ग्राहकांची मोबाईल, टॅब आणि एलसीडीद्वारे ‘सॅमसंग’ इलेक्ट्रॉनिक्सची वाढत चाललेली ‘मैत्री’ येत्या काळामध्ये अधिक वाढणार आहे. बाजारपेठेवर राज्य करण्यासाठी गुणवत्तेच्या नव्या कसोटय़ा तयार करणाऱ्या सॅमसंगने सध्याच्या लोकप्रिय होत चाललेल्या ‘अ‍ॅण्ड्रॉईड’वर चालणारा रेफ्रिजरेटर तयार केलेला आहे. काही वर्षांपासून उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या शरीराअनुरूप चालणारे ‘एसी’ आणि तापमान नियंत्रणाच्या सक्षम सुविधा देणारे रेफ्रिजरेटर्स भारतीय बाजारपेठेत दाखल झाले आहेत. बाजारात आधीपासून ‘होम अप्लायन्स’मध्ये आघाडीवर असलेल्या प्रोडक्ट्सना मात्र सॅमसंगची टक्कर नव्हती. यंदा मात्र सॅमसंग डिजिटल इन्व्हर्टर श्रेणीतील ‘फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स’ आणि ‘स्प्लीट एअर कंडिशन’ मालिका सादर करून ‘होम अप्लायन्स’ बाजारपेठ ढवळून काढण्याची तयारी सुरू केली आहे. बाजारपेठेतील सॅमसंगच्या या ‘स्मार्ट’ चढाओढीमुळे ग्राहकांना अधिकाधिक सुविधांची होम अप्लायन्सेस उपलब्ध होण्याची संधी निर्माण झाली आहे.
ग्राहक ‘फ्रेण्डली’ उत्पादने
सॅमसंगने ‘स्प्लीट एअर कंडिशन्स’च्या २९ तर ‘फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स’च्या २६ श्रेणी बाजारात आणल्या आहेत. कंपनीची झेप ग्लोबल असली, तरी ‘ग्लोकल’ बनत भारतीय ग्राहकांच्या सवयींना, येथील शहरा, उपनगरांतील भारनियमनाच्या समस्यांना जाणून घेऊन उत्पादने तयार केली आहेत. वीज खंडित झाल्यानंतर आठ तास तापमान कायम राखणारे रेफ्रिजरेटर्स, हवा शुद्ध करणाऱ्या स्प्लीट एसीची मालिका आदींचा त्यात समावेश आहे. आजवर रेफ्रिजरेटरमध्ये न वापरल्या गेलेल्या जागेचा विचार करून या रेफ्रिजरेटर्सची अंतर्गत रचना करण्यात आली असल्याचा सॅमसंगचा दावा आहे.

कसे आहेत रेफ्रिजरेटर्स?
* डीजिटल इन्व्हर्टर रेफ्रिजरेटर्सची २५३, २७५, ३२१, ३४५, ३९३ आणि ४१५ लिटर्स क्षमतेची मालिका.
* तापमान नियंत्रणाच्या तसेच बदलण्याच्या पाच पातळ्या
* ४० टक्के ऊर्जा बचतशक्ती. त्यामुळे इतर रेफ्रिजरेटर्सच्या तुलनेत कार्यध्वनी कमी.
* फळे, भाज्या यांसाठी लवचिक बॉक्स रचना. ज्यामुळे ४० किलो भाजी एकावेळी ठेवण्याची क्षमता
* वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही आठ तास तापमान ‘जैसे थे’ ठेवण्याची क्षमता.
* विद्यूत भाराची अनियमितता असली, तरी स्टॅबिलायझर, इन्व्हर्टर बॅटरीशिवाय सुरक्षित राहण्याची क्षमता.
* कोणताही उप्तादनकर्ता देऊ शकत नसलेली १० वर्षांची कम्प्रेसर वॉरण्टी
 
कसे आहेत स्प्लीट एअर कंडिशन?
* तीव्र क्षमतेच्या फिल्टर्सद्वारे अत्यंत लहान धुळीकणांचाही छडा घेतला जातो. हवा शुद्ध करण्याची क्षमता.
* तीव्र तापमानामध्येही ‘टबरे कुलिंग’द्वारे आवश्यक असलेला गारवा उपलब्ध होत असल्याचा सॅमसंगचा दावा.
* शरीराच्या गरजेनुसार डीजिटल प्रणालीने नियंत्रित करता येणारी, बदलता येणारी कुलिंग यंत्रणा
* एनर्जी सेव्हर्स आणि बॅटरी, स्टॅबिलायझर्सची गरज नसलेली मजबूत यंत्रणा.

कसे होते उत्पादन?
श्रीपेरूम्बुदूर या चेन्नईमधील औद्योगिक पट्टय़ामध्ये २०१० मध्ये उभारण्यात आलेल्या फॅक्टरीमध्ये १२ लाख रेफ्रिजरेटर्स तसेच साडेचार लाख स्प्लीट एअर कंडिशन या क्षमतेने उत्पादन होत आहे. अधिक क्षमतेने रेफ्रिजरेटर्स बनविणाऱ्या जगभरातील मोठय़ा फॅक्टऱ्यांमध्ये चेन्नई येथील प्रकल्पाचा क्रमांक सहावा आहे.  सध्या भारतीय ग्राहकांना लक्ष्य केल्यामुळे सॅमसंगने आत्ता अस्तित्त्वात असलेल्या ३०० स्टोअर्ससह आणखी ४०० स्टोअर्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहर आणि निमशहरी भागांत सॅमसंगची अधिक स्टोअर्स येत्या काळात दिसणार आहेत.

बाजार स्थिती काय?
होम अप्लायन्समध्ये भारताची रेफ्रिजरेटर्सची बाजारपेठ ७० लाखांची, तर एअर कंडिशनची २५ लाखांची आहे. स्पर्धा न करताही रेफ्रिजरेटर्समध्ये २४ टक्के तर एसीमध्ये १३ टक्के वाटा सॅमसंगने गेल्या वर्षांत मिळविला होता. या दोन उत्पादनांमध्ये गेल्या वर्षभरात २० हजार कोटींची विक्री केल्यानंतर,वर्षी इथले बाजारपेठ काबीज करण्याचा पवित्रा सॅमसंगने घेतला आहे. या दोन्ही उत्पादनांच्या विक्रीत ५० टक्क्य़ांची वाढ सॅमसंगने निर्धारित केल्यामुळे, सॅमसंग अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी लढताना दिसणार आहे.

किंमत काय?
फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्सच्या मालिका १७, १५० रुपयांपासून १ लाख ७९ हजारांपर्यंत उपलब्ध आहे. डीजिटल इन्व्हर्टर सिरीज २०,५०० रुपयांपासून ४९,५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. एअर कंडिशनर २३, १०० रुपयांपासून ६० हजार ९९० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.