अ‍ॅपलच्या आयफोनच्या दूरचित्रवाणीवरील जाहिराती सध्या चर्चेचा विषय ठरू लागल्या आहेत. या जाहिरातींमध्ये आयफोनवरील ‘सिरी’ नावाची ‘व्हॉइस असिस्टंट’ यंत्रणा वापरकर्त्यांला कशी उपयुक्त ठरते, याचे दाखले देण्यात आले आहेत. हे सर्व अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आल्याने जाहिरात अधिक परिणामकारक आणि ग्राहकांना आकर्षित करणारी ठरत आहे. फोनला स्पर्शही न करता आपले ई-मेल, एसएमएस किंवा अन्य संदेश वाचणे, त्याला उत्तर देणे याखेरीज इंटरनेटवर सर्च करणे, यूटय़ुबवर व्हिडीओ पाहणे, अलार्म लावणे अशा अनेक कृती ‘सिरी’ करते. मात्र, सिरीप्रमाणे अन्य स्मार्टफोन प्लॅटफॉर्मवरही ‘व्हॉइस असिस्टंट’ कार्यरत आहेत. अ‍ॅपलच्या ‘सिरी’प्रमाणे विण्डोजवर ‘कोर्टाना’ आणि अ‍ॅण्ड्रॉइडवर ‘गुगल नाऊ’ या ‘व्हॉइस असिस्टंट’ यंत्रणांवर टाकलेला हा प्रकाशझोत..

सिरी
अ‍ॅपलच्या फोनवरील ‘सिरी’ ही यंत्रणा एका स्वीय साहाय्यकासारखी काम करते. या यंत्रणेच्या मदतीने फोनला स्पर्श न करता कॉल लावणे, मेसेज पाठवणे, मीटिंग ठरवणे, अ‍ॅप्स सुरू करणे, गाणी चालवणे, हवामानाचा अंदाज जाणून घेणे, अशा अनेक गोष्टी करता येतात. ‘सिरी’ ही मुळात स्वतंत्र ‘डिजिटल असिस्टंट’ यंत्रणा होती. मात्र ती कंपनी अ‍ॅपलने ताब्यात घेतली आणि तिचा वापर आपल्या आयफोन आणि अन्य उत्पादनांमध्ये सुरू केला. मात्र ही यंत्रणा आयफोनधारकांमध्ये किती लोकप्रिय आहे, याचा अंदाज बांधणे अद्याप शक्य झालेले नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘इंटिलिजन्स व्हॉइस’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात केवळ १५.२ टक्के आयफोनधारकांनी ‘सिरी’चा वापर केल्याचे आढळून आले आहे.

गुगल नाऊ
अ‍ॅण्ड्रॉइड फोन वापरणाऱ्यांबाबतही ‘व्हॉइस असिस्टंट’चा अनुभव जवळपास सारखा आहे. गुगलच्या ‘इंटिग्रेटेड’ सर्च अ‍ॅपसोबत जोडल्या गेलेल्या गुगल नाऊचा वापर नजीकचे हॉटेल शोधण्यापासून हवामानाचा अंदाज जाणून घेणे अशा अनेक बाबतीत करता येतो. पण त्यासोबतच ही यंत्रणा वापरकर्त्यांच्या नियमित वापरातील वेबसाइट किंवा विषयांशी संबंधित माहिती दर्शवते. शिवाय एखाद्या प्रवासाची प्राथमिक माहिती नोंदवल्यास पुढील सर्व प्रवासाची माहिती, तेथील ठिकाणे, गाडय़ांच्या वेळा, त्यातील विलंब अशा बारीकसारीक गोष्टींचा तपशीलही ‘गुगल नाऊ’च्या माध्यमातून पुरवण्यात येतो.

कोर्टाना
मायक्रोसॉफ्टने आपल्या विण्डोज उत्पादनांसाठी ‘कोर्टाना’ ही ‘व्हॉइस असिस्टंट’ यंत्रणा गेल्या वर्षी सुरू केली. या यंत्रणेवरूनही कॉल करणे, मेसेज पाठवणे, नजीकचे हॉटेल किंवा ठिकाण शोधणे अशा गोष्टी करता येतात. ‘कोर्टाना’चे वैशिष्टय़ म्हणजे वापरकर्त्यांच्या आवाजाचा स्वर आणि उच्चार टिपून योग्य प्रक्रिया करण्यात ही यंत्रणा तरबेज आहे. ‘कोर्टाना’वर वापरकर्त्यांची माहिती सातत्याने साठवली जाते. या माहितीचा वापर भविष्यातील सूचना आणि आज्ञापालनासाठी केला जातो. वापरकर्त्यांचे ई-मेल तपासणे, त्याच्या नियोजित भेटींचा तपशील ठेवणे या क्रियाही ‘कोर्टाना’वरून करता येतात.

कोण किती प्रभावी?
वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या या तिन्ही व्हॉइस असिस्टंट यंत्रणा वरून सारख्याच पद्धतीचे काम करत असल्या तरी, त्यामध्ये थोडाफार फरक आहे. हे व्हॉइस असिस्टंट नेमक्या कोणत्या आज्ञांचे पालन करू शकतात, हे दर्शवणारा हा तक्ता-

5