03 June 2020

News Flash

आभासी जगातील वास्तव उपकरणे

आभासी वास्तवता हा अभिनवतेचा एक नवा तंत्रज्ञान प्रकार आहे.

| June 9, 2015 03:02 am

आभासी वास्तवता हा अभिनवतेचा एक नवा तंत्रज्ञान प्रकार आहे. नव्वदच्या दशकात निटेंडोने व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटीमध्ये काम केले व त्यांच्या व्हच्र्युअल बॉय गेमिंग सिस्टीमने बाजारपेठेत प्रवेश केला. काही तांत्रिक मर्यादांमुळे हे उत्पादन लोकांच्या अपेक्षांना उतरले नाही, नंतर अनेक उत्पादने आली आणि गेली, पण लोकांना २०१३ मधील ऑक्युलस रिफ्टने आकृष्ट केले. त्यामुळे आमच्या यादीत त्याचा समावेश आहे.
ऑक्युलस रिफ्ट
व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी हँडसेटमध्ये कशी आणता येते हे या उत्पादनाने दाखवले. त्याची क्षमता जास्त आहे. २०१४ मध्ये ऑक्युलस फेसबुकने ताब्यात घेतले. सध्या लेफ्ट फॉर डेड, स्कायरिम, पोर्टल २, हाफ लाइफ २, बायोशॉक यावर वापरता येते. हा हेडसेट २०१६ मध्ये बाजारात येत आहे.

मायक्रोसॉफ्ट हॉलोलेन्स
व्हॅच्र्युअल रिअ‍ॅलिटी गॅजेट्सचा वापर सर्जनशील निर्मितीसाठी करता येतो. मायक्रोसॉफ्टच्या होलोलेन्स उत्पादनाचा त्यासाठी वापर करता येतो. विंडोज १० वर ते चालते. व्हीटी हेडसेटमध्ये त्रिमिती होलोग्राफचा वापर केलेला आहे. त्याच्या व्हिडीओ बघितल्या, तर हे उत्पादन स्थापत्यशास्त्र व संकल्पनाकरणात वापरता येईल. गेमर्सना काळजी करण्याचे कारण नाही, कारण होलोलेन्स किरकोळ विक्री स्टोअर्समध्ये येईपर्यंत अनेक गेम त्यावर आलेले असतील.

एचटीसी व्हाइव्ह
व्हाल्व्हबरोबर एटीसीने व्हाइव्ह व्हीआर हेडसेट तयार केला असून ज्यांना गेम्स आवडतात, त्यांचा अनुभव त्यामुळे अधिक संपन्न होईल. व्हाल्व या कंपनीने हाफ लाइफ व पोर्टल हे गेम यापूर्वी दिले आहेत. व्हाल्व्ह या कंपनीने पीसी गेमिंगमध्ये बरेच काम केले असून त्यांची स्टीम कंटेट डिस्ट्रिब्युशन सेवा आहे. एचटीसी व्हाइव्हला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. २०१५ च्या चौथ्या तिमाहीत हे उत्पादन बाजारात येईल.

सोनीचा प्रकल्प- मॉर्फियस
सोनी ही प्ले स्टेशनसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी मार्फियस प्रोजेक्ट सादर करीत असून त्यात व्हीआर हेडसेट तयार केला जात आहे. गेमप्रेमींना तो आवडेल यात शंका नाही, मॉर्फियसचे नाव नंतर बदलले जाईल, पण या बिनतारी हेडसेटची जोडणी पीएस ४ ला करता येईल. त्यात त्रिमिती ध्वनियंत्रणा तंत्रज्ञान वापरले आहे. स्टीरीओस्कोपिक ध्वनी त्यात चांगल्या प्रकारे ऐकता येईल.

रेझर ओएसव्हीआर –
 रेझरची सेन्सिस्क्सशी भागीदारी असून त्यांनी गेमिंग हार्डवेअर क्षेत्रात नाव कमावली आहे. त्यांनी आता ओएसव्हीआर म्हणजे ओपन सोर्स व्हॅच्र्युअल रिअ‍ॅलिटी प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्याला २० हार्डवेअर कंपन्यांची मदत आहे. त्यातील पहिले उत्पादन रेझर कंपनी तयार करणार आहे. २०१६ मध्ये ते बाजारात येण्याची शक्यता आहे.

स्मार्ट फोनचे स्क्रीन म्हणजे पडदे जास्त ठळक व स्पष्ट चित्र दाखवणारे बनत आहेत, तर संस्कारक म्हणजे प्रोसेसर्सही वेगवान बनत आहेत. असे असले तरी बॅटरीमध्ये गेल्या अनेक वर्षांत फारसे बदल झालेले नाहीत. त्यामुळे आता पॉवर बँकला महत्त्व आले आहे. अनेक स्मार्टफोनबरोबर आता पॉवर बँक वापरावी लागते, कारण स्मार्टफोनला बॅटरी जास्त लागते व ती पटकन उतरते. त्यामुळे पॉवर बँकची अनेक उत्पादने बाजारात आहेत व ती किफायतशीरही आहेत. बाजारपेठेच्या गलबल्यात पॉवर बँकची चांगली उत्पादने आहेत त्यांची ही माहिती.
झियोमी एमआय
पॉवर बँक
स्मार्टफोनच नव्हे तर पॉवर बँकची बाजारपेठ झियोमीने मारली आहे व त्यांच्या पॉवर बँक किमतीला कमी व दर्जाने चांगल्या आहेत.
किंमत- १००० रु.
क्षमता १०४०० मिलिअँपियर तास
वन प्लस पॉवर बँक
वन प्लस वन कंपनीची ही पॉवर बँक आहे. ही कंपनी चिनी आहे. पॉवर बँकच्या क्षेत्रात या कंपनीने एकदम दोन उत्पादने सादर केली आहेत. ती किफायतशीरही आहेत, क्षमताही जास्त आहे.
किंमत- १४०० रुपये
क्षमता- १०००० मिलिअँपियर तास
हुआवे ऑनर
(एपी ००७)-
ऑनर एपी ००७ हा बॅटरी पॅक असून त्याला दोन यूएसबी पोर्ट आहेत, धातूचे आवरण असलेली ही पॉवर बँक डिझाइनसाठी फार प्रसिद्ध नसली तरी क्षमता व किंमत योग्य आहे.
किंमत- १४०० रुपये
क्षमता- १३००० मिलिअँपियर तास
आसुस झेनपॉवर
झेनफोन मालिकेमुळे ही पॉवर बँक चांगली आहे असे म्हणायला हरकत नाही. तैवानची कंपनी असलेल्या आसुसने ही पॉवर बँक उपलब्ध करून दिली असून काळा, पांढरा, पिवळा, लाल व निळा या रंगात ती उपलब्ध आहे.
किंमत- १५०० रुपये
क्षमता- १००५० मिलिअँपियर तास

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2015 3:02 am

Web Title: powerbanks and handset
टॅग Tech It
Next Stories
1 सर्जनशीलतेला चालना!
2 फोटोंची अमर्याद जागा
3 नव-टेक
Just Now!
X