News Flash

एलजी टेक शो २०१३: भारतीय बाजारपेठेसाठी एलजीची विशेष उत्पादने!

गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने बनविण्यात अग्रेसर असलेल्या एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने दिल्लीत आयोजित केलेल्या एलजी टेक-शो २०१३ मध्ये ८४ इंची अल्ट्रा एचडी टीव्ही, एक्स बुम ऑडिओ

| April 26, 2013 02:42 am

गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने बनविण्यात अग्रेसर असलेल्या एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने दिल्लीत आयोजित केलेल्या एलजी टेक-शो २०१३ मध्ये ८४ इंची अल्ट्रा एचडी टीव्ही, एक्स बुम ऑडिओ सिस्टिम, साँगस्टार- सिंग अ‍ॅलाँग सिस्टिम, १०० इंची लेझर डिस्प्ले प्रॉजेक्टर, ५५ इंची ओएलईडी टीव्ही, ऑप्टिमस जी प्रो मोबाइल फोन, पॉकेट फोटो प्रिंटर, लॉन्ड्री मशीन, वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटरची मालिका, एसी, अल्ट्राबुक अशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली उत्पादने प्रदर्शित केली. ही सर्व गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उत्पादने चालू वर्षांत एक एक करून बाजारपेठेत आलेली पाहायला मिळतील. एलजीने अशा प्रकारे आयोजित केलेला हा भारतातील पहिलाच टेक शो होता. भारतीय ग्राहकाच्या राहणीमानात झालेला बदल, गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने विकणाऱ्या कंपन्यांमध्ये असलेली तीव्र स्पर्धा लक्षात घेऊन काळाच्या पुढे राहण्याच्या एलजीच्या प्रयत्नांचाच हा एक महत्त्वाचा भाग होता. भारतीय बाजारपेठेत ट्रेण्ड सेटरची भूमिका बजावण्याचा एलजीचा मानस असून या टेक- शोमधून त्यावर अधिक भर देण्यात आला होता.
या शोमधील प्रमुख आकर्षण होते ते एलजीचा सध्या चर्चेत असलेला ऑप्टिमस जी प्रो मोबाइल फोन, त्याचप्रमाणे मोठा स्क्रीन असलेला ८४ इंची अल्ट्रा एचडी टीव्ही, ५५ इंची ओएलईडी टीव्ही, एक्स बूम ऑडिओ सिस्टीम, साँगस्टार-सिंग अ‍ॅलाँग सिस्टिम, १०० इंची लेजर डिस्प्ले प्रॉजेक्टर, पॉकेट फोटो प्रिंटर या साऱ्यांची अधिक माहिती याप्रमाणे  
ओएलईडी टीव्ही
या टेक शोमध्ये एलजीने ओएलईडी टीव्ही सादर केला. हा टीव्ही ५५ इंचाचा असून याची जाडी फक्त ४ मिलिमीटर आहे. याचे वजन १० किलोग्रॅमपेक्षा ही कमी आहे. यात असलेल्या उत्कृष्ट डब्ल्यूआरजीबी टेक्नॉलॉजीमुळे चित्र अतिशय सुस्पष्ट दिसते. या टीव्हीच्या निर्मितीमुळे एलईडी टीव्हीच्या क्षेत्रात एलजीने पुढचे पाऊल टाकले आहे. http://youtu.be/tOrvSJSVxsA

पॉकेट फोटो प्रिंटर
पॉकेट फोटो प्रिंटर एलजीचे हे अनोखे उत्पादन या शोचे खास आकर्षण होते. हा एक स्मार्ट मोबाइल प्रिंटर आहे. खिशात सहजपणे मावेल इतका हा प्रिंटर छोटा आहे. हा प्रिंटर वायरलेस असून तो सहजपणे कुठेही सोबत नेता येण्यासारखा आहे. सर्व प्रकारच्या अ‍ॅन्ड्रॉइड किंवा आयओएस मोबाइल फोन किंवा टॅब्लेटशी हा संलग्न होऊ शकतो. या छोटय़ाशा प्रिंटरला ब्ल्यूटुथ, एनएफसी (निअर फिल्ड कनेक्टिव्हिटी), किंवा यूएसबीच्या मदतीने स्मार्टफोन अथवा टॅब्लेटशी जोडता येते. याच्या वापरासाठी एलजीने तयार केलेले खास प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन मोबाइल फोनमध्ये इन्स्टॉल करणे गरजेचे असते. आकाराने छोटय़ा असलेल्या या प्रिंटरचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यात शाईचा वापर न होता विशिष्ट प्रकारच्या फोटो पेपरचा वापर होतो. या फोटो पेपरमध्ये मूलत:च रंगांचा समावेश असल्याने प्रिंटरमधील उष्णतेमुळे गरजेनुसार ते रंग वर येतात आणि चित्र छपाई होते. यातील टॅप हा संपर्क प्रकार एनएफसी (निअर फिल्ड कनेक्टिव्हिटी) तंत्रज्ञानावर चालतो, ज्यात प्रिंटर आणि मोबाइलचा एकमेकांना स्पर्श होताच प्रिंटर कार्यरत होतो. याशिवाय विविध प्रकारच्या फोटो फ्रेम्स किंवा थिम्स वापरून फोटो सजवता येतो. यात ५०० mAh ची बॅटरी असून, पूर्णपणे चार्ज असलेल्या स्थितीत हा प्रिंटर १५ फोटो प्रिंट्र करतो. यात २x३ इंच आकाराचा फोटो अवघ्या ४५ सेकंदात प्रिंट होतो. http://youtu.be/tOrvSJSVxsA

ऑप्टिमस जी प्रो स्मार्टफोन
सध्या चर्चेत असलेला एलजीचा ऑप्टिमस जी प्रो हा स्मार्टफोनसुद्धा या प्रदर्शनात ठेवण्यात आला होता. ग्राहकांचे मोठय़ा स्क्रीनच्या मोबाइलसाठीचे असलेले आकर्षण लक्षात घेऊन एलजीने या फोनमध्ये ५.५ इंच फूल एचडी आईपीडी डिस्प्ले दिला असून मागील बाजूस १३ मेगापिक्सलचा आणि पुढील बाजूस २.१ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ‘मिराकास्ट’ नावाची सुविधा देण्यात आली आहे. वाय-फायद्वारे फोन टीव्हीशी कनेक्ट केल्यावर फोनमध्ये असलेल्या ‘मिराकास्ट’ सुविधेमुळे या फोनचा डिस्प्ले टीव्हीवर प्रकट होतो आणि क्षणार्धात फोनच्या छोटय़ा स्क्रीनवरील चित्र टीव्हीवरील मोठय़ा स्क्रीनवर दिसू लागते. मोबाइलच्या स्क्रीनवर जे काही दिसेल ते टीव्हीच्या स्क्रीनवर प्रकट होते आणि यामुळे मोठय़ा स्क्रीनचा आनंद घेता येतो. विशेष म्हणजे याद्वारे टीव्हीच्या मोठय़ा स्क्रीनवर प्रकट होणाऱ्या चित्राच्या सुस्पष्टतेच्या गुणवत्तेमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक होत नाही. या सुविधेचा वापर करून मोबाइलद्वारे टीव्हीवर चित्रपट पाहता येतो, टीव्हीच्या मोठय़ा स्क्रीनवर गेम खेळण्याचा आनंद घेता येतो. यातील ‘डय़ुअल स्क्रीन डय़ुअल प्ले’ फंक्शनमुळे मोबाइलद्वारे टीव्हीवर चित्रपटाचे प्रक्षेपण होत असताना मोबाइल दुसऱ्या कामासाठी सुद्धा वापरता येतो. याशिवाय या फोनमध्ये ‘क्यू स्लाइड’ नावाची सुविधा देण्यात आली आहे. ‘क्यू स्लाइड’ सुविधेचा वापर करून मोबाइलवर प्ले होत असलेल्या व्हिडीओची ट्रान्स्फरन्सी धूसर अथवा प्रखर करता येते. समजा व्हिडीओ पाहत असताना तुम्हाला एखादा एसएमएस आला, तर या सुविधेचा वापर करून तुम्ही व्हिडीओ धूसर करून एसएमएस वाचू शकता. या फोनमधील ‘डय़ुअल कॅमेरा डय़ुअल रेकॉर्डिग’ सुविधेचा वापर करून तुम्ही पुढील आणि मागील कॅमेराद्वारे एकाच वेळी व्हिडीओ रेकॉर्डिग करू शकता. तुम्ही पॅराग्लाइडिंग, बंजीजंपिंग, रोलरकोस्टरसारखे थरारक क्षण अनुभवत असताना या सुविधेचा वापर करून व्हिडीओ शूटिंग करीत असाल तर एकाच वेळी मागील कॅमेऱ्याने व्हिडीओ शूटिंग होत असताना पुढील कॅमेराद्वारे तुमच्या चेहऱ्यावरील थरारक हावभावांचे व्हिडीओ शूटिंग होत असते. यात अ‍ॅन्ड्रॉइड जेलिबीन, ३१४० mAh क्षमतेची बॅटरी आणि ३२ जीबी इंटर्नल मेमरी असून ती ६४ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. भारतात हा फोन जून किंवा जुलैपर्यंत दाखल होण्याची शक्यता असून याची अंदाजे किंमत ४० हजार रुपयांपर्यंत असू शकते. http://youtu.be/tOrvSJSVxsA

‘हॅक्टो’ लेझर डिस्प्ले प्रॉजेक्टर
एलजीने बीटूबी बाजारात जगातील प्रमुख कंपनी बनण्यासाठीचे आपले लक्ष निश्चित केले असून, याचाच एक भाग म्हणून डिस्प्ले तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी विकसित केलेले ‘हॅक्टो’ लेझर डिस्प्ले प्रॉजेक्टर या प्रदर्शनात ठेवण्यात आला होता. एलजीचा असा दावा आहे की त्यांचे हे उत्पादन म्हणजे होम थिएटर क्षेत्रातील एक ‘मास्टरपीस’ आहे, ज्यात १०८० पिक्सेलचे रिझोल्युशन असून यात २२ इंचापासून ते १०० इंचापर्यंत स्क्रीन प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. या प्रॉजेक्टरमध्ये वापरण्यात आलेल्या एलजीच्या लेझर टेक्नॉलॉजीमुळे अतिशय उत्कृष्ट कॉन्ट्रास्ट असलेले मोठय़ा आकारातील सुस्पष्ट चित्र प्रक्षेपित होते, त्याची क्षमता १०,०००,०००:१ डायनॅमिक कॉन्ट्रास रेशो इतकी आहे. याशिवाय यात डिजिटल टय़ूनर, १० वॅटचे इनबिल्ट स्पीकर, तीन एचडीएमआय इनपुट पोर्ट, RS-232 पोर्ट आणि स्मार्ट टीव्ही अशा अनेक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. http://youtu.be/tOrvSJSVxsA

एलजी अल्ट्रा एचडी टीव्ही
एलजीने निर्माण केलेला ८४ इंचाचा अतिशय भव्य स्क्रीन आणि सुस्पष्ट चित्र असलेला एलजी अल्ट्रा एचडी टीव्ही येथे सादर करण्यात आला. ४२ इंचांचे चार टीव्ही एकमेकांना जोडल्यावर जेवढा मोठा स्क्रीन तयार होईल तेवढा भव्य स्क्रीन या टीव्हीचा आहे. सिनेमा स्क्रीन असलेला हा अल्ट्रा स्लीम एलईडी टीव्ही असून, यात सिनेमा थ्रीडी, डय़ुएल डिस्प्ले, २डी टु थ्रीडी, २.२ स्पीकर सिस्टम – १० वॅटचे दोन स्पीकर आणि १५ वॅटचे दोन वुफर, ३८४०:२१६० चे अल्ट्रा एचडी रेझोल्युशन, अ‍ॅडव्हान्स आयपीएस एलईडी एलसीडी पॅनल, मॅजिक रिमोट, स्मार्ट शेअर – मोबाइल शेअर लिंक, सेकंड डिस्प्ले, स्काइप रेडी, फुल वेब ब्राऊझर, वायफाय कनेक्टिव्हिटी, ३ यूएसबी पोर्ट, ४ एचडीएमआय पोर्ट, स्मार्ट एनर्जी सेव्हिंग अशी अनेक वैशिष्टय़े देण्यात आली आहेत. भारतीय बाजारात याची किंमत १७,००,००० रुपये इतकी आहे.

एलजी साँगस्टार
भारतीयांचे संगीतप्रेम लक्षात घेऊन खास भारतीय बजारपेठेसाठी एलजी साँगस्टार नावाचे माईक सदृश उत्पादन एलजीने निर्माण केले आहे, जे या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. याद्वारे आपण संगीताचा एक वेगळा अनुभव घेऊ शकतो. ४००० पेक्षा जास्त गाणी, याशिवाय इंग्रजी, हिन्दी आणि स्थानिक भाषा मिळून ९ भाषांचा यात समावेश करण्यात आला आहे. यात क्लासिक, रॉक, हीप हॉप, जाझ आणि कंटेम्पररी असे संगीताचे पर्याय निवडण्याची सोय देण्यात आली आहे. गाताना आवाजातील चढउतारावर नियंत्रण ठेवण्यासाठी यात एको की कंट्रोल आणि टेम्पो कंट्रोलची सुविधा देण्यात आली आहे.

एक्सबूम
एक्सबूम नावाची म्युझिक सिस्टिमही या प्रदर्शनात होती. एलजीचे हे उत्पादन म्हणजे अतिशय पॉवरफुल असे साऊंड मशीनच आहे. यातील २३०० वॅट आरएमएस आणि २५००० वॅट पीएमपीओ क्षमतेच्या आउटपुटमुळे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे संगीत ऐकू येते. खूप मोठय़ा आवाजात केला असता सुद्धा यातील बाझ आणि आवाज फाटत नाही. यात ‘स्मार्ट डीजे’ नावाचा बिल्ट-इन डीजे साऊण्ड इफेक्ट पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय यात ५ प्रकाराचे आवाज, ६ प्रकाराचे बीट बॉक्स आणि ७ प्रकाराचे डीजे इफेक्ट असे पर्याय देण्यात आले आहेत. यातील जॉग डायले गमतीशीर आवाज निर्माण करता येतात. भारतीय बाजारात याची किंमत १,००,००० रुपये इतकी आहे.
याशिवाय, लॉण्ड्री मशीन, वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटरची मालिका, एसी, अल्ट्राबुक अशी अनेक एलजीची उत्पादने या एलजी टेक शो २०१३ मध्ये ठेवण्यात आली होती.
या प्रदर्शनानिमित्त बोलताना ‘एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया’चे  महाव्यवस्थापक स्वून क्वॉन म्हणाले की, टेक्नालॉजी आणि नावीन्यता या बाबी सुरुवातीपासूनच एलजीच्या प्रगतीचा महत्त्वपूर्ण भाग राहिल्या आहेत. भविष्यात भारतीय बाजारपेठेतील आपला व्यवसाय अधिक मजबूत करण्याचा संकल्प असून २०१३ मध्ये एकंदर २०% वाढ करण्याचे लक्ष निश्चित केले आहे. भारत ही एलजीसाठी प्रमुख बाजारपेठ असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की भारतात आम्ही जागतिक दर्जाच्या उत्पादनांबरोबरच भारतीय बाजारपेठेसाठी खास विकसित केलेली उत्पादने घेऊन आलो आहोत, जी ग्राहकांच्या सुविधांना लक्षात ठेवून बनविण्यात आली आहेत.
भारतीय ग्राहकांचे बदलते राहणीमान आणि खरेदी करण्याच्या क्षमतेत झालेला बदल, त्याचप्रमाणे भारतीय बाजारपेठेत असलेली गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन विक्रीतील स्पर्धा लक्षात घेऊन एलजीने त्यांची भविष्यातील आणि २०१३ मध्ये उपलब्ध होणारी उत्पादने या एलजी टेक शो २०१३ मध्ये प्रदर्शित केली होती. ग्राहकराजा या उत्पादनांना किती पसंती देतो ते येणारा काळच ठरवील.
– दीपक दामले
deeepak.damle@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 2:42 am

Web Title: lg tech show 2013 new products from lg for indian market
टॅग : Tech It,Tv
Next Stories
1 स्मार्ट फ्युचर : आता डीजे स्मार्टफोन !
2 अ‍ॅपलच्या ‘सिरी’ला प्राप्त होणार भावभावना!
3 सॅमसंगची भरारी मेगाच्या दिशेने
Just Now!
X