News Flash

स्मार्ट झलक

स्मार्ट घरांची संकल्पना आता सर्वत्र रुजू लागली आहे. त्या दृष्टीने कंपन्याही तयारी करू लागल्या आहेत. इंडोनेशियामधील बाली येथे नुकत्याच पार पडलेल्या सॅमसंगच्या परिषदेत याची झलक

| February 21, 2014 01:05 am

स्मार्ट घरांची संकल्पना आता सर्वत्र रुजू लागली आहे. त्या दृष्टीने कंपन्याही तयारी करू लागल्या आहेत. इंडोनेशियामधील बाली येथे नुकत्याच पार पडलेल्या सॅमसंगच्या परिषदेत याची झलक पाहावयास मिळाली. यावेळी सॅमसंगने येत्या वर्षांत येणारी १५ उत्पादनांची झलक दाखवली. यामध्ये फोनपासून ते फ्रीजपर्यंत; इतकेच नव्हे तर अर्धवर्तुळाकार टीव्हीचाही समावेश आहे. पाहू या, या वर्षांत सॅमसंग काय देतेय ते.
अर्धवर्तुळाकार टीव्ही
सॅमसंगच्या परिषदेत अर्धवर्तुळाकार टीव्हीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. अशा प्रकारचा हा जगातील पहिला टीव्ही असणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फ्लॅट एलसीडी, एलईडी, थ्रीडी आणि स्मार्ट टीव्हीपेक्षा हा टीव्ही हटके असणार आहे. यामध्ये आपल्याला चित्रांमधील बारकावे अधिक चांगल्या प्रकारे दिसणार आहेत. शिवाय हा टीव्ही नुसता एचडी नसून ‘यूएचडी’ म्हणजे ‘अल्ट्रा हाय डेफिनेशन’ असणार आहे. या टीव्हीवर कार्यक्रमांची कमी होऊ नये यासाठी कंपनीने खास यूएचडी कार्यक्रम संकलित केले असून ते टीव्ही खरेदी करताना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हा टीव्ही ६५, ५५, ७८ इंचांमध्ये उपलब्ध होणार आहे. याशिवाय भविष्यात हा टीव्ही १०५ इंचांमध्ये उपलब्ध करण्याचा कंपनीचा मानस आहे. या टीव्हीमध्ये आपल्याला थ्रीडीचा इफेक्ट कोणत्याही प्रकारचा थ्रीडी चष्मा न लावता मिळणार आहे. यामुळे या टीव्हीच्या संशोधनाला टीव्ही क्षेत्रात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या टीव्हीची किंमत कंपनीने जाहीर केली नसून तो फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला भारतात उपलब्ध होणार आहे.
स्वस्त आणि मस्त गॅलेक्सी
गॅलेक्सीच्या सीरिजमध्ये स्वस्त आणि मस्त फोनची रेंज बाजारात आणत असताना सॅमसंगने गॅलेक्सी ग्रांड निओ बाजारात आणला आहे. याची स्क्रीन १२.७ सेंटिमीटरची देण्यात आली आहे. यामध्ये १.२ गिगाहर्टझचा क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामुळे यामध्ये आपण व्हिडीओ, वेब ब्राउिझग, गेम्स आदींची मज्जा चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. यामध्ये १ जीबीची रॅम देण्यात आली आहे. यामध्ये ८ जीबीची अंतर्गत मेमरी देण्यात आली असून ही मेमरी आपण ६४ जीबीपर्यंत कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो. या फोनमध्ये मराठीसह १२ भारतीय भाषा देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर बॅटरीची क्षमताही वाढविण्यात आली असून ती २१०० एमएएच करण्यात आली आहे. यामुळे आपण थ्रीजी वापरात असलो तरी बॅटरी ८ तास काम करू शकते. यामध्ये आपल्याला ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून फ्रंट कॅमेरा व्हीजीए देण्यात आला आहे. या फोनमध्ये आपल्याला ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. हा फोन १८४५० रुपयांत उपलब्ध आहे.
गॅलेक्सी नोट ३ निओ  
सॅमसंगने गॅलेक्सी नोटमध्ये आणखी अत्याधुनिक तंत्रांनी उपलब्ध असा निओ फोन बाजारात आणायचा निर्णय घेतला आहे. या फोनला ५.५ इंचांची सुपर एएमओएलईडी एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन मल्टीटच आहे. याचे रिझोल्यूशन १२८० गुणिले ७२० पिक्सेल इतके आहे. यामध्ये आपण ‘एस पेन’ आणि ‘एस नोट’चा अधिक छान अनुभव घेऊ शकतो. यामध्ये एक एअर कमांड देण्यात आली आहे ज्याचा वापर करून आपण अक्शन मेमो, स्क्रीन राईट, पेन िवडो, एस फाइंडर असे अ‍ॅप्स शोधण्यात चांगली मदत होऊ शकते. यामध्ये सुपरफस्ट हेक्झा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. याचबरोबर दोन जीबीची रॅमही देण्यात आली आहे. यामध्ये अंतर्गत मेमरी ही १६ जीबी देण्यात आली आहे. याशिवाय एसडी कार्डच्या साहाय्याने ही मेमरी आपण आणखी ६४ जीबी वाढवू शकणार आहे. यात ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत ४०,९०० रुपये असणार आहे.
गॅलेक्सी नोट प्रो
सॅमसंगने गॅलेक्सी नोटप्रो हा टॅब मज्जा आणि काम अशा दोन्हीसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये आणखी अत्याधुनिक तंत्र वापरण्यात आले असून एकाच वेळी आपण चार स्क्रीन ओपन करून काम करू शकणार आहोत. शिवाय यामध्ये आपल्याला ई-मीटिंग, सिस्को वेबएक्स मीटिंग अशा सुविधा देण्यात आल्या आहेत ज्यामुळे ऑफिसचे काम अधिक सुकर होणार आहे. याशिवाय या फोनच्या माध्यमातून आपण घरातील उपकरणेही वापरू शकणार आहोत. यासाठी यामध्ये आपल्याला ‘कनेक्ट होम’ नावाची अतिरिक्त सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये आपल्याला ऑफिससह अत्यंत चांगल्या प्रकारे वापरता येणार आहे. या फोनला १२.२ इंचांची डब्ल्यूक्यूएक्सजीए वाइडस्क्रीन (१६:१०) डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन मल्टीटच आहे. याचे रिझोल्यूशन २५६० गुणिले १६००  पिक्सेल इतके आहे. यामध्ये आपण ‘एस पेन’ आणि ‘एस नोट’चा अधिक छान अनुभव घेऊ शकतो. यामध्ये एक एअर कमांड देण्यात आली आहे ज्याचा वापर करून आपण अक्शन मेमो, स्क्रीन राईट, पेन िवडो, एस फाइंडर असे अ‍ॅप्स शोधण्यात चांगली मदत होऊ शकते. यामध्ये सुपरफस्ट हेक्झा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. याचबरोबर दोन जीबीची रॅमही देण्यात आली आहे. यामध्ये अंतर्गत मेमरी ही १६ जीबी देण्यात आली आहे. याशिवाय एसडी कार्डच्या साहाय्याने ही मेमरी आपण आणखी ६४ जीबी वाढवू शकणार आहे. यात ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत ६४,९०० रुपये असणार आहे.
शोकेस फ्रीज
सॅमसंगने अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले शोकेस फ्रीज मार्केटमध्ये आणले आहेत. हे फ्रीज येत्या मार्चमध्ये भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या फ्रीजला कपाटासारखी दोन्ही बाजूने दारे असून यातील उजवीकडील दार उघडल्यावर आपल्याला फ्रीजमधील सर्व समान एका दृष्टिक्षेपात पाहावयास मिळतो. यामध्ये कुकिंग झोन, फॅमिली झोन, किड्स झोन असे वेगवेगळे विभाग देण्यात आले असून आतील कप्प्यांची रचना तशीच देण्यात आली आहे. डावीकडच्या बाजूला फ्रीझर बसविण्यात आले असून बर्फ आणि पाणी काढण्यासाठी दाराला बाहेरून खास व्यवस्था देण्यात आली आहे. यामध्ये स्मार्ट डिजिटल इन्व्हर्टर बसविण्यात आले आहे. यामुळे लाइट गेले तरी फ्रीजचे काम सुरूच राहते. याची भारतीय बाजारातील किंमत अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही.
वाय-फाय प्रिंटर
सॅमसंगने वाय-फाय प्रिंटरबाजारात आणले असून या िपट्ररच्या माध्यमातून आपण मोबाइल, लॅपटॉप किंवा संगणकावरून आपण प्रिंटर देऊ शकतो. इतकेच नव्हे तर आपण आपला मोबाइल प्रिंटरजवळ ठेवला तर आपण मोबाइलमधील कागदपत्रांची झेरॉक्सही काढू शकतो. याची रेंज १० मीटपर्यंत लांब देण्यात आली आहे. यामुळे आपण प्रिंटरजवळ असणे गरजेचे राहणार नाही. यातील इंकजेट प्रिंटरमध्ये एका मिनिटामध्ये २८ पाने प्रिंट होतात तर लेझर प्रिंटरमध्ये एका मिनिटामध्ये १८ पाने प्रिंट होतात. याची किंमतही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रिंटर मध्ये सॅमसंगच्या ‘एक्सओए’ची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजे यामध्ये वेब आधारित सुविधा देण्यात आली आहे. यामुळेच आपण कोणत्याही उपकरणातून िपट्र आउट घेता येऊ शकते. या प्रिंटर साठीचे अ‍ॅप आपण गुगल प्लेवरून डाऊनलोड करू शकतो.
एका सेकंदात नऊ फोटो
एका सेकंदात नऊ फोटो काढता येणारे एनएक्स सीरिजचे कॅमेरे सॅमसंग बाजारात आणणार आहे. याचबरोबर फोटो काढल्यावर थेट सोशल साइटवर अपलोड होण्यासाठी सॅमसंगने खास गॅलेक्सी मालिकेचे कॅमेरे बाजारात आणले आहेत. एनएक्स ३० हा कॅमेरा २०.३ मेगापिक्सेलचा असणार आहे. यामध्ये एपीएस-सी सिमोस सेन्सॉर देण्यात आलेला आहे. यामध्ये शटर स्पीड हा १०० पासून ते २५६०० पर्यंत देण्यात आलेला आहे. यामध्ये ऑटो शेअर हा पर्याय देण्यात आला आहे. यामुळे तुमचे फोटो क्लाउड तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ड्रॉपबॉक्स, फ्लिकर, फेसबुक, पिकासा, यू टय़ूूब आदी ठिकाणी अपलोड होऊ शकतात. गॅलेक्सी कॅमेरा २ हा फोनशी साधम्र्य साधणारा कॅमेरा असून यामध्ये आपल्याला ८ जीबीअंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. याचबरोबर कार्डच्या साहाय्याने आपण ही मेमरी ६४ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. याला २ जीबीची रॅम देण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे २८ फोटो मोड देण्यात आले आहे. यामधून आपण गाणी, चित्रपट शेअिरगही करू शकतो. म्हणजे हा कॅमेरा आणि फोन अशा दुहेरी प्रकारे वापरता येऊ शकणार आहे.
याशिवाय
सॅमसंगने स्पीकर बारही बाजारात आणले आहेत. तसेच कमी वीज खर्च करून जास्त थंडावा देणारे त्रिकोणी वातानुकूलित यंत्र, ३६० अंशांमध्ये कपडय़ांची धुलाई करणारे वॉिशग मशीनही बाजारात आणले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 1:05 am

Web Title: smart appearance samsung conference at bali indonesia
टॅग : Tech It
Next Stories
1 एक्सपीनंतर काय?
2 Tech नॉलेज
3 मोबाइल वापरा सांभाळून
Just Now!
X