10 August 2020

News Flash

‘ऑफिस २०१३’: महत्वाच्या टिप्स

कॉम्प्युटर न येणा-या माणसाला पहिल्यांदा जर काही शिकयचं असतं, तर ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस. कारण रोजच्या आयुष्यातील छोटी-मोठी काम करण्यासाठी त्याला ऑफिसची फार मोठी मदत

| August 6, 2012 10:39 am

कॉम्प्युटर न येणा-या माणसाला पहिल्यांदा जर काही शिकयचं असतं, तर ते म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस. कारण रोजच्या आयुष्यातील छोटी-मोठी काम करण्यासाठी त्याला ऑफिसची फार मोठी मदत होत असते. आजवर मायक्रोसॉफ्ट ऑफिसची अनेक व्हर्जन्स बाजारात आली आहेत. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन सुधारणा घडवत आणि वेगळं काहीतरी असणा-या या व्हर्जन्समुळे कॉम्प्युटरवरचे काम मात्र सोपे झाले आहे हे खरे.
नवीन व्हर्जन्सशी जुळवून घेताना थोडा वेळ लागतो म्हणा, पण एकदा का ते अंगवळणी पडलं तर मग काही प्रॉब्लेम नाही. दरवेळेस लहान-सहान सुधारणा करणा-या मायक्रोसॉफ्टने यंदा मात्र ऑफिस 2012 बाजारात आणताना खूप महत्वाचे आणि मोठे बदल केले आहेत. नवीन मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 हे माऊस, किबोर्ड द्वारे वापरता येतेच. परंतू टच फिचर्स असणा-या डिवाईसवर याची खरी गंमत अनुभवता येणार आहे. म्हणूनच मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 हे आता टॅबलेटसह, मोबाईलवरही वापरता येईल.  
आम्ही मायक्रोसॉफ्टमध्ये खूप बोल्ड स्टेप घेत आहोत, असे सॅन फ्रॅन्सिस्को येथे मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 चे लॉंचिंग करताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ स्टीव्ह बालमेर म्हणाले होते. हे अगदी खरेच आहे, कारण नवीन मॉडर्न ऑफिस हे कार्यालयीन आणि दैनंदिन कामासाठी ऑफिस वापरणा-यांसाठी एक वेगळा अनुभव असणार आहे. ही क्लाऊड सर्वसि असून तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जर ऑपरेटींग सिस्टम विंडोज 8 जर असेल तर त्याला आणखी झळाळी येईल. तुम्ही या नवीन मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 मधील नव्या फिचर्सना पाहून गोंधळून जाऊ नये यासाठी टेक-इट मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 मधील टॉप दहा फिचर्स सोपे करून सांगत आहे.
1) टच स्क्रिन – नवीन मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 चा वापर तुम्ही टच स्क्रिनवर अगदी सुलभपणे करू शकणार आहात. दोन बोटांची चिमटी करून डॉक्युमेंट आणि प्रेझेंटेशन लहान किंवा मोठे करणे, विविध फिचर्ससाठी टॅप करणे आणि ते क्षणार्धात ओपन होणे अशा गमती यामध्ये आहेत.  
2) इंकिंग – मजकूर लिहिण्यासाठी तुम्ही स्टायलसचा वापर करू शकता, नोट्स घेऊ शकता आणि विविध फिचर्स ऑपरेट करू शकता. हाताने तुम्ही ईमेलला उत्तर पाठवू शकता आणि त्याला मजकूरामध्येही कन्वर्ट करू शकता. करून प्रेझेंटेशन करताना लेझर पॉईंटर म्हणून देखिल स्टायलसचा वापर करू शकता.  
3) अ‍ॅप्स – ऑफिससाठीचे विंडोंज 8 अ‍ॅप्लिकेशन हे वननोट आणि लिंक यांना रिप्रेझेंट करते. ही अ‍ॅप्लिकेशन्स टॅबलेटवर टच फर्स्टचा अनुभव देण्यासाठी तय़ार करण्यात आली आहेत. वननोट चा नवा रेडिअल मेन्यू हा फिंगर टचद्वारे हे अ‍ॅप्लिकेशन्स वापरण्यास आणखी सोपे करतो.  
4) स्कायड्राईव्ह – ऑफिस हे स्कायड्राईव्हला स्वत:हून सेव्ह करतं, म्हणजेच मजकूर हा सर्व टॅबलेट, कॉम्प्युटर आणि फोनवर कुठेही उपलब्ध होणार आहे. तसेच हेच डॉक्युमेंट ऑफलाईनही उपल्बध असेल व इंटरनेटशी कनेक्ट केल्यावर सिंक करता येईल.  
5) न्यू सबस्क्रिप्शन सर्विसेस – नवीन ऑफिस हे क्लाऊडबेस सबस्क्रिप्शन सर्विसेसवर उपलब्ध असेल. याचाच अर्थ ग्राहकांना आपोआप भविष्यातील नवीन अपडेट्स मिळतील. त्यामध्ये स्काईप वर्ल्ड मिनिट्स आणि एक्स्ट्रा स्कायड्राईव्ह स्टोरेजही मिळणार आहे. सबस्क्रायबरला पाहिजे तितक्या वेळा आणि कुटुंबातील प्रत्येकाला ते आपल्या सर्व डिवाईसमध्ये इन्स्टॉल करता येईल.  
6) स्टे कनेक्टेड – यामध्ये तुम्हाला पहिल्यांदाच लोकांबरोबरच, टिम्स, डॉक्युमेंट्सना फॉलो करता येणार आहे. तुम्ही फोटोज पाहू शकणार आहात आणि नवीन टाकूही शकणार आहात. त्याचबरोबर अपडेटेड राहण्यासाठी व्हिडिओ आणि ऑफिस मजकूरही टाकू शकता.
7) स्काईप – नवीन ऑफिसमध्ये स्काईप आहे, ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला 60 आंतर्राष्ट्रीय मिनिटे मोफत मिळणार आहेत. तुम्हाला कुणाचेही कॉन्टॅक्ट सेव्ह करता य़ेणार असून त्यांना मेसेजही करता येणार आहे.
8) रिडिंग, मार्कअप – नव्या ऑफिसद्वारे तुम्हाला पहिल्यांदाच वाचनाचा एक वेगळा अनुभव मिळणार आहे. तुमच्या लहान-मोठ्या स्क्रिनप्रमाणे त्यावरील मजकूर वाचता येणार आहे. तो तुम्ही झूम-इन आणि झूम-आऊट करू शकता, डॉक्युमेंटमधील व्हिडिओ पाहू शकता, मार्क केलेल्या जागा पाहू शकता आणि पाने देखिल पलटू शकता.
9) डिजिटल नोट-टेकिंग – वननोटच्या मदतीने तुम्ही क्लाऊडवर नोट्स सेव्ह करू शकता आणि त्या तुम्हाला कोठेही पहावयास मिळू शकतात. एखादा फक्त टच करून, पेनाच्या किंवा किबोर्डच्या सहाय्याने नोट्स घेऊ शकतो. किंवा या सगळ्यांचा एकत्रित वापर करू शकतो आणि त्याचा एकामागोमागही वापर करू शकतो.   
10) मिटींग – पावरपॉईंट प्रेझेंटरमधील नव्या फिचर्समध्ये तुम्हाला तुमच्या खासगी आणि पुढच्या स्लाईड्सची माहिती मिळते. प्रेझेंटेशनची वेळ आणि स्पीकर नोट्स या एका नजरेत पहावयास मिळतात. प्रेझेंटेशन करताना एखादा झूम-इन करू शकतो, हवं ते मार्क करू शकतो आणि स्टायलसच्या मदतीने स्लाईडही बदलू शकतो. लिंकमध्ये मल्टीपार्टी एचडी व्हिडिओ हे प्रेझेंटेशनसोबत पहावयास मिळतात आणि एकत्रित एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी वननोट नोटबुक आणि व्हíचयुअल व्हाईटबोर्डवरही शेअर करता येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2012 10:39 am

Web Title: office 2013 microsoft tech technology
Next Stories
1 बाजारपेठेची गणिते ‘विंडोज ८’वर बेतलेली!
2 स्मार्ट चॉईस : एसर अ‍ॅस्पायर वन डी २७०
Just Now!
X