22 November 2017

News Flash

पोर्ट्रॉनिक्स प्युअर साऊंड बार

वेगेवगळ्या पद्धतीची असलेली उपकरणे आता पोर्टेबल होत आहेत. ग्राहकांनाही पोर्टेबल उपकरणांमध्ये अधिक स्वारस्य आहे.

Updated: January 4, 2013 3:26 AM

वेगेवगळ्या पद्धतीची असलेली उपकरणे आता पोर्टेबल होत आहेत. ग्राहकांनाही पोर्टेबल उपकरणांमध्ये अधिक स्वारस्य आहे. त्यामुळे कंपन्यांनी अनेक नवीन पोर्टेबल उपकरणे बाजारात आणली आहेत आणि या नव्या वर्षांत बाजारपेठेत येणाऱ्या या उपकरणांची संख्या तिपटीहूनही अधिक असेल, अशा अंदाज आहे. यातही सर्वाधिक मागणी आहे ती साऊंड बारना. हे साऊंड बार तुम्हाला लॅपटॉप किंवा मग टॅब्लेट अथवा नेहमीच्या डेस्कटॉपसोबतही वापरता येतात. पण प्रामुख्याने त्यांचा वापर होतो तो पोर्टेबल असलेल्या उपकरणांसोबत म्हणजेच लॅपटॉप किंवा टॅब्लेट. यातही अनेक प्रकार आहेत. काहींचा वापर केवळ आऊटपूटसाठीचे उपकरण म्हणून केला जातो.
पण आता पोर्ट्रॉनिक्स या कंपनीने आणलेला साऊंड बार याही पुढे जाणारा आहे. प्युअर साऊंड प्रो नावाच्या या उपकरणामध्ये बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. यात टबरे बास हे पेटंटेड तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या बारमध्ये त्याचे अ‍ॅकॉस्टिक चांगले राखण्यासाठी दोन पोकळ भागांचा वापर करण्यात आला आहे. एफएम त्याचप्रमाणे ऑडिओ ऐकण्यासाठीचे विविध फॉर्मॅटस् यांचा वापर यात केला जाऊ शकतो. यामध्ये एनबिल्ट मीडिया प्लेअरची सोय आहे. त्यामुळे तुम्ही थेट यूएसबीची जोडणी करून किंवा एसडी कार्ड वापरूनही संगीत ऐकण्याची सोय यात आहे. टॅब्लेट किंवा पीसीला जोडण्यासाठी ३.५ मिमीचा ऑक्झिलरी पोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये बीएल- ५ सी ही लिथिअम आयन बॅटरी वापरण्यात आली असून कंपनीच्या दाव्यानुसार एकदा चार्ज केलेली बॅटरी तब्बल आठ तास व्यवस्थित काम करते.

भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ३,४९९/-

First Published on January 4, 2013 3:26 am

Web Title: potranix pure sound bar