बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे आय. आय. टी सारख्या संस्थांमधून विज्ञान-तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. परंतु फारच थोड्या जणांचे हे स्वप्न पूर्ण होते. इतर बहुसंख्य हुषार विद्यार्थ्यांना इतर संस्थांमधून प्रवेश घ्यावा लागतो. आय. आय. टी मधील प्रतिभावंत प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना नेमके कसे शिकवतात याविषयी या इतर विद्यार्थ्यांना कुतूहल असणे सहाजिक आहे. ही दर्जेदार लेक्चर्स भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वाना विनामूल्य उपलब्ध व्हावीत या उद्देशाने http://nptel.ac.in/  ही साईट तयार करण्यात आलेली आहे.
आय. आय. टी मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मद्रास आणि रुरकी या सात भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि भारतीय विज्ञान संस्था बंगलोर यांनी संघटित होऊन नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्सड लìनग (एनपीटीइएल) हे प्रोजेक्ट सुरू केलेले आहे. ह्याला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे अर्थसहाय्य लाभले आहे.
या प्रोजेक्टच्या अंतर्गत अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि मानवविज्ञान यासारख्या विविध शाखांवरील ऑनलाईन वेब आणि व्हिडिओ कोस्रेस उपलब्ध आहेत. प्रत्येक कोर्समधे अंदाजे एक तासाची चाळीस व्हिडिओ लेक्चर्स आहेत. ही लेक्चर्स तुम्हाला डाऊनलोड करून घेता येतात किंवा युट्युबवर https://www.youtube.com/iit  या िलकवर पाहता येतात. आवश्यक तिथे सरावासाठी असाईनमेंटस देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कोस्रेसच्या संबंधित लिखित स्वरूपातील साहित्य हे पीडीएफ फॉरमॅटमधे उपलब्ध आहे. कोर्स शिकताना तुम्हाला काही शंका असल्यास त्या विचारण्याची सोय साईटवर आहे. संबंधित प्राध्यापकांकडून त्यांचे निरसन केले जाते. काही व्हिडिओ फॉरमॅटमधल्या लेक्चर्सना इंग्रजी सबटायटल्स उपलब्ध झालेली आहेत.
सध्या या साईटवर बाराशेहून अधिक कोस्रेस उपलब्ध आहेत. ज्यामधे
चोवीस शाखांचा समावेश आहे. उदाहरणादाखल, एअरोस्पेस, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, टेक्स्टाईल इंजिनिअिरग इत्यादी.
या साईटवर शाखांनुसार तसेच शिक्षण संस्थांनुसार कोस्रेस शोधण्याची सोय आहे. काही कोस्रेससाठी सर्टििफकेशन देखील उपलब्ध आहे. त्यासाठी घेतल्या जाणा-या परीक्षेसाठी तुम्हाला रजिस्टर करावे लागते आणि परीक्षेची नाममात्र रक्कम भरावी लागते. ज्यांच्याकडे व्हिडिओ डाऊनलोड करताना लागणा-या बँडविथवर मर्यादा असते त्यांच्यासाठी ऑडिओ आणि ट्रान्सक्रिप्टचा (लिखित स्वरूपातील लेक्चर्स) पर्यायही खुला करून देण्यात आला आहे. ते तुम्हाला http://textofvideo.nptel.iitm.ac.in/  या िलकवर बघता येईल.ऑडियो लेक्चर्स एमपी3 फॉरमॅटमधे आणि लेक्चर्सचे ट्रान्सक्रिप्टस पीडीएफ फॉरमॅटमधे उपलब्ध आहेत, जी तुम्हाला डाऊनलोड करून घेता येतात.
व्हिडिओ लेक्चर्सचे ट्रान्सक्रिप्ट तयार करणे ही मॅन्युअल प्रोसेस असल्यामुळे त्यात काही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तयार झालेले ट्रान्सक्रिप्ट हे मूळ प्राध्यापकांकडून तपासून घेतले जाते आणि आवश्यक त्या सुधारणा केल्या जातात. परंतु या संपूर्ण प्रक्रियेसाठी दीर्घ कालावधी लागतो. या ट्रान्सक्रिप्टचा वापर करताना तुम्हाला अशा त्रुटी आढळल्यास तुम्ही देखील संबंधितांकडे संपर्क करू शकता. थोडक्यात, ज्यांना या नामांकित संस्थांमधील प्राध्यापकांकडून ज्ञानसंपादन करण्याची इच्छा आहे अशा सर्व व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात.
– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com