News Flash

लिनोवोचा स्वस्तातला ४जी स्मार्टफोन!

भारतीय बाजारपेठेतील स्मार्टफोन विक्रीची स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसते आहे. यामुळे स्मार्टफोनच्या किमतीदेखील दिवसागणिक घसरत आहेत.

| January 16, 2015 05:54 am

भारतीय बाजारपेठेतील स्मार्टफोन विक्रीची स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसते आहे. यामुळे स्मार्टफोनच्या किमतीदेखील दिवसागणिक घसरत आहेत. लिनोवो कंपनीने ४जी तंत्रज्ञानावर आधारित ए ६००० हा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला असून, या फोनची किंमत केवळ ६,९९९ इतकी आहे. हा फोन प्रथम भारतीय बाजारात उपलब्ध करून देण्यास लिनोवोने प्राधान्य दिले आहे. या स्मार्टफोनची विक्री केवळ फ्लिपकार्ट या ऑनलाईन वस्तुंची खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे. यासाठीची नोंदणी १६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
लिनोवो ए६००० फोनमध्ये १.२ गेगाहर्टस् ६४ बीट क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रेगॉन ४१० प्रोसेसर आणि अॅड्रेनो ३०६ चा सीपीयू देण्यात आला आहे. याशिवाय ८ जीबीची अंतर्गत मेमरी, १जीबी रॅम, २३०० एमएएचची बॅटरी, मागीलबाजूस ८ मेगापिक्सलचा आणि पुढील बाजूस २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. अॅण्ड्रॉईडच्या ४.४ किटकॅट प्रणालीवर हा फोन काम करतो. हा फोन ड्युअल सिम स्वरूपाचा आहे. अलीकडेच लिनोवोने मोटोरोलाला ताब्यात घेतले असून, भारतीय बाजारात दोन्ही ब्रॅण्डच्या अंतर्गत ते फोनची विक्री करणार आहेत.

वैशिष्ट्ये

  • १.२ गेगाहर्टस् ६४ बीट क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रेगॉन ४१० सीपीयू
  • ५ इंचाचा ७२० पिक्सलचा एचडी आयपीएस डिस्प्ले
  • अॅण्ड्रॉईड ४.४.४ किटकॅट ओएस
  • १ जीबी रॅम
  • ८ जीबी अंतर्गत मेमरी (३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सोय)
  • मागीलबाजूस ८ एमपी एलईडी फ्लॅश लाईटसह आणि पुढीलबाजूस २ एमपी कॅमेरा
  • ड्युअल सीम (मायक्रो)
  • ४जी तंत्रज्ञान
  • २३०० एमएएच बॅटरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2015 5:54 am

Web Title: lenovo 4g lte smartphone a6000 launched at rs 6999
Next Stories
1 कारच्या किंमतीचा स्मार्टफोन!
2 शेअरिंगचा फंडा
3 परदेशी शिका ऑनलाइन
Just Now!
X