काही उत्पादने भारतात विशेषत: बोलीभाषेत एका विशिष्ट बॅण्डनेच ओळखली जातात़  साधारणपणे प्रत्येक चॉकलेटला कॅडबरी म्हटले जात़े  प्रत्येक टूथपेस्टला कोलगेट म्हणण्याचाही प्रघात आह़े  घराघरांपर्यंत या उत्पादनांची असलेली पोहोच, हेच या मागचे कारण आह़े  तसेच भारतात लोकांना मोबाइल माहीत होण्याच्या काळात ‘नोकीया’ हेही असेच उत्पादनाला ओळख देणारे ‘बॅण्डनेम’ झाले होत़े  परंतु, गेल्या काही वर्षांत नोकीयाच्या घोडदौडीला अ‍ॅपल, सॅमसंग या मोठय़ा जागतिक ब्रॅण्डस्नी तर मायक्रोमॅक्स आणि विशेषत: चिनी कंपन्यांच्या काही किफायतशीर हॅण्डसेटस्नी चांगलेच लगाम लावले. त्यामुळे ‘एन’ सिरिज असेल किंवा इतरही काही सिरिजमधील मॉडेल्स सारे काही गुंडाळून भारतात नोकीयाला आता केवळ लुमिया आणि आशा या दोन सिरिजच्या कामगिरीवरच समाधान मानावे लागते आह़े
त्यामुळे लुमिया आणि आशा या वेगवेगळ्या रेंजमधल्या मोबाइल सिरिजमध्ये नवनव्या हॅण्डसेटची भर घालण्याचा नोकीयाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतो़  याचाच एक भाग म्हणून नोकीयाने नुकताच आशा सिरिजमधील ‘५०१’ हा नवा हॅण्डसेट बाजारात आणला़  यातील वैशिष्ट्य पूर्वीच्या आशा फोनपेक्षा फार काही वेगळी नसली, तरीही वैशिष्ट्यांमध्ये वाढ मात्र अवश्य करण्यात आलेली आह़े  नोकीयानेच केलेल्या दाव्यानुसार, फीचर फोनकडून स्मार्टफोनकडे वळू इच्छिणाऱ्या तरुणाईला डोळ्यांपुढे ठेवून हा फोन बनविण्यात आलेला आह़े  त्यामुळे फीचर फोनपेक्षा साधारण तेव्हढय़ाच किमतीत मिळणारा स्मार्टफोन बरा अशा दृष्टीने पाहणाऱ्यासाठी हा फोन अगदी योग्य आह़े
या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे फेसबुकसारखी अ‍ॅप्लिकेशन्स यात विनामूल्य आहेत़  तसेच एअरटेलसोबत हा फोन घेतल्यास सुरुवातीचे पाच महिने विनामूल्य फेसबुक वापरता येणार आह़े  या आधीच्या आशा फोनपेक्षा हा वेगवान असल्याचा कंपनीचा दावा आह़े  तसेच इतर स्मार्टफोन प्रमाणे सिंगल बॅक बटन, सुलभ स्व्ॉपिंग, वायफाय आदी अनेक वैशिष्ट्येही यात आहेत़  नोकीया स्टोअरमधून चाळीसहून अधिक विनामूल्य अ‍ॅप्स डाऊनलोड करता येणार आहेत़  नोकीया एक्सप्रेस ब्राऊजर यात आधीपासूनच असणार आहेत़  आतापर्यंतच्या नोकीया फोनमध्ये उपलब्ध नसणारे ‘नोकीया एक्सप्रेस नाऊ’ हे नवे अ‍ॅप्लिकेशन या फोनमध्ये विनामूल्य डाऊनलोड करता येणार आह़े  वेब ब्राऊजिंग अधिक सुलभ, वेगवान आणि वैशिष्टपूर्ण करणारे हे अ‍ॅप्लिकेशन असल्याचे नोकीयाचे म्हणणे आह़े  काही नवे आणि वैशिष्ट्यपूर्ण गेम विक्रीसाठीही नोकीया स्टोरमध्ये उपलब्ध असणार आहेत़  त्यामुळे नोकीयासाठी नवनवे अ‍ॅप्स आणि गेम्स तयार करणाऱ्या डेव्हलपर्ससाठी हा चांगला बाजार असल्याचे नोकीयाचे म्हणणे आह़े
विशेष म्हणजे या फोन सोबत चार जीबीचे मेमरी कार्ड विनामूल्य मिळणार आहे आणि ३२ जीबीपर्यंत मेमरी वाढविता येणार आह़े  या डयुएल सीम फोनची दीर्घकाळ टिकणारी बॅटरी हे वैशिष्ट्य इतर स्मार्ट फोनच्या तुलनेत ‘आशा ५०१’ला अव्वल ठरवत़े  बॅटरी टॉक टाईम तब्बल १७ तासांचा आह़े  तर सिंगल सिम स्टॅण्डबाय बॅटरी क्षमता ४८ दिवस आणि डयुएल सिम असल्यास २६ दिवस आह़े  प्रमुख भारतीय भाषा, साडेतीन हजार संपर्क साठविण्याची क्षमता आणि ऑर्केस्ट्र रिंगटोन्स ही ५०१ ची आणखी काही वैशिष्ट्य आहेत़
या फोनचा स्क्रीन मात्र स्मार्टफोनला न शोभणारा असा आह़े  स्क्रीन केवळ तीन इंचांचा आह़े  याबाबतीत नवा आशा जरा मार खाण्याची शक्यता आह़े  परंतु, किफायती दरात चांगला स्मार्ट फोन घेण्याचा विचार असणाऱ्यांसाठी आशा ५०१ हा चांगला पर्याय आह़े  विशेष म्हणजे याचे बाह्यआवरण सहज बदलता येत़े  त्यामुळे विविध रंगात हा फोन वापरता येईल़  तरुणाईला आकर्षित करणारे हे आणखी एक वैशिष्टय़ आह़े  एकंदर जूनपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणारा हा फोन मध्यमवर्गियांसाठी निश्चितच चांगला पर्याय आह़े

वैशिष्ट्ये :
नोकीया आशा ५०१
डायमेंशन्स : ९९.२ x ५८ x १२.१ मिमि, ९८ ग्राम
कॅमेरा : ३.२ एमपी
सिंगल सिम स्टॅण्डबाय कालावधी : ४८ दिवस
डयुएल सिम स्टॅण्डबाय कालावधी : २६ दिवस
टॉक टाईम : १७ तास
४ जीबी मेमरी कार्ड (३२ जीबी एक्सपाण्डेबल)
४० विनामूल्य डाऊनलोड गेम्स
उपलब्ध रंग : ब्राइट रेड, ब्राइट ग्रीन, साइअन, पिवळा, पांढरा आणि काळा
किंमती : ९९ डॉलर + टॅक्स