05 March 2021

News Flash

यू ज्युइस ‘पॉवरबँक’

स्मार्टफोनच्या वाढत्या ग्राहकसंख्येसोबत भारतीय बाजारात पोर्टेबल ‘पॉवरबँक’चीही मागणी वाढू लागली आहे. एलजी, सॅमसंग, नोकिया

स्मार्टफोनच्या वाढत्या ग्राहकसंख्येसोबत भारतीय बाजारात पोर्टेबल ‘पॉवरबँक’चीही मागणी वाढू लागली आहे. एलजी, सॅमसंग, नोकिया अशा नामांकित कंपन्यांसोबत आता शाओमी, वनप्लस, आसूस या कंपन्यांचे ‘पॉवरबँक’ ग्राहकांना आकर्षित करत आहेत. याच मांदियाळीत आता मायक्रोमॅक्सच्या ‘यू’ ब्रॅण्डने ज्युइस या नावाखाली ५ हजार आणि १० हजार एमएएच क्षमता असलेली पॉवरबँक बाजारात उपलब्ध करून दिली आहे. या पॉवरबँकची किंमत अनुक्रमे ६९९ आणि १०९९ रुपये इतकी असून ते सध्या ‘स्नॅपडील’वरून विक्रीस उपलब्ध आहेत. सुमारे आठ मिलिमीटर जाडीच्या या पॉवरबँकमध्ये एक यूएसबी आणि एक मायक्रो यूएसबी पोर्ट दिले गेले आहेत. या पॉवरबँकचे वजनही सुमारे अडीचशे ग्रॅम असल्याने ती खिशातून नेणे सहज शक्य आहे. शिवाय या ‘पॉवरबँक’मध्ये बॅटरीक्षमता दर्शवणारे ‘एलईडी’ इंडिकेटरही बसवण्यात आले आहेत.
किंमत : पाच हजार एमएएच : ६९९ रु., १० हजार एमएएच : १०९९ रुपये.

‘डय़ुअल ओएस’ असलेला स्मार्टफोन
बाजारात सध्या डय़ुअल सिम असलेले स्मार्टफोन भरपूर प्रमाणात आहेत. मात्र, ‘एलेफोन’ या कंपनीने विंडोज आणि अँड्रॉइड या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिममध्ये चालवता येईल, असा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. ‘वॉवेनी’ असे या स्मार्टफोनचे नाव असून त्याची पूर्वनोंदणी ईकॉमर्स संकेतस्थळांवरून सुरू झाली आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात मिळेल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, त्याची किंमत २० हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये विंडोज १० आणि अँड्रॉइड लॉलिपॉप या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम पुरवण्यात आल्या असून या दोन्हींचा वापर वापरकर्त्यांला करता येईल.
या फोनमध्ये ५.५ इंच आकाराचा क्यूएचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले पुरवण्यात आला असून त्याचे रेझोल्युशन १४४० बाय २५६० पिक्सेल इतके आहे. २.२ गिगाहर्ट्झचा मीडियाटेक प्रोसेसर आणि ३ जीबी रॅममुळे हा स्मार्टफोन शक्तिशाली कामगिरीची हमी देतो. शिवाय यामध्ये तब्बल ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेजची सुविधा असून ती कार्डच्या साह्याने आणखी ६४ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकेल. या स्मार्टफोनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये तब्बल २०.७ मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला असून पुढील बाजूसही आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. शिवाय याची बॅटरीक्षमताही ४२०० एमएएच इतकी आहे.

‘लेनोव्हो’चा ‘वाइब शॉट’ स्मार्टफोन
लेनोव्होचा बहुचर्चित ‘वाइब शॉट’ स्मार्टफोन येत्या काही दिवसांत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.
१६ मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये मॉडय़ुलर लेन्ससह तिरंगी एलईडी फ्लॅश पुरवण्यात आला आहे. अगदी अंधारातही हा स्मार्टफोन चांगली छायाचित्रे देतो. याशिवाय या फोनला आठ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही पुरवण्यात आला आहे. अँड्रॉइड लॉलिपॉप ओएसवर चालणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकाराचा फुल एचडी डिस्प्ले पुरवण्यताअ ला आहे. १.७ गिगाहार्ट्झचा प्रोसेसर, तीन जीबी रॅम, ३२ जीबी अंतर्गत स्टोअरेज, फोरजी, वायफाय, जीपीएस, २९०० एमएएचची बॅटरी अशी याची अन्य वैशिष्टय़े आहेत. या फोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी तो २० हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

इंटेक्सचा अ‍ॅक्वा पॉवर-२
इंटेक्स कंपनीने तब्बल ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी असलेला ‘अ‍ॅक्वा पॉवर २’  हा स्मार्टफोन बाजारात दाखल केला आहे. या फोनमध्ये १.३ गिगा हार्ट्झचा प्रोसेसर आणि एक जीबी रॅम पुरवण्यात आला आहे. याची अंतर्गत मेमरी आठ जीबी असून ती ३२ जीबीपर्यंत वाढवता येईल. पाच मेगापिक्सेल मागील कॅमेरा आणि दोन मेगापिक्सेल पुढील कॅमेरा असलेला हा फोन निम्न किंमत श्रेणीतील चांगला फोन ठरू शकतो. याची किंमत ६४९० रुपये इतकी आहे.

आसूसचा नवा लॅपटॉप
आसूस कंपनीने तब्बल एक लाख १५ हजार ९९९ रुपये किंमत असलेला ‘झेनबुक प्रो यूएक्स ५०१’ हा लॅपटॉप बाजारात आणला आहे. १५.६ इंचांचा फोर के डिस्प्ले असलेल्या या लॅपटॉपमध्ये आठ जीबी रॅम पुरवण्यात आला आहे. त्याशिवाय केवळ व्हिडीओसाठी या लॅपटॉपमध्ये दोन जीबी रॅम स्वतंत्रपणे कार्यरत आहे. इंटेल कोअर आय ७ प्रोसेसर, एन्वीडिया जीफोर्स जीटी ९६० एम ग्राफिक्स कार्ड, ५१२ जीबी हार्डडिस्क अशी या लॅपटॉपची अन्य वैशिष्टय़े आहे. हा लॅपटॉप विंडोज ८.१ या ऑपरेटिंग सिस्टमवर कार्यरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 6:57 am

Web Title: power banks
Next Stories
1 आता ‘फोल्डेबल स्मार्टफोन’ येतोय..
2 अॅप विश्वातील बाप्पा
3 वाय-फायचा पासवर्ड कसा शोधू?
Just Now!
X