोकिया’ आणि ‘मिगोची’ परंपरा कायम राखली आहे. ‘जोला’ स्मार्टफोनची निर्मिती फिनलंडमध्ये करण्यात येते.

काही खास वैशिष्ट्ये

प्रोसेसर – क्वालकॉम ड्युअल कोर १.४ गेगाहर्टस्

मेमरी – १६ जीबी अंतर्गत, १ जीबी रॅम, मायक्रो एसडी कार्ड

डिस्प्ले – ४.५” आयपीएस क्यूएचडी (९६०x५४०), ५ पॉईंट मल्टीटच गोरीला ग्लास

कॅमेरा – मागील बाजूस ८ मेगा पिक्सल विथ एलीडी फ्लॅश, पुढील बाजूस २ मेगा पिक्सल

बॅटरी – २१०० एमएएच

कनेक्टिव्हिटी – ब्ल्यूटुथ, एनएफसी

वजन – १४१ ग्रॅम

किंमत – १६४९९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2014 7:18 am

Web Title: jolla the new smartphone from finland now available in india exclusively on snapdeal at rs 16499
टॅग : Smartphone,Technology
Next Stories
1 ऑल इन वन
2 मवाळ पँथर
3 Tech नॉलेज : अ‍ॅप खरेदी करताना पसे कसे भरायचे
Just Now!
X