News Flash

स्मार्ट चॉइस : बजेट स्मार्टफोन : नोकिया लुमिआ ५२०

नोकिया लुमिआ ९२०ने खरे तर बाजारपेठेवर जादू केली आहे. त्याच्या जाहिराती परिणामकारक पद्धतीने करण्यात आल्या आहेत. शिवाय त्यात नोकिया आणि विंडोज आठ बाजारात आणणाऱ्या मायक्रोसॉफ्टनेही

| April 12, 2013 12:55 pm

नोकिया लुमिआ ९२०ने खरे तर बाजारपेठेवर जादू केली आहे. त्याच्या जाहिराती परिणामकारक पद्धतीने करण्यात आल्या आहेत. शिवाय त्यात नोकिया आणि विंडोज आठ बाजारात आणणाऱ्या मायक्रोसॉफ्टनेही बरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे त्या मॉडेलचा खप धडाकेबाज नसला तरी लोकांना आकर्षण मात्र निश्चितच आहे. शिवाय खरेदी करताना लोक खिशाकडेही आधी पाहतात. त्यामुळेच सध्या बजेट फोन्सना चांगली मागणी आहे. हीच बाब लक्षात घेऊन नोकियाने लुमिआ ५२० हा बजेट स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
त्याचा स्क्रीन ४ इंचाचा असून त्याला पाच मेगापिक्सेलचा ऑटोफोकस कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. नोकियाने त्यांच्या लुमिआ मालिकेमध्ये सिनेमाग्राफ नावाची एक सोय दिली आहे, ती या मॉडेलमध्येही आहे. यात तुम्ही वेगवेगळी छायाचित्रे निवडल्यानंतर ती सिनेमामोडमध्ये एकत्र केली जातात एका फिल्मच्या रूपात. हा प्रकार सध्या तरुण वर्गात लोकप्रिय ठरला आहे. खासकरून फेसबुक, ट्विटर किंवा मग इ-मेलच्या माध्यमातूनही ती शेअर करता येते.
या शिवाय विंडोज आठ मोबाईलमध्ये देण्यात आलेल्या टाइल्सच्या माध्यमातून तुम्ही लाइव्ह असतात. अपडेटस् तुम्हाला सतत मिळत असतात. पीपल हबच्या माध्यमातून सोशल मीडियाही एकत्र करण्यात आला आहे. त्यात सोशल मीडिया आणि मेसेजेस एकत्रच मिळतात. शिवाय कार्यालयीन कामकाजासाठी महत्त्वाचे ठरणारे वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट आहेच दिमतीला. त्याशिवाय एक्सबॉक्स आणि ७ जीबी मोफत स्कायड्राइव्ह स्टोरेजची सोयही आहेच.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १०,४९९/-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 12:55 pm

Web Title: smart choice budget smartphone nokia lumia 520
टॅग : Mobile,Nokia
Next Stories
1 स्मार्ट रिव्ह्य़ू : पॉइंट अ‍ॅण्ड शूटमध्ये सुपरझूमही!
2 सर्वोच्च स्थानासाठी स्पर्धा, सर्वोत्तम स्मार्टफोनची !
3 स्मार्ट रिव्ह्य़ू : नोकिया लुमिआ ९२०
Just Now!
X