स्मार्टफोन घेताना आपण नेहमी तडजोड करत असतो. आपल्या बजेटमध्ये असलेल्या फोनमध्ये बॅटरी क्षमता कमी असते किंवा कधीकधी मेमरीची अडचण असते, पण सोनीच्या एक्स्पेरिया झेड २ या फोनसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची तडजोड करावी लागणार नाही, कारण हा मोबाइल तयार करतानाच परिपूर्ण केला आहे. पाहूयात नक्की आहे तरी काय या मोबाइलमध्ये.

फोन कसा चालतो ?
हा फोन खरोखरच खूप चांगली क्षमता असलेला आहे. यामध्ये २.३ गीगाहार्टझचा क्वालकॉम क्वाड-कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा प्रोसेसर सॅमसंग गॅलेक्सी नोट ३ पेक्षा थोडासा कमी आहे. यामध्ये तीन जीबी रॅम देण्यात आली आहे. यामुळे या फोनचा कामाचा वेग खूप चांगला आहे. फोन मल्टिटािस्कग आहे. यामुळे प्रत्येक गोष्ट अगदी अलगद आणि सोपी होते. फोन खूप टचसेन्सेटिव्ह असल्यामुळे वापरकर्त्यांना त्याचा चांगला फायदा होतो. प्रोसेसरच्या क्षमतेचा विचार करता तुम्ही कोणतेही अ‍ॅप वापरले तरी ते चांगलेच चालते. फोनची मेमरी १६ जीबी असून ती आपण ६४ जीबीने वाढवू शकतो.

डिस्प्ले आणि आवाज
फोनला ५.२ इंचांचा संपूर्ण एचडी ट्रिलुमिनीओस डिस्प्ले आहे. जेव्हा आपण या मोबाइलमध्ये चित्रपट पाहतो तेव्हा या डिस्प्लेचे महत्त्व आपल्याला कळते. यामध्ये दोन फ्रंट फेसिंग स्पीकर्स देण्यात आले आहेत. यामुळे त्याचा आवाज खूप चांगल्या दर्जाचा येत असतो. यामध्ये आपल्याला हेडफोनही वापरता येतो. याचा आवाज थोडा जास्त असल्यामुळे कदाचित मारामारीच्या सीनच्या वेळी तुमच्या कानाला सहज सहन न होणारा आवाज येऊ शकतो. म्हणून तुम्ही सर्व प्रकारात सहज आवाज ठेवणारा हेडफोनही वापरू शकता.

डिझाइन
झेड २ हा अल्ट्रा थील डिवाइस आहे. आपण एक मोठा फॅबलेट असल्यासारखा लूक हा फोन आपल्या हातात असताना येतो. याचे बॅक कव्हर हे ग्लॉसी देण्यात आले आहे. यामुळे त्याकडे कुणीही आकर्षति होते. सोनीने मागच्या वर्षीपासून बाजारात आणलेल्या वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ बॉडी यामध्येही देण्यात आली आहे. याची साइड बॉडी ही मेटलमध्ये बनविण्यात आल्यामुळे ती एकदम भक्कम आहे. या फोनला कॅमेरासाठी वेगळे बटण दिले आहे. यावरूनच हे स्पष्ट होते की, हा कॅमेरा फोन आहे. या फोनच्या वरच्या बाजूस एक एलईडी लाइट देण्यात आला आहे. हा लाइट नोटिफिकेशन्स आणि कॉल्स िब्लक करत असतो. हा फोन काळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे.

सॉफ्टवेअर
सोनीने अँड्रॉइड ओएसवर खूप मेहनत घेऊन ती वापरकर्त्यांला अधिक सुलभपणे उपलब्ध करून दिली आहे. सोनीने ओएसचा पुरेपूर वापर केल्यामुळे ही ओएस आणखी उपयुक्त ठरली आहे. या फोनमध्ये सोनीने वॉल्कमन, म्युझिक प्लेअर या गोष्टी दिल्या आहेतच. याशिवाय यामध्ये सोनी कनेक्टच्या माध्यमातून आणखी अ‍ॅप्स आपण डाऊनलोड करू शकतो. यामध्ये देण्यात आलेला की-बोर्ड हा जीमेल आणि सोशलमीडियामध्ये आपण वापरत असलेले शब्द आपल्याला एका क्लिकवर उपलब्ध करून देतो. म्हणजे याचा की-बोर्ड हा इंटलिजन्ट की-बोर्ड देण्यात आला आहे.

कॅमेरा
कॅमरा हा या फोनचा सर्वात चांगला आणि महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये २०.७ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फ्रंट कॅमेराही २.३ मेगापिक्सेलचा आहे. आधी म्हटल्याप्रमाणे या फोनला कॅमेराचे वेगळे बटण देण्यात आले आहेत म्हणजे हा कॅमेरा फोन आहे. २०.७ मेगापिक्सेलच्या कॅमेरामधून फोटो काढणे आणि तो फोटो एचडी स्क्रीनवर पाहणे हा खूपच वेगळा आणि चांगला अनुभव आहे. या कॅमेरामधून चांगल्या प्रकारचे व्हिडीओजही आपण शूट करू शकतो. वाइनसारख्या अ‍ॅप्सच्या माध्यमातूनही हे व्हिडीओ आपण शेअर करू शकतो. यात ४के व्हिडीओ रेकॉìडगची सुविधा आहे. या कॅमेरामध्ये देण्यात आलेल्या विविध सेटिंग्जमुळे आपल्याला फोटोग्राफी आणि व्हिडीओजची वेगळीच मज्जा अनुभवता येते. या कॅमेराचा ऑटोफोकस खूप जलद असून तो रीअल लाइट अधिक चांगल्या प्रकारे उपयोगात आणू शकतो. हा ऑटोफोकस सॅमसंगच्या गॅलेक्सी ५ पेक्षा जास्त वेगाने काम करतो.

बॅटरी
सध्या चांगली बॅटरीची क्षमता असलेला अँड्रॉइड फोन बाजारात मिळतच नाही. या फोनमध्येही तीन हजार एमएचझेडची बॅटरी देण्यात आली आहे, पण यातील हायएंड फीचर्समुळे ही बॅटरीही कमी पडते. थोडक्यात, हा फोन खूप चांगल्या दर्जाचा आणि सुविधांचा फोन आहे यात कोणतीही शंका नाही. यामध्ये देण्यात आलेले स्क्रचसारखे फीचर्सही फोन ग्राहकांना आकर्षति करू शकतात. स्केचचा पर्याय अनेक फोन्समध्ये उपलब्ध आहे, पण यातील पर्यायांमध्ये चेहरे आणि हेअर स्टाइल्स यांसारखे विविध पर्याय देण्यात आले आहेत. याच्या स्केचच्या पर्यायामध्ये आपण फोटो काढून त्यावर आपण मिशा वगैरे लावून गंमतही करू शकतो. यामुळे हा फोन सर्वच बाबतीत इतरांपेक्षा वेगळा ठरतो. किंमत- ४९,९९० रुपये.